Numerology 2025:- येणाऱ्या पाच ते सहा दिवसांमध्ये आता 2025 या नवीन वर्षाचे आगमन होणार असून आता सगळ्यांनाच नवीन वर्षाच्या स्वागताची आणि त्याच्या आगमनाची उत्सुकता लागून राहिलेली आहे. तसेच ज्योतिष शास्त्र,अंकशास्त्राच्या दृष्टिकोनातून देखील येणारे नवीन वर्ष हे अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
ज्योतिष शास्त्रानुसार बघितले तर अनेक ग्रह या येणाऱ्या वर्षात राशी परिवर्तन करणार असल्यामुळे बारा राशींपैकी काही राशींना त्याचा फायदा तर काहींवर विपरीत परिणाम होणार आहे. तसेच अंकशास्त्राच्या दृष्टिकोनातून बघितले तर जन्मतारखानुसार देखील वेगवेगळ्या स्वरूपाचा परिणाम आपल्याला व्यक्तींवर दिसून येणार आहे.
आपल्याला माहित आहे की अंकशास्त्रामध्ये व्यक्तीच्या जन्मतारखेवरून संबंधित व्यक्तीचा मूलांक काढला जातो व त्यानुसार व्यक्तीचे भविष्य वर्तवले जाते. अगदी याचप्रमाणे ज्या व्यक्तींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या दहा, एकोणावीस,
एक, 28 तारखेला झालेला असतो अशा व्यक्तींचा मुलांक एक असतो. त्यामुळे अंकशास्त्रानुसार एक मूलांक म्हणजेच वर नमूद केलेल्या या जन्म तारखांना जन्मलेल्या व्यक्तींसाठी येणारे 2025 वर्ष कसे असणार आहे? याबद्दलची माहिती आपण या लेखात बघू.
एक मुलांक असलेल्या व्यक्तींसाठी कसे राहील 2025 वर्ष?
ज्या व्यक्तींची जन्मतारीख एक, दहा तसेच एकोणावीस व 28 आहे अशा व्यक्तींचा मुलांक एक आहे व येणाऱ्या 2025 या वर्षाचा मुलांक जर काढला तर तो नऊ आहे. 2025 मधील सगळ्या अंकांची बेरीज 9 येते. अंकशास्त्रानुसार बघितले तर 9 या संख्येवर मंगळ ग्रहाचा प्रभाव जास्त असतो व त्यामुळे नऊ सोबत एक मुलांकाचा प्रवास अधिक फायद्याचा होतो.
त्यामुळे 2025 या वर्षांमध्ये ज्या व्यक्तींचा मुलांक एक आहे त्यांना त्यांच्यात असलेला आत्मविश्वास हा खरा फायद्याचा ठरणार आहे. तसेच येणाऱ्या वर्षांमध्ये या व्यक्तींना क्रोध तसेच साहस व शौर्य याचा उपयोग अगदी सांभाळून करावा लागेल. म्हणजेच कुठल्याही बाबतीत अतिरेक होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल.
खरेदी विक्री व्यवहारांमध्ये होईल फायदा
एक मुलांक असलेल्या व्यक्तींना येणाऱ्या वर्षांमध्ये काही गोष्टींची काळजी घेणे खूप फायद्याचे ठरणार आहे. एखाद्याला प्रॉमिस किंवा शब्द देताना त्या शब्दात स्वतःच अडकणार नाहीत याची दक्षता घेणे फायद्याचे ठरेल. तसेच प्रेम प्रकरण असेल तर त्यामध्ये सावधानता बाळगणे फायद्याचे राहील.
तसेच या व्यक्तींचे काही रखडलेले कामे असतील तर येणाऱ्या वर्षात त्यांना चालना मिळणार आहे. जमीन किंवा इतर मालमत्ता खरेदी विक्री व्यवहारामध्ये खूप मोठा फायदा होणार आहे. आता असे व्यवहार करताना व्यवस्थित कागदपत्रे तपासून आणि कायद्याच्या चौकटीत राहून करणे खूप गरजेचे राहील.
नोकरी आणि व्यवसायामध्ये बदल करण्याच्या संधी मिळतील. परंतु यावेळी मात्र घाई गडबडीत निर्णय घेऊ नये. तसेच 2025 या वर्षातील मे महिन्यानंतरचे पुढील सहा महिने पैशांच्या दृष्टिकोनातून खूप चांगले आहेत व मानसिकदृष्ट्या आधार देणारे ठरतील.
राजकारण तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये तुम्ही जे काही लहान किंवा मोठे निर्णय घ्याल त्यांचे स्वागतच केले जाईल. ज्या व्यक्तींचा मुलांक चार किंवा पाच किंवा सात आहे अशी व्यक्ती तुमच्याशी मैत्री करण्यासाठी पुढे येतील व अशावेळी त्यांची मित्रता स्वीकारणे तुमच्या फायद्याचे ठरेल.
कारण हे व्यक्ती तुमच्या सन्मान करतील व त्यातूनच तुम्ही बऱ्याच गोष्टींची नवीन सुरुवात करू शकाल. म्हणजे जर बघितले तर येणारे 2025 हे वर्ष मुलांक एक असलेल्या व्यक्तींसाठी जवळपास फायद्याचे ठरणार आहे.