Upcoming Hybrid Car In 2025:- सध्या जर भारतीय वाहन बाजारपेठ आपण बघितली तर यामध्ये अनेक नवनवीन अशी वाहने अत्याधुनिक वैशिष्ट्या सहित आणि परवडणाऱ्या किमतींमध्ये लॉन्च करण्यात येत आहेत व यामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून उत्तम अशी वैशिष्ट्य असलेल्या कार्स देखील लॉन्च करण्यात आलेले आहेत.
यामध्ये सध्या जर आपण बघितले तर इलेक्ट्रिक वाहनांची मागणी आता वाढत आहे व त्यामुळे इलेक्ट्रिक वाहने देखील मोठ्या प्रमाणावर लॉन्च करण्यात येत आहेत.
त्यासोबतच सीएनजी वाहनांची देखील मागणी वाढत आहे व हायब्रीड कारच्या मागणींमध्ये देखील दिवसेंदिवस वाढ होताना आपल्याला दिसून येत आहे. हायब्रीड कारच्या अनुषंगाने बघितले तर वाढती मागणी लक्षात घेऊन आता अनेक कंपन्यांच्या माध्यमातून नवीन हायब्रीड कार लॉन्च करण्याची तयारी सुरू आहे
व या नवीन वर्षामध्ये नामवंत अशा कंपन्यांकडून काही हायब्रीड कार्स लॉन्च करण्यात येणार आहेत. त्या नेमक्या कोणत्या कार्स असणार? याबाबतची माहिती आपण या लेखात बघू.
लवकरच लॉन्च होणार या हायब्रीड कार
1- मारुती ग्रँड विटारा- मारुती सुझुकी कंपनीच्या माध्यमातून ग्रँड विटाराचे सात सीटर मॉडेल लाँच केले जाणार असून ही कार टोयोटा हेराईडची रीबॅज केलेले व्हर्जन आहे.
या वर्षांमध्ये ग्रँड विटाराचे सात सीटर मॉडेल लॉन्च होण्याची शक्यता असून या कारची किंमत 18.5 लाख रुपये असण्याची शक्यता आहे.
2- किया सेल्टोस हायब्रीड कार- जर मीडिया रिपोर्ट बघितले तर किया ही कंपनी तिच्या लोकप्रिय सब कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेल्टोसच्या हायब्रीड व्हर्जन वर सध्या काम करत असून लवकरच कीया सेल्टोसची हायब्रीड कार इंडियन मार्केटमध्ये लॉन्च केली जाण्याची शक्यता आहे.
सध्या या कारची लोकप्रियता आणि हायब्रीड कारची वाढती क्रेझ पाहता ही कार लॉन्च केली जाण्याची शक्यता असून या कारची एक्स शोरूम किंमत 15 लाख रुपये असेल अशी शक्यता आहे.
3- टोयोटा हायरायडर- टोयोटा कंपनीची हायरायडर ही पाच सीटर एसयुव्ही कार असून ग्राहकांमध्ये ही प्रचंड अशी लोकप्रिय कार आहे व आतापर्यंत या कारचे एक लाखापेक्षा जास्त युनिट विकले गेले आहेत.
या सगळ्या पार्श्वभूमीवर या कारचे हायब्रीड सात सिटर मॉडेल आता कंपनी लॉन्च करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे व या वर्षात ही कार लॉन्च होऊ शकते. या कारच्या सात सीटर मॉडेलची एक्स शोरूम किंमत 17 लाख रुपये असू शकते.
4- मारुती आणणार छोटी हायब्रीड कार- मारुती सुझुकी म्हटले म्हणजे कायम नवनवीन वैशिष्ट्ये असलेल्या आणि प्रत्येक सेगमेंट मधील नवनवीन कार लॉन्च करते.
अगदी त्याचप्रमाणे आता ही कंपनी एक छोटी आणि परवडू शकेल अशी हायब्रीड कार लॉन्च करेल अशी एक शक्यता आहे. मारुती 2025 मध्ये हायब्रीड पावरट्रेनमध्ये स्विफ्ट किंवा फॉर्ड लॉन्च करू शकते व तिची किंमत 8.5 लाख रुपये असण्याची शक्यता आहे.
हायब्रीड कार म्हणजे नेमके काय?
हायब्रीड कार म्हणजे इलेक्ट्रिक वाहन आणि इंधन वाहनाचे एक मिश्रण असते व ही कार इंधन वाहनांपेक्षा चांगली मायलेज देते. जर आपण हायब्रीड कार प्रणालीची काम करण्याची पद्धत पाहिली तर या कार दोन मोटर्सने सुसज्ज असतात व यापैकी हायब्रीड कारमध्ये पहिले पेट्रोल इंजिन आहे तुम्हाला सामान्य इंधन इंजिन असलेल्या कार सारखे दिसते.
तर दुसरे इलेक्ट्रिक मोटर इंजिन आहे जे तुम्हाला इलेक्ट्रिक वाहनांमध्ये पाहायला मिळते. यामध्ये दोन्ही इंजिनचा उपयोग कार चालवण्यासाठी होतो व जेव्हा कार फ्युएल इंजिन मधून चालते तेव्हा त्या कारच्या बॅटरीला देखील पावर मिळते
व ती आपोआप चार्ज होते. जेव्हा गरज पडते तेव्हा अतिरिक्त पावर म्हणून हे इंजिन देखील वापरले जाऊ शकतात. हायब्रीड कारमध्ये सिरीज हायब्रीड कार आणि पॅरलल हायब्रीड कार असे दोन प्रकार असतात.
पॅरलल हायब्रीड कार बद्दल पाहिले तर यामध्ये कारला इंधन मोटर आणि इलेक्ट्रिक मोटर या दोन्हींमधून ऊर्जा मिळते व त्या अधिक कार्यक्षमपणे काम करतात.तर सिरीज हायब्रीड कारमध्ये इंधन मोटर इंजिन मोटर तसेच बॅटरीला पावर देते व जेव्हा इंधन इंजिन बंद केले जाते तेव्हा कारला बॅटरी पॅक मधून ऑटोमॅटिक ऊर्जा मिळते.