नवी दिल्ली : काश्मीरवर दबाव निर्माण करण्यासाठी पाकिस्तान अनेक प्रकारचे प्रयत्न करत आहे. कूटनीतीत अपयशी झाल्यानंतर युध्द आणि अणुहल्ल्यांची धमकी देणाऱ्या पाकने आता सैन्यस्तरावर आपली मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
एका अहवालानुसार, पाकिस्तानी सेना बालटोरो सेक्टरमध्ये स्कार्डू परिसरात मोर्चांवर बंकर तयार करत आहे. पाकच्या ताब्यातील पीओकेमध्ये येणारा हा परिसर जवळपास कारगीलच्या समोर आहे आणि हा नियंत्रण सीमेच्या जवळ आहे.

पाक सेनेकडून तयारीसाठी बंकरची लांबी-रुंदी १० बाय १२ फूट आणि २० बाय १२ फूट आहे. यातील सहा बंकर तयार होण्याच्या स्थितीत आहेत. संरक्षण सूत्रानुसार, पाक सेनेची संख्या वाढणे अथवा दारूगोळा जमा करण्यासाठी यांचा वापर करू शकतो.
स्कार्डू पाक वायू सेनेचे सैन्य ठिकाण आहे आणि पाकिस्तान या एअरबेसचा वापर भारताविरोधात आपल्या सैन्य अभियानात मदतीसाठी करतो. नुकतेच पाकने लडाखच्या जवळ आपल्या ठिकाणांवर सैन्य उपकरणे आणि साहित्यांत वाढ केली आहे.
मात्र, त्यांच्या हालचालीवर भारतीय सुरक्षा संस्थेची करडी नजर आहे. जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्द केल्यापासून पाक बेचैन आहे आणि काय करावे हे त्याला कळत नाही. पाकने हा मुद्दा पहिले संयुक्त राष्ट्रासहित आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडण्याचा प्रयत्न केला.
मात्र, त्याची सर्व कुटनीती अपयशी ठरली. जगभरातील कुठल्याही देशाने काश्मीरवर त्याला समर्थन केले नाही.
- प्रतीक्षा संपली! Nothing Phone 3 कधी होणार लाँच? काय असतील स्पेसिफिकेशन्स?; वाचा A टू Z माहिती
- Nothing च्या CMF Phone 2 Pro मध्ये असणार ‘Everything’; लाँचआधीच किंमत आणि फीचर्समुळे मार्केटमध्ये खळबळ
- अक्षय तृतीयाला एक डझन हापूस आंब्यासाठी मोजावे लागणार ‘इतके’ रुपये ! भाव कमी होणार की वाढणार ? वाचा…
- Samsung Galaxy M56 5G : AI फीचर्स, मोठी बॅटरी आणि बरंच काही!Samsung चा नवीन फोन खरेदी करा फक्त 27,999 रुपयांत
- 50MP कॅमेरा आणि 45W चार्जिंग! Samsung Galaxy S24 आता आकर्षक किंमतीत, Amazon वर मिळतेय 30% पर्यंत सूट