Post Office Scheme:- गुंतवणुकीसाठी सध्या सगळ्यात मोठ्या प्रमाणावर पोस्ट ऑफिसच्या अनेक बचत योजनांना प्राधान्य दिले जात आहे. कारण जर आपण बघितले तर बँकिंग क्षेत्रातील सेवेपेक्षा पोस्टाच्या योजनेमध्ये गुंतवणूक केल्याने जास्तीचे फायदे मिळताना दिसून येत आहेत.
त्यामुळे गुंतवणूकदारांचा ओघ सध्या पोस्टाच्या बचत योजनांकडे असल्याचे आपल्याला दिसत आहे. पोस्ट ऑफिस अनेक प्रकारच्या बचत योजना राबवते.तसेच काही मुदत ठेव योजना देखील राबवते व या माध्यमातून आकर्षक असा व्याजदर मिळत असल्याने परतावा देखील चांगला मिळतो.
त्यामुळे तुम्हाला देखील गुंतवणूक करायचे आहे व तुम्ही पोस्ट ऑफिसची योजना शोधत आहात तर या लेखामध्ये पोस्टाच्या अशाच एका योजनेची माहिती दिली आहे जी गुंतवणुकीच्या दृष्टीतून खूप फायद्याची अशी योजना आहे.
पोस्ट ऑफिसची आरडी अर्थात आवर्ती ठेव योजना आहे फायद्याची
पोस्ट ऑफिसच्या अनेक गुंतवणूक योजनांपैकी पोस्ट ऑफिसची आवर्ती ठेव योजना म्हणजेच आरडी योजना ही खूप महत्त्वाची अशी योजना आहे व ही योजना एखाद्या पिगी बँकेप्रमाणे काम करते.
या योजनेत तुम्ही एक निश्चित रक्कम दरमहा जमा करू शकता आणि ही योजना परिपक्व अर्थात मॅच्युअर झाल्यानंतर तुम्ही जमा केलेली रक्कम तुम्हाला व्याजासह परत मिळते.
पोस्ट ऑफिसची ही योजना अशा गुंतवणूकदारांसाठी खास पर्याय आहे जे आजपासून आपल्या कमाईतील थोडीशी बचत स्वतःच्या भविष्यासाठी करतात व त्यासाठी गुंतवणूक पर्याय शोधत असतात. अशा व्यक्तीने जर पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट स्कीम अर्थात आवर्ती ठेव योजनेमध्ये गुंतवणूक केली तर भविष्यासाठी मोठा निधी उभा करता येऊ शकतो.
किती मिळतो पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव योजनेत व्याजदर?
पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव योजना ही एक सुरक्षित योजना आहे. या योजनेमध्ये तुम्ही तुमचे पैसे गुंतवल्यावर ते पैसे सुरक्षित राहण्याची खात्री तुम्हाला राहते. या योजनेचा कालावधी पाच वर्षाचा आहे व यामध्ये तुम्हाला प्रत्येक महिन्याला एक निश्चित रक्कम जमा करावी लागते.
सध्या पोस्ट ऑफिस आरडीवर 6.7% दराने व्याजाचा लाभ मिळत आहे. सरकारच्या माध्यमातून हे व्याज तिमाही आधारावर मोजले जाते. जर तुमची इच्छा असेल तर पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर तुम्ही ही योजना आणखी पाच वर्षांनी वाढवू शकतात.
दरमहा सात हजार रुपये जमा केल्यास कसे मिळू शकतात बारा लाख?
जर तुम्ही पोस्टाच्या या योजनेमध्ये प्रत्येक महिन्याला तुम्ही सात हजार रुपयांची गुंतवणूक करायचे ठरवले तर तुम्हाला ती सलग पाच वर्षे करावी लागेल व त्यावर 6.7 टक्के दराने व्याजाचा लाभ मिळेल. यानुसार तुमची पाच वर्षातील एकूण गुंतवणूक चार लाख वीस हजार इतकी होते.
यामध्ये तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण चार लाख 99 हजार 564 रुपये असे एकूण रक्कम मिळते. यामध्ये तुम्हाला 79,564 व्याज मिळते. जर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या या योजनेच्या खात्याचे पाच वर्षासाठी मुदत वाढ केली म्हणजेच हे खाते पाच वर्षासाठी एक्सटेंड केले तर तुम्ही सलग दहा वर्षे यामध्ये गुंतवणूक करू शकता
व महिन्याला सात हजार याप्रमाणे तुमची एकूण गुंतवणूक आठ लाख 40 हजार रुपये होते व त्यावर तुम्हाला तीन लाख 55 हजार 982 रुपये फक्त व्याजातून मिळतात.
म्हणजे तुमची दहा वर्षाची एकूण मुद्दल आठ लाख 40 हजार आणि त्यावरील तीन लाख 55 हजार 982 रुपये व्याज असे मिळून तुम्हाला दहा वर्षात 11 लाख 95 हजार 982 परतावा मिळतो.
परंतु पोस्ट ऑफिस आरडी योजनेच्या खात्याची मुदतवाढ किंवा वेळ परत पाच वर्षासाठी वाढवायचा असेल तर तुम्हाला तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन अर्ज करावा लागतो. तुम्ही जर सलग तीन वर्षासाठी यामध्ये गुंतवणूक केली तरी तुम्हाला 6.7 टक्के दराने व्याजाचा संपूर्ण लाभ मिळतो.