RBI New Rule:- देशातील सर्व बँकिंग क्षेत्रातील सगळ्यात महत्त्वाचे नियम हे रिझर्व बँकेच्या माध्यमातून तयार केले जातात व त्या अमलात आणले जातात. देशातील सर्व बँकांना ते बंधनकारक असतात. तसेच बँकिंग क्षेत्राशी संबंधित काही नियमांमध्ये जर बदल करायचा असेल तर तो अधिकार देखील भारतीय रिझर्व बँकेलाच आहे
व अगदी याच प्रमाणे आजपासून म्हणजे 1 जानेवारीपासून बँकिंग क्षेत्राशी संबंधित काही नियमांमध्ये रिझर्व बँकेच्या माध्यमातून बदल करण्यात आलेला आहे व त्या बदलांचा परिणाम हा देशातील नागरिकांवर होण्याची शक्यता आहे. त्यातील जर आपण एक नियम बघितला तर तो बँक खात्यांशी संबंधित असून आता काही प्रकारचे बँक खाते ही बंद केली जाणार आहेत.
सध्या जर आपण आर्थिक फसवणुकीच्या घटना बघितल्या तर त्या मोठ्या प्रमाणावर घडताना दिसून येत आहेत व त्यामुळे अशा प्रकारचे जे काही फसवणुकीचे प्रकरण आहेत त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे.
त्यामुळे कोणत्या प्रकारची बँक खाती ही बंद केली जाणार? याबाबतची माहिती आपण थोडक्यात बघू.
एक जानेवारीपासून तीन प्रकारचे बँक खाते होणार बंद
1- इन ऍक्टिव्ह खाती- यामध्ये अशा खात्यांचा समावेश होतो ज्या खात्यामध्ये गेल्या बारा महिन्यांपासून किंवा जास्त कालावधीपासून कोणत्याही प्रकारचा व्यवहार झालेला नाही. एखाद्या खातेधारकाने जर एक वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी करिता एखाद्या खात्यामधून जर कुठल्याही प्रकारचा व्यवहार केला नसेल तर हे खाते इन ऍक्टिव्ह कॅटेगरीमध्ये टाकले जाईल.
तुमचे जर अशा प्रकारचे खाते असेल तर तुम्ही बँकेशी संपर्क करून त्याला ऍक्टिव्ह देखील करू शकतात. परंतु फसवणुकीच्या प्रकरणापासून वाचण्याकरता हा निर्णय महत्त्वाचा आहे.
2- झिरो बॅलन्स अकाउंट- यामध्ये अशा बँक खात्यांचा समावेश होतो की त्यांच्यामध्ये दीर्घ कालावधीपासून शिल्लक रक्कम ही शून्य असते. अशी खाती देखील आता या नवीन निर्णयानुसार बंद केले जाणार आहेत. बँक खात्यांचा दुरुपयोग टाळण्याकरिता हे पाऊल खूप महत्त्वाचे ठरणार आहे.
तसेच खातेधारकांनी अशा प्रकारच्या बँक खात्यांचा वापर करण्यासाठी देखील प्रोत्साहन मिळवण्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय फायद्याचा ठरणार आहे.
त्यामुळे तुमच्या देखील बँक खात्यामध्ये दीर्घ काळापासून कुठल्याही प्रकारचे ट्रांजेक्शन झाले नसेल तर तुम्ही तुमच्या बँक शाखेत जाऊन केवायसी करून घेणे गरजेचे आहे.
3- डॉरमॅट अकाउंट- यामध्ये अशा खात्यांचा समावेश होतो की ज्या खात्यामध्ये दोन वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी साठी कुठल्याही प्रकारचा व्यवहार झाला नाही. या प्रकारची खाती प्रामुख्याने सायबर गुन्हेगारांच्या निशाणावर असतात
व अशा गुन्हेगारांकडून अशा प्रकारची बँक खाते हॅक होण्याची शक्यता असते व ते लोक अशा खात्याचा वापर लोकांच्या फसवणुकीसाठी करू शकतात. त्यामुळे या प्रकारचे खाते देखील आता बंद होणार आहेत.