बॉक्स ऑफिसवर ‘कबीर सिंह’चा धडाका सुरूच आहे. चित्रपटाने १५० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. प्रदर्शनानंतरच्या दुसऱ्या शनिवारी चित्रपटाने १७.१० कोटी रुपये एवढा व्यवसाय केला.
‘कबीर सिंह’ची घोडदौड अगदी जोरात सुरू आहे. चित्रपटाच्या कमाईचा आकडा १६३ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला असून, मधल्या काळात चित्रपटाने अनेक विक्रम मोडले आहेत. तिकडे ‘अॅनाबेल कम्स होम’ या हॉलीवूडपटाने पहिल्या दिवशी ३ कोटी रुपये कमावले होते.

त्यानंतर चित्रपटाच्या कमाईत वाढ नोंदवण्यात आली. पहिल्या ३ दिवसांत चित्रपटाने १२.८० कोटी रुपयांची कमाई केली. ‘कबीर सिंह’चा धडाका असूनही अॅनाबेलने बॉक्स ऑफिसवर जम बसवल्याचे चित्र आहे.
‘आर्टिकल १५’ च्या व्यवसायाचा आकडाही १२.५० कोटी रुपयांवर पोहोचला असून, चित्रपटाची कामगिरी चांगली मानली जात आहे.
- भारतातले सर्वात मांसाहारी लोक ‘ह्या’ राज्यात राहतात ! नाश्ता करायला पण मटण-चिकन
- जिल्ह्यातील रेशनधारकांना तीन महिन्यांचे रेशन एकदाच मिळणार, जिल्हा पुरवठा विभागाकडून उपाययोजना सुरू
- 1 शेअरवर 1 बोनस ! 100% रिटर्न दिल्यानंतर कंपनीकडून बोनसचा वर्षाव
- जामखेड तालुक्याला प्रधानमंत्री आवास योजनेतून ५०९७ घरे मंजूर, लाभार्थ्यांना मोफत सौर पॅनेलही मिळणार!
- हवेत गायब झालेलं विमान ३५ वर्षांनी परतलं ! पण आत काय सापडलं ? पाहून अधिकारी हादरले…