Honeymoon Destination In India:- सध्या लग्नसराईचे सीजन सुरू असून यामध्ये जर तुमचे नवीनच लग्न झाले असेल व तुम्हाला हनिमून करिता एखाद्या सुंदर आणि स्वस्त अशा ठिकाणी जायचा प्लान असेल तर जगात खूप डेस्टिनेशन आहेत जी सुंदर तर आहेत परंतु महाग जास्त आहेत.
या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्हाला जर कमीत कमी खर्चामध्ये सुंदर अशा ठिकाणी हनिमून साजरा करायचा असेल तर तुम्ही भारतातील एका सुंदर अशा डेस्टिनेशनचा विचार करू शकता.
या ठिकाणी तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत फक्त पाच हजार रुपयांमध्ये देखील तुमचा हनिमून साजरा करू शकता. हे ठिकाण झारखंडमध्ये असून झारखंडची राजधानी रांची पासून अवघे चाळीस किलोमीटर अंतरावर आहे.
या ठिकाणचे किंवा या डेस्टिनेशनचे नाव मॅकक्लूस्कीगंज असून ते एक छोटेसे असे हिल स्टेशन म्हणून देखील ओळखले जाते. या ठिकाणाचे नैसर्गिक सौंदर्य अप्रतिम तर आहेच.
परंतु या ठिकाणी तुम्हाला सुंदर टेकड्या आणि नद्या पाहायला मिळतात व इतकेच नाहीतर ब्रिटिश काळातील जुने वाडे देखील या ठिकाणी बघता येतात.
या ठिकाणाला म्हटले जाते झारखंडचे मिनी लंडन
मॅकक्लूस्कीगंज हे ठिकाण झारखंडचे मिनी लंडन म्हणून देखील ओळखले जाते. या ठिकाणी जर तुम्ही गेलात तर फिरण्यासारखे बरेच स्पॉट तुम्हाला दिसून येतात.
या ठिकाणाची वास्तुकला अतिशय सुंदर अशी आहे व तुम्ही जर निसर्गप्रेमी असाल तर हे ठिकाण तुमच्यासाठी बेस्ट अशी डेस्टिनेशन आहे.
या ठिकाणी असलेली सुंदर जंगल तसेच चार ते पाच सुंदर नद्या तुम्हाला बघायला मिळतात. तुम्ही जर या ठिकाणी फिरायला गेलात तर तुम्ही हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड राज्यातील हिल स्टेशन देखील विसरून जाल.
हॉटेलच्या रूमसाठी किती खर्च करावा लागेल?
जर तुम्हाला हनिमून करिता स्वस्त आणि बजेट मधील ठिकाण हवे असेल तर तुम्ही मॅकक्लूस्कीगंज या ठिकाणी जाऊ शकतात. या ठिकाणी तुम्हाला तुमच्या बजेटनुसार रूम मिळू शकतात.
जर आपण रूमचे भाडे बघितले तर एका रूमची किंमत 1000 पासून या ठिकाणी सुरू होते व यामध्ये तुम्ही जर ऑनलाईन बुकिंग केली तर चांगली सूट देखील मिळू शकते.
तसेच या ठिकाणी खाण्यापिण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत व ते स्वस्त असे पर्याय आहेत. जर तुम्ही काटकसर मध्ये खर्च केला तर अगदी पाच हजार रुपयांमध्ये तुम्ही दोन ते तीन दिवसांची ट्रिप पूर्ण करू शकतात.
जोडीदारासोबत जाऊ शकतात पत्राटू व्हॅलीला
तुम्हाला जर उत्तम आणि अविस्मरणीय असा वेळ तुमच्या जोडीदारासोबत घालवायचा असेल तर रांची पासून 25 किलोमीटर असलेल्या पत्राटू व्हॅलीमध्ये जाऊ शकता.
या ठिकाणाला झारखंडची मनाली असे देखील म्हटले जाते. या ठिकाणी खूप कमी प्रमाणात गर्दी असते व तुम्हाला शांततेत वेळ घालवता येतो. तसेच तुम्हाला फिरण्यासाठी अनेक पर्याय याठिकाणी उपलब्ध आहेत.
जर तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला ट्रेकिंगची आवड असेल तर हे ठिकाण अतिशय उत्तम आहे. तसेच या ठिकाणी सुंदर अशा टेकड्या असून त्या ठिकाणाहून तुम्ही सुंदर सूर्यास्ताचे दर्शन घेऊ शकतात.
मॅकक्लूस्कीगंजला कसे जाल?
जर तुम्हाला ट्रेनने जायचे असेल तर तुम्हाला सगळ्यात अगोदर हावडा या ठिकाणी यावे लागते व हावडा येथून मॅकक्लूस्कीगंजला जाण्यासाठी नियमितपणे ट्रेन धावतात. तसेच तुम्हाला फ्लाईटने यायचे असेल तर या ठिकाणहून सर्वात जवळचे विमानतळ रांची हे आहे व हे विमानतळ येथून 53 किलोमीटरच्या आसपास आहे.
तसेच रांची येथून तुम्हाला बसने देखील या ठिकाणी जाता येते किंवा रांची वरून कार देखील भाड्याने मिळतात. जर तुम्ही कारने या ठिकाणी गेला तर तुम्हाला सुंदर अशा जंगलांचे दर्शन होते व निसर्गाचा देखील आस्वाद घेता येऊ शकतो.