पोस्टाच्या ‘या’ योजनेतून व्याज कमावून होता येते लखपती! गुंतवणुकीवर मिळते कर्ज सुविधा आणि बरेच फायदे…

गुंतवणूकदारांमध्ये पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना खूप लोकप्रिय असून ज्या गुंतवणुकीमध्ये कुठल्याही प्रकारची जोखीम नकोशी आहे अशा गुंतवणूकदारांसाठी पोस्ट ऑफिसच्या योजना खूप फायद्याच्या ठरतात. याचे दोन मुख्य कारण म्हणजे यामध्ये केलेली गुंतवणूक ही सुरक्षित राहते आणि मिळणारा परतावा देखील चांगला मिळतो.

Ajay Patil
Published:
post office scheme

Post Office Small Saving Scheme:- गुंतवणूकदारांमध्ये पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना खूप लोकप्रिय असून ज्या गुंतवणुकीमध्ये कुठल्याही प्रकारची जोखीम नकोशी आहे अशा गुंतवणूकदारांसाठी पोस्ट ऑफिसच्या योजना खूप फायद्याच्या ठरतात. याचे दोन मुख्य कारण म्हणजे यामध्ये केलेली गुंतवणूक ही सुरक्षित राहते आणि मिळणारा परतावा देखील चांगला मिळतो.

पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून अनेक लहान बचत योजना राबवल्या जातात व त्यासोबतच मुदत ठेव योजना आणि आवर्ती ठेव योजना या सारख्या महत्वाच्या योजना देखील पोस्ट ऑफिस राबवते. पोस्ट ऑफिसच्या सगळ्या योजना या सरकारी योजना असल्यामुळे गुंतवणूक केल्यावर गुंतवणूकदारांना कुठल्याही प्रकारची पैशांची चिंता राहत नाही.

पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना अशा आहेत की यामध्ये तुम्ही जर पैसे गुंतवले तर लाखो रुपये तुम्ही परताव्याच्या स्वरूपात मिळवू शकतात.

या सगळ्या योजनांमध्ये जर पोस्टाची एक जबरदस्त स्मॉल सेविंग म्हणजेच छोटी बचत योजना बघितली तर ती म्हणजे पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट योजना होय व या योजनेलाच आरडी योजना असे देखील म्हटले जाते. ही योजना गुंतवणुकीसाठी खूप महत्त्वाची असून याच योजनेविषयीची माहिती आपण या लेखात बघणार आहोत.

पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट योजनेचे वैशिष्ट्ये

1- पोस्ट ऑफिसची ही एक लहान बचत योजना असून या योजनेमध्ये गुंतवणूक करून लाखोंची कमाई करता येणे शक्य आहे.

2- पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये जर तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला 6.7 टक्के व्याजदर मिळतो व हा तिमाही आधारावर गणला जातो. यामध्ये गुंतवणूक केली तर मिळणारा व्याजदर चांगला असल्याने लवकरात लवकर श्रीमंतीच्या दिशेने वाटचाल करण्यास सोपे होते.

3- तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन स्वतःच्या नावाने यामध्ये खाते उघडू शकतात.

4- या योजनेचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही किमान शंभर रुपयांपासून यामध्ये गुंतवणुकीला सुरुवात करू शकतात.

5- या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी हा फक्त पाच वर्षांसाठी आहे व तुम्ही या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये गुंतवणूक करून चांगले पैसे मिळवू शकतात.

6- पोस्ट ऑफिसच्या या आरडी योजनेचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या योजनेमध्ये तुम्हाला कर्ज देखील घेण्याची सुविधा मिळते. फक्त त्यामध्ये अट अशी आहे की तुम्हाला गुंतवणुकीचे यामध्ये पहिले वर्ष पूर्ण करणे गरजेचे असते.

म्हणजेच या योजनेत तुम्ही गुंतवणूक करायला सुरुवात केल्यानंतर एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्ही तुमच्या एकूण जमा रकमेच्या 50 टक्के कर्ज घेऊ शकतात.

पोस्टाच्या आरडी योजनेमध्ये दोन लाखाची कमाई कशी करता येते?
समजा तुम्ही पाच हजार रुपये प्रत्येक महिन्याला या योजनेत गुंतवायला सुरुवात केली तर तुमची पाच वर्षातील एकूण गुंतवणूक तीन लाख रुपये होते व त्या रकमेवर तुम्हाला 6.7 टक्क्यांनी व्याजदर मिळतो.

यानुसार तुम्हाला तुमच्या जमा तीन लाख रुपये या रकमेवर 56 हजार 830 रुपये एवढे व्याज मिळते व व्याज व मुद्दल मिळून पाच वर्षात तुम्हाला एकूण तीन लाख 56 हजार 830 रुपयांचा परतावा मिळतो.परंतु ही योजना जर तुम्ही पाच वर्षांऐवजी आणखी पाच वर्षासाठी त्यामध्ये वाढ केली तर या हिशोबाने एकूण दहा वर्षात तुमची एकूण जमा रक्कम सहा लाख रुपये होते

व ६.७% या व्याजदराने तुमच्या जमा सहा लाख मुद्दलीवर तुम्हाला दोन लाख 54 हजार 272 रुपये व्याज मिळते व या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही व्याज व मुद्दल मिळून एकूण आठ लाख 54 हजार 272 रुपये परतावा मिळतो.अशा पद्धतीने तुम्ही या योजनेच्या माध्यमातून दहा वर्षात निव्वळ व्याजापोटी 2 लाख 54 हजार 272 रुपये मिळवू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe