LIC Jivan Lakshya Policy:- भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसी हे गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेच.परंतु इन्शुरन्स कव्हर आणि गुंतवणुकीवर मिळणारा परतावा देखील चांगला मिळण्यासाठी एलआयसीच्या अनेक योजना लोकप्रिय आहेत. भारतामध्ये एलआयसी वर विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या मोठी असून मोठ्या प्रमाणावर एलआयसीच्या अनेक पॉलिसीज मध्ये गुंतवणूक केली जाते.
एलआयसीने आतापर्यंत अनेक पॉलिसीज आणले आहेत व त्यामध्ये जर आपण एलआयसीची जीवन लक्ष्य पॉलिसी बघितली तर ही एक अतिशय फायद्याची अशी पॉलिसी आहे. त्यामुळे या लेखामध्ये आपण एलआयसीच्या या जीवन लक्ष्य पॉलिसी विषयी थोडक्यात माहिती घेऊ.
फायद्याची आहे एलआयसीची जीवन लक्ष्य पॉलिसी
एलआयसीची जीवन लक्ष्य पॉलिसी ही एक महत्त्वाची अशी पॉलिसी असून जी विमाधारकाचा मृत्यू झाला तरी देखील त्यानंतर पॉलिसीचे जे काही ध्येय आहे ते पूर्ण करते. तसेच विमाधारकाचा म्हणजेच पॉलिसी धारकाचा जर मृत्यू झाला तर विमा हप्ता कंपनी भरत असते व इतकेच नाही तर पॉलिसी धारकाच्या नॉमिनीला खर्चा करिता विमारकमेच्या दहा टक्के रक्कम देखील मिळते.
या पॉलिसीसाठी जर पात्रता बघितली तर यामध्ये 18 ते 55 वर्षे वयोगटातील लोक गुंतवणूक करू शकतात व या पॉलिसीची मुदत 13 ते 25 वर्षे इतकी आहे. मॅच्युरिटीचे वय जर बघितले तर ते 65 वर्ष असून ही पॉलिसी जितकी वर्ष सुरू राहते त्यापेक्षा तीन वर्षे कमी प्रीमियम भरावा लागतो.
उदाहरणार्थ तुम्ही जर ते 23 वर्षाची पॉलिसी निवडली असेल तर तुम्हाला 20 वर्षाकरिता प्रीमियम भरावा लागतो. या योजनेच्या माध्यमातून विमाधारकाला किमान एक लाख रुपयांची विमा रक्कम मिळते व कमाल विम्याच्या रकमेवर कुठल्याही प्रकारची मर्यादा नाही. या पॉलिसीमध्ये तुम्ही मासिक,त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक प्रीमियम भरू शकतात.
किती मिळतो डेथ बेनिफिट?
विशेष म्हणजे या पॉलिसीमध्ये डेथ बेनिफिट देखील मिळतो. म्हणजेच पॉलिसी पूर्ण होण्याअगोदर जर पॉलिसीधारकाचा दुर्दैवाने मृत्यू झाला तर कंपनी प्रीमियम जमा करते व या योजनेच्या मॅच्युरिटीपूर्वी प्रीमियम सुरू असेपर्यंत दरवर्षी विमा रकमेच्या दहा टक्के रक्कम नॉमिनीला देते व खास करून ही पॉलिसी मुलांच्या गरजा लक्षात घेऊन बनवण्यात आली आहे.
महिन्याला 122 रुपयांची गुंतवणूक अशा पद्धतीने देते 26 लाख
समजा तुम्ही वयाच्या तिसाव्या वर्षी पॉलिसी खरेदी केली व यामध्ये विम्याची रक्कम दहा लाख रुपये आहे व बोनस 11 लाख 50 हजार रुपये आहे. यामध्ये तुम्हाला वर्षाला 43 हजार 726 रुपये प्रीमियम भरावा लागतो व महिन्याचा प्रीमियम बघितला तर तो 3644 रुपये असतो.
म्हणजे दररोज तुम्ही 122 रुपयांची दररोज गुंतवणूक केली तर तुम्ही या पॉलिसीचा लाभ घेऊ शकतात व या पद्धतीने जर प्लॅनिंग केला तर या योजनेच्या मॅच्युरिटीवर तुम्हाला 26 लाख रुपये मिळतात. म्हणजेच सोप्या पद्धतीने समजून घेतले तर वय तीस वर्ष, मुळ विमा रक्कम दहा लाख रुपये,
पॉलिसीचा कालावधी पंचवीस वर्ष, मृत्यू विमा रक्कम अकरा लाख रुपये, प्रीमियम महिन्याला 3723 रुपये, तीन महिन्याचा प्रीमियम घेतला तर 11170 रुपये आणि वार्षिक प्रीमियम घेतला तर 43 हजार 726 रुपये आणि दैनंदिन बघितले तर 122 रुपये यामध्ये तुम्हाला गुंतवावे लागतील. याप्रमाणे तुम्हाला मॅच्युरिटी वर 26 लाख रुपये मिळतील.