पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! स्वारगेट ते कात्रज या प्रस्तावित मेट्रो मार्गावर ‘या’ ठिकाणी उभारले जाणार नवीन स्थानक; प्रवाशांना होईल फायदा

पुणे हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर असून महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून देखील पुणे ओळखले जाते. या शहरात मोठ्या प्रमाणावर झालेला औद्योगिक विकास तसेच आयटी हब म्हणून मिळालेली ओळख यामुळे पुणे हे देशातच नाही तर संपूर्ण जगामध्ये स्वतःची ओळख निर्माण करून आहे.

Ajay Patil
Published:
pune metro

Swargate To Katraj Metro Route:- पुणे हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर असून महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून देखील पुणे ओळखले जाते. या शहरात मोठ्या प्रमाणावर झालेला औद्योगिक विकास तसेच आयटी हब म्हणून मिळालेली ओळख यामुळे पुणे हे देशातच नाही तर संपूर्ण जगामध्ये स्वतःची ओळख निर्माण करून आहे.

या सगळ्या गोष्टींमुळे पुण्यात येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या कायमच पुणेकरांना त्रस्त करत असते. त्यामुळे पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा व्हावी याकरिता पुणे शहरात आणि परिसरात अनेक महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांची तसेच मेट्रो प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आलेली आहेत.

तसे पाहायला गेले तर पुण्यामध्ये अगोदरच काही मार्गांवर मेट्रो सेवा कार्यान्वित करण्यात आली आहे व याचा पुणेकरांना खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होत आहे.

त्यातच काही मेट्रो मार्ग हे प्रस्तावित आहेत व त्यातीलच एक महत्त्वाचा प्रस्तावित मेट्रो मार्ग म्हणजे स्वारगेट ते कात्रज हा होय. हा विस्तारित मेट्रोमार्ग 5.65 किलोमीटर लांबीचा असून या प्रस्तावित मेट्रो मार्गाच्या बाबतीत एक महत्त्वाची बातमी सध्या समोर आली आहे.

स्वारगेट ते कात्रज या प्रस्तावित मेट्रो मार्गावर या ठिकाणी होणार नवीन स्थानक
पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टिकोनातून स्वारगेट ते कात्रज हा प्रस्तावित मेट्रो मार्ग असून हा मार्ग 5.65 किलोमीटर लांबीचा आहे. या विस्तारित मेट्रो मार्गाचा संपूर्ण आराखडा बघितला तर यामध्ये सुरुवातीला पद्मावती, कात्रज आणि मार्केट यार्ड या ठिकाणी स्थानके उभारणे प्रस्तावित होते.

परंतु येथील लोकप्रतिनिधी व स्थानिक रहिवाशांची मागणी होती की बालाजी नगर येथे देखील चौथे स्थानक उभारावे. या मागणीचा विचार करून आता महत्त्वाच्या असलेल्या या स्वारगेट ते कात्रज प्रस्तावित मेट्रो मार्गावर बालाजीनगर येथे भारती विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराजवळच एक नवीन स्थानकाची उभारणी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

त्यामुळे आता या परिसरातील नागरिकांना देखील प्रवासाच्या दृष्टिकोनातून खूप मोठा दिलासा मिळणार आहे व येथील प्रवाशांची आता वाहतूक कोंडीच्या समस्येपासून मुक्तता होणार आहे.

जर या प्रस्तावित मेट्रो मार्गावरील उभारण्यात येणार्‍या स्थानकांचे एकमेकांपासून अंतर जर बघितले तर स्वारगेट स्थानकापासून मार्केट यार्ड स्थानकाचे अंतर 1.31 किलोमीटर आहे व मार्केट यार्ड ते पद्मावती या स्थानकादरम्यानचे अंतर 2.11 किमी,

पद्मावती ते बालाजीनगर या दोन स्थानकादरम्यानचे अंतर 1.23 किमी व बालाजी नगर ते कात्रज या स्थानका दरम्यानचे अंतर एक किलोमीटर असणार आहे. या विस्तारित मेट्रोमार्गाकरिता अंदाजे 2954 कोटी रुपयांचा खर्च होणार असल्याचा अंदाज असून त्या खर्चामध्ये मात्र आता नव्याने उभारल्या जाणाऱ्या बालाजी नगर स्थानकाचा खर्च समाविष्ट नाही.

या स्थानकासाठी जो काही खर्च लागणार आहे त्याचा प्रस्ताव लवकरच राज्य शासनाकडे सादर केला जाणार असल्याची देखील माहिती समोर आली आहे.

स्वारगेट ते कात्रज हा प्रस्तावित मेट्रो मार्ग भूमिगत असणार असून सध्या त्याचे भू वैज्ञानिक सर्वेक्षण सुरू आहे. जेव्हा हा मार्ग पूर्ण होईल तेव्हा वाहतूक कोंडीची समस्या लक्षणीयरीत्या कमी होण्यास मदत होणार आहे व प्रवास अधिक वेगवान होईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe