BSNL Recharge Plan:- भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएल ही भारत सरकारची कंपनी असून ही कंपनी स्वस्त रिचार्ज करता प्रामुख्याने ओळखली जाते. मागच्या एक ते दोन महिने अगोदर जिओ,
एअरटेल आणि वोडाफोन आयडिया सारख्या आघाडीच्या खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्ज प्लानच्या दरात वाढ केल्यामुळे आता अनेक ग्राहक हे बीएसएनएल कडे वळल्याचे चित्र आहे. कारण इतर टेलिकॉम कंपन्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या तुलनेत बीएसएनएलचे रिचार्ज प्लॅन अतिशय स्वस्त समजले जातात.
त्यामुळे आता इतर टेलिकॉम कंपन्यांचे सिम कार्ड बीएसएनएलमध्ये पोर्ट करण्याकडे मोठ्या प्रमाणावर कल असल्याचे दिसून येत आहे. इतकेच नाहीतर आता या दृष्टिकोनातून ग्राहकांना चांगल्यात चांगल्या आणि जलद सुविधा मिळाव्यात याकरता बीएसएनएलने देखील काम सुरू केले असून लवकरात लवकर बीएसएनएल देखील 5G सुविधा आणण्याच्या तयारीत आहे.
त्याचाच एक भाग म्हणून बीएसएनएलने आपल्या युजर्स करिता म्हणजेच ग्राहकांकरिता एक आकर्षक अशी ऑफर येणाऱ्या नवीन वर्ष 2025 च्या पार्श्वभूमीवर लॉन्च केली आहे व यामध्ये ग्राहकांना कमीत कमी किमतीमध्ये अनेक प्रकारचे फायदे मिळणार आहेत.
बीएसएनएलच्या 277 रुपयाच्या रिचार्ज प्लानमध्ये मिळणार अनेक अनेकविध फायदे
बीएसएनएलने आपल्या कोट्यावधी युजर साठी एक आकर्षक असा रिचार्ज प्लॅन लॉन्च केला आहे व रिचार्ज प्लॅन ग्राहकांना 277 मध्ये खरेदी करता येणार आहे.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे 277 रुपयांच्या या रिचार्ज प्लानची व्हॅलिडीटी 60 दिवसांची असून 60 दिवसाच्या व्हॅलिडीटी कालावधीमध्ये ग्राहकांना दररोज दोन जीबी डेटा मिळणार आहे.
इतकेच नाहीतर हा डेटा जर संपला तर युजर्स 40 केबीपीएसच्या स्पीडवर अनलिमिटेड डेटाचा फायदा मिळवू शकणार आहेत.
घाई करा या तारखेपर्यंतच आहे हा रिचार्ज प्लानचा फायदा घेण्याची संधी
बीएसएनएलच्या या 277 रुपयांच्या आकर्षक अशा रिचार्ज प्लानचा जर तुम्हाला फायदा घ्यायचा असेल तर तुम्ही तो 16 जानेवारी पर्यंतच खरेदी करू शकतात. या रिचार्ज प्लानची माहिती बीएसएनएलने आपल्या सोशल मीडिया प्लेटफॉर्मच्या माध्यमातून दिली आहे.