Ahilyanagar News : शनिवारपासून अहिल्यानगर महानगरपालिकेचे स्वच्छता अभियान सुरू

दर शनिवारी अधिकारी, कर्मचारी राबवणार अभियान ! नागरीक, सामाजिक संघटनांना सहभागी होण्याचे आवाहन

Ahmednagarlive24
Published:

Ahilyanagar News : अहिल्यानगर महानगरपालिकेचे शहर स्वच्छता अभियान येत्या शनिवारपासून सुरू होत आहे. दर शनिवारी शहराच्या एकेका भागात अधिकारी, कर्मचारी सहभागी होणार आहेत. शहरातील नागरिक, सामाजिक संघटनांनी या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे.

नव्या वर्षात शहर स्वच्छतेसाठी महानगरपालिकेने संकल्प केला आहे. अहिल्यानगर शहर स्वच्छ शहर म्हणून ओळखले जावे, यासाठी नागरीक, सामाजिक संघटनांच्या सहकार्यातून, सहभागातून हे अभियान हाती घेण्यात आले आहे. प्रत्येक शनिवारी शहर व उपनगराच्या एकेका भागात हे अभियान राबविण्यात येणार आहे.

येत्या शनिवारी ४ जानेवारी रोजी स्टेट बँक चौक ते चांदणी चौक दरम्यान स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. या भागात अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली होती. यात या रस्त्यालगत असलेली अतिक्रमणे हटविली होती. त्यामुळे या भागात स्वच्छता अभियान राबवून परिसर स्वच्छ करण्यात येणार आहे. नागरीक, सामाजिक संघटनेने या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन आयुक्त यशवंत डांगे यांनी केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe