Home Loan : ही बँक देतेय सर्वात स्वस्त होमलोन ! वाचा 2025 मधील सर्व बँकांचे व्याजदर

सध्या जागांच्या आणि बांधकाम साहित्याच्या वाढलेल्या किमतीमुळे घर बांधणे हे आर्थिक दृष्ट्या परवडण्यासारखे राहिले नाही व प्रचंड प्रमाणात घरांच्या किमती वाढल्याने प्रत्येकाला स्वतःच्या घराची खरेदी करणे किंवा स्वतःचे घर बांधणे जवळपास अशक्य झाल्याची स्थिती आहे. परंतु आता बरेच जण होमलोनचा आधार घेऊन स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करतात.

Ajay Patil
Published:

Home Loan Interest Rate :- सध्या जागांच्या आणि बांधकाम साहित्याच्या वाढलेल्या किमतीमुळे घर बांधणे हे आर्थिक दृष्ट्या परवडण्यासारखे राहिले नाही व प्रचंड प्रमाणात घरांच्या किमती वाढल्याने प्रत्येकाला स्वतःच्या घराची खरेदी करणे किंवा स्वतःचे घर बांधणे जवळपास अशक्य झाल्याची स्थिती आहे. परंतु आता बरेच जण होमलोनचा आधार घेऊन स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करतात.

आपल्याला माहित आहे की अनेक सरकारी आणि खाजगी बँकांच्या माध्यमातून होमलोन देण्यात येते.या माध्यमातून लोन घेऊन घराचे स्वप्न पूर्ण करता येणे शक्य आहे. परंतु होमलोन घेताना आपल्याला विविध बँकांचे व्याजदर तुलनात्मक दृष्ट्या माहीत असणे तितकेच गरजेचे असते.

कारण प्रत्येक बँक किंवा इतर वित्तीय संस्था या वेगवेगळ्या व्याजदरावर होमलोन देतात व व्याजदर हा तुमचा सिबिल स्कोर कसा आहे यावर देखील अवलंबून असतो. त्यामुळे या नवीन वर्षामध्ये तुमचा देखील होमलोन घेण्याचा प्लान असेल तर या लेखामध्ये आपण विविध बँकांचे होमलोन वरील व्याजदर पाहणार आहोत.

कसे आहेत सध्या बँकांचे होमलोन वरील व्याजदर?

यूको बँक 8.30%, स्टेट बँक ऑफ इंडिया 8.50% ते 9.85%, पंजाब नॅशनल बँक 8.40% ते 10.25 टक्के, कॅनरा बँक 8.40% ते 11.25%, बँक ऑफ बडोदा 8.40% ते 10.65%, बँक ऑफ इंडिया ८.३५ टक्के ते 11.10% युनियन बँक ऑफ इंडिया 8.30% ते 10.90%

खाजगी क्षेत्रातील बँकांचे व्याजदर
आयसीआयसीआय बँक 8.75 टक्क्यांपासून सुरुवात, आरबीएल बँक 9% पासून सुरुवात, ॲक्सिस बँक 8.75% ते 13.30%, साउथ इंडियन बँक 8.50% पासून सुरुवात, सिटी युनियन बँक 8.25% ते 10.50%, कोटक महिंद्रा बँक 8.75 टक्क्यांपासून सुरुवात व एचएसबीसी बँक 8.50% पासून सुरुवात

महत्त्वाच्या हाऊसिंग फायनान्स कंपन्यांचे होमलोन वरील व्याजदर

जीआईसी हाऊसिंग फायनान्स 8.80% पासून सुरुवात, बजाज हाऊसिंग फायनान्स 8.50% पासून सुरुवात, एलआयसी हाऊसिंग फायनान्स ८.५० टक्क्यांपासून सुरुवात, पीएनबी हाऊसिंग फायनान्स 8.50% ते 14.50% पासून सुरुवात, एसएमएफजी इंडिया होम फायनान्स दहा टक्के आणि टाटा कॅपिटल 8.75% पासून सुरुवात

ही बँक देतेय सर्वात स्वस्त लोन

वरील संपूर्ण लिस्ट पहिली तर यूको बँक 8.30% पासून म्हणजेच सर्वात स्वस्त होम लोन देते आहे. तुम्हाला जर ह्या लोन साठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही पुढील लिंकवर क्लीक करून अर्ज करू शकता https://www.ucobank.com/en/web/guest/home-loan तसेच नजीकच्या युको बँकेत जाऊन लोन संदर्भात चौकशी करू शकाल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe