पदवी मिळवा आणि त्यानंतर हे पाच डिप्लोमा कोर्स करा! मिळेल लाखोंचे पॅकेज

बरेच जण ग्रॅज्युएशन करतात व त्यानंतर नोकरी शोधायला लागतात. परंतु बऱ्याचदा ग्रॅज्युएशन नंतर लगेच नोकरी मिळते असे होत नाही व त्यामुळे खूप मोठी समस्या निर्माण होते. कारण आजकाल शिक्षणामध्ये पदवी जितकी गरजेची आहे तितकेच काही बाबतीत तुमच्यात कौशल्य असणे देखील महत्त्वाचे आहे.

Ajay Patil
Published:
diploma courses

Diploma Courses After Graduation:- बरेच जण ग्रॅज्युएशन करतात व त्यानंतर नोकरी शोधायला लागतात. परंतु बऱ्याचदा ग्रॅज्युएशन नंतर लगेच नोकरी मिळते असे होत नाही व त्यामुळे खूप मोठी समस्या निर्माण होते. कारण आजकाल शिक्षणामध्ये पदवी जितकी गरजेची आहे तितकेच काही बाबतीत तुमच्यात कौशल्य असणे देखील महत्त्वाचे आहे.

त्यामुळे पदवी प्राप्त केल्यानंतर तुम्हाला चांगली नोकरी मिळत नसेल तर तुम्ही सहा महिने ते एक वर्ष कालावधीचे डिप्लोमा कोर्सेस करू शकतात. जेणेकरून तुम्हाला चांगल्या पगाराची नोकरी या माध्यमातून मिळू शकते.

या अनुषंगाने या लेखात आपण असेच काही डिप्लोमा कोर्सेस बघणार आहोत जे पदवीनंतर खूप फायद्याचे ठरतील व तुम्हाला लाखो रुपये पॅकेजची नोकरी देखील मिळवून देतील.

पदवीनंतर फायद्याचे ठरतील हे डिप्लोमा कोर्सेस

1- डिप्लोमा इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स- आजकाल आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा तंत्रज्ञानाचा हे प्रसिद्ध असा प्रकार खूप पुढे आला असून आता अनेक लहान ते मोठ्या कंपन्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे ज्ञान असलेल्या लोकांना कामावर घेत आहेत. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर आर्टिफिशियल इंटेलिजन्स डिप्लोमा केला तर तुमच्यासाठी तो एक उत्तम असा पर्याय ठरू शकतो. हा अभ्यासक्रम तुम्हाला कंप्यूटर सायन्स अंतर्गत करता येतो. अनेक ऑफलाइन आणि ऑनलाईन संस्था AI मध्ये डिप्लोमा देतात.

2- डिप्लोमा इन हार्डवेअर- पदवी घेतल्यानंतर तुम्हाला जर इंजिनिअरिंगमध्ये आवड असेल तर तुम्ही हार्डवेअर किंवा नेटवर्किंग मध्ये देखील पदविका म्हणजेच डिप्लोमा कोर्स करू शकतात.

हा देखील एक महत्त्वाचा डिप्लोमा कोर्स असून तुम्ही पदवी संपादन केल्यानंतर जर डिप्लोमा इन हार्डवेअर केला तर तुमच्या करिअरमध्ये याचा खूप मोठा फायदा होऊ शकतो.

3- डिप्लोमा इन इंटिरियर डिझाईनिंग- तुम्हाला जर डिझायनिंग क्षेत्रामध्ये रस असेल व त्यातल्या त्यात तुम्हाला इंटरनेट डिझाईन आवडत असेल तर तुम्ही डिप्लोमा इन इंटरियर डिझाईनिंग हा कोर्स करू शकतात.

हा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर तुम्ही घर तसेच ऑफिस किंवा इतर आस्थापनांमध्ये इंटरियर डिझाईनचे काम करून चांगले पैसे मिळवू शकतात.

4- डिप्लोमा इन फोटोग्राफी- बऱ्याच तरुणांना फोटोग्राफीची आवड असते व अशी आवड तुम्हाला देखील असेल तर तुम्ही फोटोग्राफीमध्ये देखील उत्तम करिअर करू शकतात.

तुमच्या आवडीला डिप्लोमा इन फोटोग्राफी हा कोर्स खूप मदत करेल व हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला मीडिया संस्था तसेच फिल्म स्टुडिओ किंवा इतर ठिकाणी सहजपणे नोकरी मिळू शकते.

5- डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट- तुम्हाला जर नवनवीन खाद्यपदार्थ बनवायची आवड असेल तर तुम्ही तुमच्या आवडीचे रूपांतर तुमच्या करिअरमध्ये करू शकतात.

याकरिता तुम्हाला डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट खूप फायद्याचा ठरेल.हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तुम्हाला चांगल्या नोकरीचा मार्ग तर खुला होईलच परंतु स्वतःच्या व्यवसायाचे दरवाजे देखील तुमच्यासाठी खुले होऊ शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe