घरी बसून ऑनलाईन पद्धतीने ‘ही’ कामे करा आणि महिना 30 ते 40 हजार कमवा! कायम पैशांमध्ये खेळाल

आजचे युग इंटरनेट आणि डिजिटल पद्धतीचे युग असून यामुळे तुम्ही अगदी ऑनलाईन पद्धतीने देखील घरी बसून पैसे कमवू शकतात व अशा पद्धतीने ऑनलाईन पैसे कमवण्याचे अनेक मार्ग सध्या उपलब्ध आहेत. ऑनलाइन पद्धतीने पैसे कमावण्यासाठी अगदी तुम्ही नोकरी जरी करत असाल किंवा नसाल तरी तुम्ही चांगल्या पद्धतीने पैसे या माध्यमातून मिळवू शकतात.

Ajay Patil
Published:
online business

Online Option To Earning Money:- आजचे युग इंटरनेट आणि डिजिटल पद्धतीचे युग असून यामुळे तुम्ही अगदी ऑनलाईन पद्धतीने देखील घरी बसून पैसे कमवू शकतात व अशा पद्धतीने ऑनलाईन पैसे कमवण्याचे अनेक मार्ग सध्या उपलब्ध आहेत. ऑनलाइन पद्धतीने पैसे कमावण्यासाठी अगदी तुम्ही नोकरी जरी करत असाल किंवा नसाल तरी तुम्ही चांगल्या पद्धतीने पैसे या माध्यमातून मिळवू शकतात.

याकरिता तुम्हाला मोबाईल किंवा लॅपटॉपची आवश्यकता भासते व या मदतीने तुम्ही घरी बसून चांगली कमाई करू शकतात. ऑनलाइन पद्धतीने पैसे कमवण्याचे अनेक मार्ग आहेत व त्यातीलच काही महत्त्वाच्या पद्धतींचा किंवा पर्यायांचा आपण या लेखामध्ये थोडक्यात माहिती घेणार आहोत. ज्या माध्यमातून तुम्ही घरबसल्या पैसे कमवू शकतात.

घरी बसून ऑनलाईन पद्धतीने ही कामे करा आणि पैसे कमवा

1- डेटा एन्ट्री मधून पैसे कमावणे- आजकाल अनेक खाजगी कंपन्या त्यांचा डेटा हाताळण्यासाठी ऑनलाईन डेटा एन्ट्री सेवा वापरत असतात व तुमच्याकडे जर टायपिंगचे चांगले स्किल असेल तर तुम्ही या पद्धतीने चांगला पैसा कमवू शकतात. याकरिता तुम्हाला Upwork, Fiverr आणि फ्रीलांन्सर सारख्या काही ऑनलाइन प्लेटफॉर्मवर तुमची प्रोफाइल तयार करावी लागेल.

या ठिकाणी तुम्ही तुमचे कौशल्य तसेच अनुभव आणि मागील प्रकल्पांची माहिती देऊ शकतात व या प्लॅटफॉर्मच्या मदतीने तुम्ही वेगवेगळ्या कंपन्यांचे डेटा एन्ट्री प्रकल्प मिळवू शकतात. या कामांमध्ये प्रत्येक प्रकल्पासाठी एक निश्चित रक्कम दिली जाते आणि बरेच क्लाइंट तासाला देखील पैसे देतात.

2- ऑनलाइन कोचिंगद्वारे पैसे कमावणे- ऑनलाइन पद्धतीने कोचिंग हा आजकाल पैसे कमावण्याचा एक प्रमुख मार्ग बनला असून तुमच्याकडे जर एखाद्या विषयाचे चांगले ज्ञान असेल तर तुम्ही ऑनलाईन कोचिंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवू शकतात. ऑनलाइन कोचिंगसाठी प्रथम तुम्हाला विशिष्ट विषय निवडावा लागतो

व पुढे तुम्ही Udemy, Coursera आणि Skillshare किंवा तुमची स्वतःची वेबसाईट तयार करून त्यावर अभ्यासक्रम तयार करू शकतात व या पर्यायांशिवाय तुम्ही स्वतःचे यूट्यूब चैनल सुरू करून तुम्ही व्हिडिओ बनवून देखील पैसे कमवू शकतात.अशा पद्धतीने तुम्ही घरी बसून पैसे मिळवण्याचा हा एक उत्तम मार्ग तयार करू शकतात.

3- ड्रॉप शिपिंग व्यवसाय- हे एक उत्तम असे ऑनलाईन व्यवसाय मॉडेल असून या व्यवसायात तुम्ही कुठल्याही उत्पादनांची खरेदी न करता ती ग्राहकांना अधिक किमतीला विकू शकतात व तुमच्या नफा कमवू शकतात. ड्रॉप शिपिंग जर सोप्या शब्दात समजायचे असेल तर जेव्हा एखादा ग्राहक ऑनलाईन उत्पादनासाठी ऑर्डर देतो तेव्हा ड्रॉप शिपिंग कंपनी त्या उत्पादनासाठी ऑर्डर त्याच्या किरकोळ विक्रेत्यास पाठवते आणि ती विक्रेता त्या उत्पादनास थेट ग्राहकाकडे पाठवते.

म्हणजेच हा एक ऑनलाईन केला जाणारा उद्योग आहे व यासाठी कुठल्याही प्रकारच्या जागेची आवश्यकता नसते व इतर व्यावसायिक साधने देखील या करता लागत नाही. ड्रॉप शिपिंग व्यवसायामध्ये ऑर्डर केलेली उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची अडचण तुम्हाला सहन करावी लागत नाही.

या व्यवसायात प्रामुख्याने आपण उत्पादने विकत घेतो पण आपण त्या उत्पादनांचे मालक नसतात. वास्तविक या व्यवसायात आपण आपल्या स्वतःच्या ऑनलाईन स्टोअर उघडता किंवा इतर कोणत्याही खरेदी वेबसाइट्स आपले उत्पादने विक्री करतात. यामध्ये आपल्या ऑनलाइन स्टोअरद्वारे आपण विविध उत्पादनांची विक्री करू शकता

आणि जेव्हा ती उत्पादने खरेदी करण्यासाठी ऑर्डर आपल्याकडे येईल तेव्हा आपण ती ऑर्डर त्या उत्पादनाच्या पुरवठादारास पाठवायचे असतात व त्यानंतर तो पुरवठादार त्याच्या कंपनीच्या वतीने ते उत्पादन पुरवतो.

या व्यवसायामध्ये आपल्या ग्राहकांनी जी काही उत्पादने खरेदी केलेली असतात त्यामधून आपला नफा काढावा लागतो. उदाहरणच द्यायचे झाले तर एखाद्या उत्पादनाची किंमत 100 रुपये असेल आणि आपण ती 120 रुपयांना विकली तर त्या उत्पादनाच्या विक्रीवर तुम्हाला 20 रुपये नफा मिळतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe