घर भाड्यावर देतांना फक्त ‘ही’ छोटीशी चूक केली तरी लाखोंचे नुकसान सहन करावे लागणार!

भारतात प्रतिकूल ताबा कायदा लागू आहे. या अंतर्गत जर एखाद्या मालमत्तेवर एखादा व्यक्ती सलग 12 वर्षांपासून राहत असेल तर त्याला त्या जागेवर दावा ठोकता येतो. समजा, तुमच्या मालमत्तेवर भाडेकरू तब्बल 12 वर्षांपासून स्वतःचा हक्क सांगत असेल तर, न्यायालय त्याची बाजू घेण्यास सक्षम राहते. त्यामुळे घरमालकांनो तुम्हाला सावध राहून घर भाड्याने देण्यापूर्वी योग्य ती खबरदारी घ्यावी लागेल.

Tejas B Shelar
Published:

भारतात गुंतवणुकीसाठी स्थावर मालमत्तेत इन्व्हेस्ट करणाऱ्यांची संख्या फारच अधिक आहे, अनेकजण जमीन, घर, फ्लॅट, प्लॉट, दुकान अशा स्थावर मालमत्तेमध्ये गुंतवणूक करत असून यातून त्यांना चांगला लाभ सुद्धा मिळतोयं. कारण की रियल इस्टेट क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून सातत्याने वाढ पाहायला मिळत आहे. दुसरीकडे काही लोक त्यांच्याकडे असणारी स्थावर मालमत्ता भाड्याने देऊन एक फिक्स इन्कम सुद्धा कमवत आहेत. म्हणजे यात गुंतवणूकदार पैसा गुंतवून डबल फायदा मिळवतात.

खरे तर स्थावर मालमत्ता चोरीला जाऊ शकत नाही, यामुळे सोने, चांदीमध्ये गुंतवणूक करण्याऐवजी स्थावर मालमत्ता मध्ये गुंतवणूक करावी असा सल्ला जाणकार लोकही देतात. पण जमीन, घर, फ्लॅट, प्लॉट, दुकान जर तुम्ही भाड्याने देत असाल तर तुमची एक चूक तुमच्याकडून सर्व काही काढून घेऊ शकते. तुम्ही एका झटक्यात तुमच्याकडे असणारी करोडो रुपयांची स्थावर मालमत्ता गमावू शकता. तुमच्या स्थावर मालमत्तेवर कोणी दुसऱ्या व्यक्तीने कायमचा जम बसवला किंवा तुमच्या मालमत्तेवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला तर तुमची दमछाट होऊ शकते.

मंडळी अनेकांना आपली मालमत्ता भाडे तत्त्वावर देताना भाडेकरार करावा लागतो या साध्या गोष्टीची माहिती नसते. म्हणूनचं आज आपण घर किंवा इतर स्थावर मालमत्ता भाडेतत्त्वावर दिलेली असेल तर काय काळजी घ्यायला हवी? भाडेकरू कधी अन कसा प्रॉपर्टीचा मालक होऊ शकतो? भाडेकरू घराचा मालक होऊ नये यासाठी काय करायला हवे ? या मुद्द्यांची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

मंडळी, भारतात प्रतिकूल ताबा कायदा लागू आहे. या अंतर्गत जर एखाद्या मालमत्तेवर एखादा व्यक्ती सलग 12 वर्षांपासून राहत असेल तर त्याला त्या जागेवर दावा ठोकता येतो. समजा, तुमच्या मालमत्तेवर भाडेकरू तब्बल 12 वर्षांपासून स्वतःचा हक्क सांगत असेल तर, न्यायालय त्याची बाजू घेण्यास सक्षम राहते. त्यामुळे घरमालकांनो तुम्हाला सावध राहून घर भाड्याने देण्यापूर्वी योग्य ती खबरदारी घ्यावी लागेल.

जो व्यक्ती 12 वर्षांपासून एकाच मालमत्तेवर स्थिर झाला असेल तो अगदी भाडेकरू जरी असला तरीही 12 वर्षानंतर तो घरमालकाच्या घरावर स्वतःचा हक्क बजाऊ शकतो. एवढंच नाही तर प्रतिकूल ताब्याअंतर्गत तो दुसऱ्याच्या मालमत्तेला स्वतःची मालमत्ता बनवून इतर व्यक्तीला विकू देखील शकतो. आतापर्यंत एका छोट्याशा चुकीमुळे अन निष्काळजीपणामुळे अनेकांच्या हातातून घर, जमिनी आणि भाड्याने दिलेली दुकाने बळकावली गेली आहेत. अशा अनेक बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

आपल्या राज्यात सुद्धा अशी काही प्रकरणे समोर आली आहेत. प्रतिकूल ताबा कायदा हा केवळ वैयक्तिक मालमत्तेलाच लागू होतो, सरकारी मालमत्तेशी या कायद्याचा काहीही संबंध नाही. दरम्यान आता आपण मालमत्ता भाड्याने देताना काय काळजी घ्यायला हवी याबाबत माहिती पाहूयात. तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, अलीकडे फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. म्हणून प्रत्येक घरमालकाने त्याची जमीन, घर किंवा एखादं दुकान भाड्याने देण्याआधी रितसर भाडेकरार करून घ्यावा.

भाडेकरारात 11 महिन्यांचे कॉन्ट्रॅक्ट केलेले असते. म्हणून 11 महिने पूर्ण झालेत की त्याच्यानंतर तो भाडेकरार रिन्यू करून घ्या. तुमचा हाच पुरावा तुम्ही तुमची मालमत्ता भाड्याने दिली आहे हे वेळोवेळी दर्शवेल.
त्याचबरोबर भाडेकरारात घरासंबंधी इतरही माहिती नमूद करा. भाडेकरार हा केव्हाही 11 महिन्यांचाच केला जातो. त्यामुळे रिन्यू करायला विसरू नका. हाच सरकार दरबारी असणारा तुमच्या मालमत्तेचा रेकॉर्ड तुम्ही तुमची मालमत्ता भाड्याने दिली आहे हे दर्शवत राहील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe