Penny Stock : 5 रुपयाच्या शेअरने 21 दिवसात गुंतवणूकदारांचा पैसा केला डबल !

शेअर मार्केट म्हटले म्हणजे कायम अनिश्चित असे वातावरण असते व कधी यामध्ये मोठ्या प्रमाणावर तेजी पाहायला मिळते तर कधी कधी मोठ्या प्रमाणावर घसरण होऊन गुंतवणूकदारांचे काही हजार कोटी रुपयांचा चुराडा एका दिवसात होतो. त्यामुळे प्रत्येक गुंतवणूकदाराने गुंतवणूक करताना गुंतवणूक तज्ञांचा सल्ला घेऊनच शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवणे फायद्याचे ठरते.

Ajay Patil
Published:
penny stock

Penny Stock:- शेअर मार्केट म्हटले म्हणजे कायम अनिश्चित असे वातावरण असते व कधी यामध्ये मोठ्या प्रमाणावर तेजी पाहायला मिळते तर कधी कधी मोठ्या प्रमाणावर घसरण होऊन गुंतवणूकदारांचे काही हजार कोटी रुपयांचा चुराडा एका दिवसात होतो. त्यामुळे प्रत्येक गुंतवणूकदाराने गुंतवणूक करताना गुंतवणूक तज्ञांचा सल्ला घेऊनच शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवणे फायद्याचे ठरते.

तसेच स्वतःचा अभ्यास देखील यामध्ये खूप महत्त्वाचा ठरतो. शेअर मार्केटच्या दृष्टिकोनातून बघितले तर यामध्ये चढउतार ही सुरूच असते परंतु या अस्थिर अशा वातावरणामध्ये देखील काही शेअर्स असे असतात की ते स्वस्तात मिळतात व कमी कालावधीत गुंतवणूकदारांना श्रीमंत करू शकतात व शेअर मार्केटच्या भाषेमध्ये अशा शेअर्सना पेनी स्टॉक असे म्हटले जाते.

Yuvraaj Hygiene Products Ltd.
अगदी याच पद्धतीने जर आपण सध्या एक स्वस्तात मिळणारा स्टॉक बघितला तर तो म्हणजे युवराज हायजिन प्रॉडक्ट लिमिटेड कंपनीचा शेअर्स होय. या पेनी स्टॉकची किंमत अवघी 5.49 रुपये आहे व सध्या हा शेअर सतत अप्पर सर्किट हिट करताना दिसून येत आहे. कालची जर आपण या शेअरची स्थिती बघितली तर त्यामध्ये 4.97% ने वाढ झाली व तो 5.49 रुपयांवर पोहोचला.

21 दिवसात गुंतवणूकदारांचे पैसे झाले दुप्पट
युवराज हायजीन प्रोडक्ट लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने अवघ्या 21 दिवसांमध्ये गुंतवणगारांचा पैसा दुप्पट केला असून 17 डिसेंबर रोजी या शेअरची प्राईज 2.83 रुपये होती व आता हा स्टॉक 5.49 रुपयांवर ट्रेड करत आहे.

म्हणजेच युवराज हायजिन प्रॉडक्टच्या शेअर्सने मंगळवारी 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. जर मागील एक महिन्याची या शेअरची कामगिरी बघितली तर युवराज हायजिन प्रोडक्स कंपनीच्या शेअर्सने तब्बल १५६.५४ टक्क्यांचा परतावा दिला आहे.

गुंतवणूकदारांचा पैसा तिप्पट

सोप्या भाषेत समजून घ्यायचे म्हणजे जर एखाद्या गुंतवणूकदाराने जर या शेअर्समध्ये एक लाख रुपयांचे गुंतवणूक केली असेल तर एक महिन्यात त्याला तब्बल दोन लाख 57 हजार रुपयांचा परतावा मिळाला आहे.

तसेच मागच्या सहा महिन्यापासून या कंपनीचा शेअर्सने मजबूत असा परफॉर्मन्स दिला असून गुंतवणूकदारांचा पैसा तिप्पट केला आहे.

3.71 लाख रुपयांचा परतावा

मागच्या सहा महिन्यांपूर्वी या पेनी स्टॉकची किंमत 1.86 होती व आताच्या किमतीनुसार बघितले तर सहा महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना तब्बल १९५ टक्क्यांचा परतावा दिला आहे. समजा एक वर्षांपूर्वी जर गुंतवणूकदाराने एक लाख रुपयांची गुंतवणूक या शेअर्समध्ये केली असेल तर त्याला आता 3.71 लाख रुपयांचा परतावा मिळाला असेल.

काय करते युवराज हायजीन प्रॉडक्ट लिमिटेड कंपनी?

1995 यावर्षी युवराज हायजीन प्रोडक्ट लिमिटेड कंपनीची स्थापना करण्यात आली व ही कंपनी प्रामुख्याने बाथरूम,फरशी तसेच स्वयंपाकघर इत्यादीच्या स्वच्छतेच्या संबंधित उत्पादने निर्मितीच्या क्षेत्रामध्ये काम करते व सध्या या कंपनीचे एकूण मार्केट कॅप 49.80 कोटी रुपये आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe