2 january 2025 Horoscope:- आज नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणजेच एक जानेवारी 2025 असून सगळ्यांनी आज नवीन वर्षाचे स्वागत केले व अनेक नवनवीन गोष्टी करण्याचा संकल्प देखील केला असेल. म्हणजे आजपासून नवीन वर्षाला सुरुवात झाली आणि उद्या 2 जानेवारी 2025 वार गुरुवार असून हा नवीन वर्षाचा दुसरा दिवस आहे.
त्यामुळे या नवीन वर्षाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 2 जानेवारी 2025 वार गुरुवार हा कोणत्या राशीच्या व्यक्तींसाठी फायद्याचा ठरेल किंवा कोणत्या राशींच्या व्यक्तींना काय नुकसान होऊ शकते? याबद्दलची माहिती आपण थोडक्यात बघू.
2 जानेवारी 2025 चे राशीभविष्य
1- मेष राशी- या राशींच्या व्यक्तींचा नवनवीन ज्ञान गोळा करण्याकडे कल असल्याचे आपल्याला दिसून येईल व अनेक प्रश्नांची उकल करण्यामध्ये ते यशस्वी होतील. स्वतःसाठी वेळ काढणे महत्त्वाचे आहे व तज्ञ लोकांशी संपर्क साधावा.
2- वृषभ राशी- या राशींच्या व्यक्तींनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे व बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे. स्त्री वर्गाशी जरा जपूनच वागणे फायद्याचे ठरेल तसेच सहकाऱ्यांशी संबंध जसे ठेवावे व त्याप्रमाणेच वागावे. उगीचच काही गोष्टींमुळे हुरळून जाऊ नये.
3- मिथुन राशी- तुमच्यासाठी आजचा दिवस खूप ताजातवाना नसणार आहे व नवविवाहितांना काही सरप्राईज मिळण्याची शक्यता आहे.तसेच व्यावसायिकांना चांगला फायदा मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या वरिष्ठांकडून तुमचे कौतुक होईल व चारचौघात देखील कौतुक केले जाईल.
4- कर्क राशी- या राशींच्या व्यक्तींनी विरोधकांपासून सावध राहावे. तुमचे काही छुपे शत्रू तुम्हाला त्रास देऊ शकतात. वाहन चालवताना काळजी घ्यावी. मनाचे चंचल अवस्था असेल तर त्याला आवर घालावा.
5- सिंह राशी- व्यापाऱ्यांच्या दृष्टिकोनातून हा दिवस खूप फलदायी असणार आहे तसेच नवनवीन संधी तुम्हाला मिळतील. विद्यार्थ्यांना काही आव्हान या दिवशी स्वीकारता येईल. एकाग्रता वाढण्यामध्ये खूप मोठी मदत होईल व तुम्ही जोडीदाराला खुश ठेवू शकाल.
6- कन्या राशी- जमिनीच्या संबंधित काही व्यवहार असतील तर ते पूर्ण होतील व कौटुंबिक जीवनात चांगले परिणाम पाहायला मिळतील. कुटुंबा सोबत चांगला वेळ घालवू शकाल व मन देखील प्रसन्न राहील.
7- तूळ राशी- तुमच्यातली ऊर्जा पाहून इतर लोक अचंबित होतील. तसेच तुमचे सहकारी वर्ग तुमच्यावर प्रभावित होईल व कामासंबंधी प्रवास करावा लागण्याची शक्यता आहे व ओळखीचे लोक भेटू शकतात.
8- वृश्चिक राशी- कर्ज असेल तर ते फेडता येईल. नवीन गुंतवणूक करता येईल. गुंतवणूक करायची असेल तर मात्र सावधानता ठेवावी व बोलण्यात गोडवा ठेवाल. तुमच्या आवडीच्या गोष्टी करू शकाल.
9- धनु राशी- बुद्धीच्या जोरावर नवनवीन कामे करू शकाल व दिवस मनासारखा जाईल. तुमचे आवडते छंद जोपासायला तुम्हाला संधी मिळेल तसेच मानसिक दृष्ट्या तुम्ही सक्षम व्हाल.
10- मकर राशी- काही कामे प्रलंबित असतील तर ती पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. अनावश्क खर्च केला जाऊ शकतो तसेच जुना विचारात अडकून राहू नका. नकारात्मकता असेल तर ती दूर करावी. दूरच्या नातेवाईकांशी संपर्क होऊ शकतो.
11- कुंभ राशी- विविध स्तरातून तुम्हाला फायदा होऊ शकतो. मनातील इच्छा पूर्ण कराल. जवळच्या मित्रांची भेट होईल व गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतो. शेअर बाजारातून देखील नफा मिळू शकतो.
12- मीन राशी- रखडलेले कामे पूर्ण होण्यास मदत होईल.तसेच वैयक्तिक काम तडीस न्याल. वडिलांशी संबंध सुधारणांमध्ये मदत होईल. तुमच्या मनाची चंचलता तुमच्या कामाच्या आड आणू नका. तुमच्या हातातील कामातून तुम्हाला समाधान मिळेल.