Honda Elevate Black Edition:-होंडा कार्स ही प्रसिद्ध अशी जपानी ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी असून लवकरच या कंपनीच्या माध्यमातून होंडा एलेव्हेट ही एसयूव्ही सेगमेंट मधील कार विक्रीसाठी भारतीय बाजारात उपलब्ध होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार बघितले तर कंपनी या कारचे ब्लॅक एडिशन देखील बाजारात लॉन्च करू शकते.
होंडा कार्स द्वारे ऑफर केलेली होंडा एलिव्हेटची ब्लॅक एडिशन भारतीय बाजारात लॉन्च केली जाण्याची शक्यता असून यासंबंधीच्या बातम्या अनेक मीडिया रिपोर्ट्स मध्ये पाहायला मिळत आहे. परंतु कंपनीच्या माध्यमातून या संदर्भात अजून कोणत्याही प्रकारची अधिकृतरित्या माहिती देण्यात आलेली नाही.
कशी असेल होंडा एलिव्हेटची ब्लॅक एडिशन?
मिळालेल्या माहितीनुसार बघितले तर ही एसयुव्ही काळ्या रंगात स्पॉट झाली असून या कारच्या मागच्या बाजूला लिफ्टच्या खाली एक नवीन बॅज दिसतो.
परंतु जर बघितले तर या एसयूव्हीच्या बाहेरील डिझाईनमध्ये मात्र कोणत्याही प्रकारचे बदल करण्यात आलेले नाहीत. पण या कारचे अलॉय व्हील्स आणि पेंट स्कीम मात्र पूर्णपणे ब्लॅक ठेवण्यात आलेली आहे. इतकेच नाही तर या एसयूव्हीच्या एक्सटीरियर मध्ये ब्लॅक क्लेडिंग ही देण्यात येणार आहे.
कसे असू शकते इंजिन?
होंडाच्या या एसयूव्हीच्या इंजिनमध्ये मात्र कोणताही बदल होण्याचे अपेक्षा फारच कमी दिसून येत आहे. यामध्ये 1.5- लिटर क्षमतेचे अगोदर जे इंजिन आहे त्याचाच वापर केला जाईल अशी एक शक्यता आहे.
हे इंजिन या एसयूव्हीला 121 पीएस पावर अनेक 145 न्यूटन मीटरचा टॉर्क देते. तसेच यामध्ये मॅन्युअल आणि सीव्हीटी ट्रान्समिशनचा पर्याय देखील देण्यात येणार आहे.
होंडा एलिव्हेट ब्लॅक एडिशन भारतात कधी लॉन्च होऊ शकते?
भारतीय बाजारामध्येही एसयूव्ही कधी लॉन्च होईल याबाबत कंपनीकडून मात्र अधिकृतरित्या कुठल्याही प्रकारची माहिती अजून पर्यंत देण्यात आलेली नाही. पण तरीदेखील भारतामध्ये जर ही कार लॉन्च झाली तर ती 17 ते 22 जानेवारी दरम्यान होणाऱ्या भारत मोबिलिटी 2025 मध्ये आणली जाईल अशी एक शक्यता वर्तवण्यात येत आहे.
होंडा एलिव्हेटची ब्लॅक एडिशन बाजारात आल्यानंतर तीची प्रामुख्याने स्पर्धा ही ह्युंदाई क्रेटा नाईट एडिशन, एमजी हेक्टर ब्लॅक एडिशनशी असेल.
किती असेल किंमत?
होंडा एलिव्हेटची नियमित एक्स शोरूम किंमत ही 11 लाख 69 हजार रुपये पासून सुरू होते व तिच्या टॉप व्हेरिएंटची एक्स शोरूम किंमत 16 लाख 43 हजार रुपये आहे.
परंतु असे बोलले जात आहे की जर या कारची म्हणजेच होंडा एलिव्हेटची ब्लॅक एडिशन सादर केली गेली तर किमतीमध्ये काहीशी वाढ होऊ शकते.