Top CNG Car In India:- पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती आणि वातावरणाचे प्रदूषण या सगळ्या दृष्टिकोनातून इलेक्ट्रिक आणि सीएनजी वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसून येत आहे.सीएनजी आणि इलेक्ट्रिक वाहनांमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून अशी अनेक तंत्रज्ञानाचा वापर केलेली वाहने बाजारात आणली गेली आहेत.
इतकेच नाहीतर टाटा आणि ह्युंदाई सारख्या कंपन्यांनी त्यांच्या सीएनजी कारमध्ये डुएल सिलेंडर सीएनजी तंत्रज्ञानाचा वापर केला आहे व त्यामुळे या कारमध्ये बूट स्पेसची कुठल्याही प्रकारची समस्या देखील राहत नसल्याने या सीएनजी फायद्याच्या ठरणार आहेत.
तुम्हाला देखील सीएनजी कार घ्यायची असेल व ती देखील डुएल सिलेंडर सीएनजी असलेली तर भारतातील टॉप असलेले कारची माहिती आपण या लेखात बघणार आहोत.
भारतातील ड्युअल सिलेंडर तंत्रज्ञान असलेल्या टॉप सीएनजी कार्स
1- टाटा टियागो सीएनजी- ही भारतातील सर्वात लोकप्रिय सीएनजी कार असून या कारमध्ये तुम्हाला ड्युअल सिलेंडर तंत्रज्ञान पाहायला मिळते. या तंत्रज्ञानामुळे हॅचबॅक बॉडी असून या कारमध्ये चांगली बूट स्पेस मिळते. ही भारताची एनिग्मा सीएनजी कार आहे जी ऑटोमॅटिक मॅन्युअल ट्रान्समिशन गिअरबॉक्ससह आली आहे.
या कारमध्ये 1.2 लिटर पेट्रोल इंजिन पाहायला मिळते व हे कंपनीने फिट केलेल्या सीएनजी किट सोबत येते. ही कार 73 बीएचपी पावर आणि 95 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते. या कारची किंमत पाच लाख 99 हजार एक्स शोरूम इतके आहे.
2- ह्युंदाई औरा सीएनजी- ह्युंदाई हे दक्षिण कोरियाची ऑटोमोबाईल कंपनी असून या कंपनीची भारतातील अतिशय लोकप्रिय असलेली कॉम्पॅक्ट सेडान कार म्हणून ह्युंदाई औरा सीएनजीला ओळखले जाते व या कारमध्ये तुम्हाला ड्युअल सिलेंडर सेटअप पाहायला मिळतो.
ही कार भारतामध्ये E, S आणि SX या तीन प्रकारात येते व या कारची भारतातील किंमत सात लाख 50 हजार रुपये एक्स शोरूम पासून सुरू होते. या कारमध्ये सीएनजी किटसह 1.2- लिटर पेट्रोल इंजिन पाहायला मिळते जे 68 बीएचपी पावर आणि 95 एनएम पीक टॉर्क जनरेट करते.
3- टाटा नेक्सन सीएनजी- टाटाची ही भारतातील अतिशय लोकप्रिय कॉम्पॅक्ट एसयूव्ही असून टाटा मोटर्सने या कारचा सीएनजी प्रकार भारतात लॉन्च केला आहे व भारतीय बाजारात या सीएनजी कारची किंमत नऊ लाख रुपयांच्या एक्स शोरूम पासून सुरू होते. ही कार टर्बो चार्ज पेट्रोल इंजिनसह येते व या कारमध्ये तुम्हाला 99 एचपी पावर आणि १७० एमएमचा पिक टॉर्क पाहायला मिळतो.
4- ह्युंदाई एक्सेटर सीएनजी- ही भारतातील खूप लोकप्रिय सीएनजी कार असून ही कार ह्युंदाईच्या पहिली ड्युअल सिलेंडर तंत्रज्ञानासह सीएनजी कार म्हणून भारतात लॉन्च करण्यात आली व या कारमध्ये सहा एअर बॅग, इलेक्ट्रिक सनरूफ, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि आठ इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम यासारखे वैशिष्ट्ये पाहायला मिळतात.
भारतात ही कार 8.50 लाख रुपयांच्या एक्स शोरूम किमतीत उपलब्ध आहे. ही एक अतिशय चांगली आणि परवडणारी कॉम्पॅक्ट एसयुव्ही असून जी तुम्हाला आश्चर्यकारक अनुभव देऊ शकते.