येणाऱ्या नवीन वर्षात पुण्याला मिळणारा आणखी एका वंदे भारत ट्रेनची भेट! लवकरच सुरू होणार पुणे ते धुळे वंदे भारत ट्रेन?

केंद्रीय रेल्वे विभागाच्या माध्यमातून संपूर्ण भारतामध्ये अनेक महत्त्वाची शहरे ही वंदे भारत ट्रेनच्या माध्यमातून जोडण्यात आली असून यामुळे दोन शहरांमधील कनेक्टिव्हिटी वाढण्यास मदत झाली आहे. परंतु वेगवान आणि आरामदायी प्रवासाच्या दृष्टिकोनातून देखील वंदे भारत ट्रेनचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे.

Ajay Patil
Published:
vande bharat

Pune-Dhule Vande Bharat Train Update:- केंद्रीय रेल्वे विभागाच्या माध्यमातून संपूर्ण भारतामध्ये अनेक महत्त्वाची शहरे ही वंदे भारत ट्रेनच्या माध्यमातून जोडण्यात आली असून यामुळे दोन शहरांमधील कनेक्टिव्हिटी वाढण्यास मदत झाली आहे. परंतु वेगवान आणि आरामदायी प्रवासाच्या दृष्टिकोनातून देखील वंदे भारत ट्रेनचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे.

एकंदरीत जर आपण भारताच्या दृष्टिकोनातून बघितले तर भारतामध्ये या वंदे भारत ट्रेनला चांगला प्रतिसाद मिळताना दिसून येत असल्याने एकापाठोपाठ एक अशा वंदे भारत ट्रेन देशातील अनेक राज्यातील महत्त्वाची शहरांच्या दरम्यान सुरू करण्यावर केंद्र सरकारने भर दिल्याचे आपल्याला दिसून येत आहे.

महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून विचार केला तर महाराष्ट्रामध्ये देखील मुंबई ते शिर्डी तसेच मुंबई ते सोलापूर आणि पुणे शहराहून देखील कोल्हापूर आणि हुबळीसाठी वंदे भारत ट्रेन सध्या सुरू आहेत.

त्यातच पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली असून लवकरच पुण्याला आणखी एक वंदे भारत ट्रेनची भेट येणाऱ्या नवीन वर्षामध्ये मिळण्याची शक्यता असून ही नवीन वंदे भारत एक्सप्रेस पुणे ते धुळे दरम्यान धावेल अशी एक अपेक्षा आहे.

लवकरच धावणार पुणे ते धुळे वंदे भारत एक्सप्रेस?
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पुणे शहराच्या दृष्टिकोनातून बघितले तर सध्या पुण्यावरून पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस सध्या सुरू आहे. तसेच मुंबई सेंट्रल ते सोलापूर ही जी काही वंदे भारत एक्सप्रेस जाते ती देखील पुण्यावरून जाते.

अशाप्रकारे जवळपास तीन वंदे भारत एक्सप्रेसचा फायदा पुणे शहराला मिळताना आपल्याला दिसून येत आहे. परंतु त्यामध्ये आणखी एक वंदे भारत एक्सप्रेसची भर पडणार असून लवकरच पुणे ते धुळे दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार असल्याची बातमी समोर आली आहे.

जर आपण खानदेशातील धुळे किंवा जळगाव या जिल्ह्यांचा विचार केला तर मोठ्या प्रमाणावर पुण्याला या परिसरातील लोक कामानिमित्त आहेत व त्यांच्या करिता नक्कीच ही वंदे भारत एक्सप्रेस फायद्याची ठरणार आहे.

धुळ्याच्या खासदार शोभा बच्छाव यांनी घेतली होती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार जर आपण बघितले तर धुळे लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या खासदार श्रीमती शोभा बच्छाव यांनी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची या निमित्ताने भेट घेतली व या भेटीत त्यांनी पुणे ते धुळे आणि मुंबई ते धुळे या मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करावी अशा पद्धतीची मागणी केली.

त्यांच्या या मागणीला रेल्वेमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला व सकारात्मक निर्णय याबाबतीत घेतला जाईल अशी ग्वाही देखील त्यांनी दिल्याची माहिती समोर आली आहे.

साधारणपणे येणाऱ्या 2025 या नवीन वर्षामध्ये धुळे ते मुंबई आणि धुळे ते पुणे या मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस धावेल अशी एक शक्यता आहे. त्यामुळे नक्कीच ही वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली तर खान्देशकरांसाठी आणि पुणेकरांसाठी नक्कीच एक महत्त्वाचा निर्णय ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe