एफडीतून पैसे कमवण्याची मोठी संधी! ‘या’ सरकारी बँकेने आणल्या दोन आकर्षक एफडी योजना

मुदत ठेव म्हणजेच फिक्स डिपॉझिट हा एक गुंतवणुकीचा सर्वात जुना आणि लोकप्रिय असा पर्याय आहे व कित्येक वर्षापासून गुंतवणूकदारांकडून एफडी करण्याला प्राधान्य दिले जाते. गुंतवणूक सुरक्षित राहण्याच्या दृष्टिकोनातून एफडी खूप महत्त्वाची असते व परतावा देखील चांगला मिळतो.

Ajay Patil
Published:
fd scheme

PNB Bank FD:- मुदत ठेव म्हणजेच फिक्स डिपॉझिट हा एक गुंतवणुकीचा सर्वात जुना आणि लोकप्रिय असा पर्याय आहे व कित्येक वर्षापासून गुंतवणूकदारांकडून एफडी करण्याला प्राधान्य दिले जाते. गुंतवणूक सुरक्षित राहण्याच्या दृष्टिकोनातून एफडी खूप महत्त्वाची असते व परतावा देखील चांगला मिळतो.

आपल्याला माहित आहे की,प्रत्येक बँकांच्या माध्यमातून आकर्षक अशा एफडी योजना राबवल्या जातात व यामध्ये सरकारी आणि खाजगी बँकांचा देखील समावेश होतो. तुम्ही किती कालावधीसाठी एफडी करत आहात त्यानुसार व्याजदर हा ठरत असतो.

या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्हाला देखील जर एफडी करायची असेल तर पंजाब नॅशनल बँकेच्या माध्यमातून दोन वेगवेगळ्या कालावधीच्या मुदत ठेव योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत.

याचा कालावधी जर बघितला तर तो 303 दिवस आणि पाचशे सहा दिवसांचा आहे व या मुदत ठेव योजनांमध्ये तीन कोटी रुपये पर्यंतची गुंतवणूक गुंतवणूकदारांना करता येणार आहे.

पंजाब नॅशनल बँकेच्या नवीन एफडी योजनांचे स्वरूप
पंजाब नॅशनल बँकेच्या माध्यमातून कालावधीनुसार दोन नवीन मुदत ठेव योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत व यामध्ये एक तीनशे तीन दिवसांची व दुसरी पाचशे सहा दिवसांची योजना असून यामध्ये गुंतवणूकदारांना तीन कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येणार आहे.

समजा यामध्ये तुम्ही जर तीनशे तीन दिवसाच्या कालावधीच्या एफडी मध्ये पैसा जमा केला तर तुम्हाला सात टक्क्यांचे व्याज मिळेल. आणि पाचशे सहा दिवसांच्या कालावधी करिता जर एफडी केली तर 6.7 टक्के व्याज मिळणार असून हे नवीन व्याजदर एक जानेवारी 2025 पासून बँकेने लागू केले आहेत.

तसेच या दोन्हीही कालावधीच्या एफडीमध्ये जर ज्येष्ठ आणि सुपर किंवा अति ज्येष्ठ नागरिकांनी एफडी केली तर त्यांना जास्त व्याजाचा लाभ मिळणार आहे.

ज्येष्ठ नागरिकांना 303 दिवसांच्या एफडीवर 7.55% तर 506 दिवसांच्या एफडीवर 7.2% इतके व्याज देईल तर अति म्हणजे सुपर जेष्ठ नागरिकांना तीनशे तीन दिवसांच्या एफडीवर 7.85% तर पाचशे सहा दिवसांच्या एफडीवर 7.5% इतके व्याज मिळणार आहे.

सामान्य ग्राहकांना किती मिळेल व्याजदर?
सामान्य नागरिकांना पंजाब नॅशनल बँकेने सात दिवसांच्या कालावधीपासून ते दहा वर्षापर्यंतच्या कालावधीपर्यंत एफडी ऑफर केली आहे.या कालावधीमध्ये बँक 3.50 टक्क्यांपासून ते 7.25% पर्यंत व्याज देत आहे.

बँकेकडून सर्वाधिक व्याजदर हा 7.25% इतका असून तो चारशे दिवसांच्या कालावधीच्या एफडीवर सध्या उपलब्ध आहे. ज्येष्ठ नागरिकांनी एफडी केली तर पंजाब नॅशनल बँक सात दिवस ते दहा वर्षाच्या एफडीवर चार टक्क्यांपासून ते 7.75 टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे

व चारशे दिवसांच्या एफडीवर सर्वाधिक 7.75 टक्के व्याज दिले जाणार आहे. इतकेच नाहीतर 80 वर्ष किंवा त्यावरील जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी पंजाब नॅशनल बँक सात दिवस ते दहा वर्षाच्या एफडीवर 4.30% ते 8.05% व्याज देत आहे.सध्या सुपर जेष्ठ नागरिकांसाठी चारशे दिवसाच्या कालावधीवर 8.05% इतके व्याज देत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe