Tourist Places In India:- जर एखादी ट्रीप प्लॅन करायची असेल तर प्रामुख्याने नैसर्गिक पर्यटन स्थळांना प्राधान्य दिले जाते. यामध्ये धबधबे तसेच डोंगरदऱ्या यासारख्या नैसर्गिक ठिकाणी भेट देण्याचा ट्रेंड आपल्याला सध्या दिसून येतो. परंतु परत परत अशा ठिकाणी फिरण्यापेक्षा काहीतरी नवीन वैशिष्ट्य असलेल्या ठिकाणी फिरायला जाणे खूप महत्त्वाचे ठरते.
कारण बऱ्याच व्यक्तींना फिरण्याची आवड असते व असे व्यक्ती परत परत अशा डोंगराळ भागांमध्ये जाऊन कंटाळतात व काहीतरी नवीन व शांत ठिकाणी फिरायला जायचा प्लान बनवत असतात.कारण भारतामध्ये फिरता येतील अशी अनेक वेगवेगळे वैशिष्ट्ये आणि वारसा लाभलेली पर्यटन स्थळे असून या ठिकाणी भेट दिल्याने निरव अशा शांततेचा अनुभव घेता येतो व ट्रीप देखील आनंददायी बनवता येते.
त्यामुळे हिवाळ्याच्या थंडगार वातावरणामध्ये तुम्हाला फिरायला जायचा प्लान असेल व तुम्ही शांत व गर्दी नसलेली ठिकाणे शोधत असाल तर या लेखामध्ये आपण अशाच काही ठिकाणांची माहिती घेणार आहोत.
फिरण्याचा उत्तम आनंद घ्यायचा तर ही आहे भारतातील शांत अशी पर्यटन स्थळे
1- उदयपूर- हिवाळ्याच्या थंडगार अशा वातावरणामध्ये जर तुम्हाला फिरायला जायचे असेल तर राजस्थान हे एक उत्तम ठिकाण ठरते. राजस्थान मधील उदयपूर यासाठी खूप बेस्ट डेस्टिनेशन असून उदयपूरला जर तुम्ही गेला तर त्या ठिकाणचे तलाव तुमची ट्रीप खास बनवतात.
उदयपूर मधील लेक पिछोला हा प्रसिद्ध असा तलाव आहे व त्या ठिकाणी बोट रायडिंगचा आनंद घेता येतो. तसेच महत्त्वाचे म्हणजे या तलावाच्या अगदी मध्यभागी वसलेले जग मंदिर आणि लेक पॅलेस या तलावाच्या सौंदर्यामध्ये भर घालतात.
संध्याकाळी या ठिकाणाचे दृश्य अतिशय सुंदर असते. राजस्थानी संस्कृती आणि जीवनाचा स्वाद जर तुम्हाला घ्यायचा असेल तर उदयपूर हे उत्तम असे डेस्टिनेशन ठरते.
2- रणथंभोर राष्ट्रीय उद्यान- तुम्हाला निसर्ग प्रेमासोबत जर वन्य प्राण्यांची आवड असेल तर तुमच्याकरिता रणथंभोर नॅशनल पार्क एक उत्तम असा पर्याय ठरू शकते.
हिवाळ्याच्या कालावधीमध्ये असलेल्या थंड वातावरणात जर तुम्ही या ठिकाणी भेट दिली तर या ठिकाणचे हवामान खूप चांगले आहे. या ठिकाणी तुम्ही फिरण्याचा मनमुराद आनंद घेऊ शकतात तसेच हिवाळ्यात सफारी आणि वाघ निरीक्षणासाठी देखील हे ठिकाण अतिशय प्रसिद्ध आहे.
3- वाराणसी- उत्तर प्रदेश राज्यातील वाराणसी हे देखील हिवाळ्यात फिरण्यासाठी एक उत्तम असा पर्याय आहे. या ठिकाणाची गंगा आरती तसेच घाटांचे सौंदर्य आणि अध्यात्मिक वातावरणात मन रमून जाते व मोठ्या प्रमाणावर आध्यात्मिक आनंदाचा अनुभव घेता येतो.
तसेच तुम्ही खवय्ये असाल तर तुम्हाला या ठिकाणी फिरताना बनारसी जेवणाची देखील चव चाखता येते. शॉपिंग देखील या ठिकाणी उत्तम प्रकारे करता येऊ शकते.
कारण शॉपिंगचे अनेक पर्याय याठिकाणी उपलब्ध आहेत. वाराणसीमध्ये फिरताना त्या ठिकाणाच्या अरुंद अशा गल्या आणि त्यामध्ये विकले जाणारे उत्तम असे पदार्थ तुमची ट्रिप आणखीनच खास बनवतात.
3- आग्रा- आग्रा आपल्या सगळ्यांना माहिती आहे व आग्रा म्हटले म्हणजे आपल्या डोळ्यासमोर पटकन ताजमहाल येतो. परंतु इतकेच या शहराचे वैशिष्ट्य नसून या ठिकाणी असलेली इतर किल्ले तसेच बाग बगीचे आणि बाजारपेठा देखील विशेष आकर्षण आहेत.
हिवाळ्यात देखील या ठिकाणाचे हवामान अतिशय अल्हाददायक असते व मनाला भुरळ घालते. त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसात जर तुम्ही आग्र्याला गेला तर आरामात फिरता येते व आग्रा शहराचे सौंदर्याचा आनंद तुम्हाला घेता येऊ शकतो
ताजमहाल पाहण्यासोबतच आग्र्याला मेहताब बाग, आग्र्याचा किल्ला तसेच इतीमाद उद दौलाचा मकबरा,जामा मशीद आणि फतेपुर सिक्री ऐतिहासिक समृद्ध ठिकाणांना देखील भेट देता येते.
4- पिंक सिटी अर्थात जयपुर- आपल्याला माहित आहे की राजस्थान राज्यातील जयपूर या शहराला गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते. जयपुर शहराचा एक खास इतिहास तसेच तिथली संस्कृती आणि आधुनिकता यांचा एक अनोखा संगम आपल्याला पाहायला मिळतो.
हिवाळ्यामध्ये थंडी असताना देखील या ठिकाणी आरामात फिरता येणे शक्य आहे. जयपुर मध्ये गेल्यावर त्या ठिकाणचा आमेर किल्ला, जल महल, सिटी पॅलेस आणि नहारगड किल्ला असे अनेक ऐतिहासिक समृद्ध व प्रेक्षणीय स्थळे आपल्याला बघता येतात.