Mutual Fund Investment : SBI च्या या स्कीमने १ लाखाचे केले १७ लाख रुपये…

गुंतवणूकदार गुंतवणूक करताना जोखीम नसलेल्या किंवा कमीत कमी जोखीम असलेल्या गुंतवणूक पर्यायांमध्ये गुंतवणूक करतात. तसेच ज्या गुंतवणूक पर्यायामधून चांगला परतावा मिळतो अशा पर्यायांना गुंतवणुकीसाठी पसंती दिली जाते.

Ajay Patil
Published:
matual fund

SBI Small Cap Mutual Fund:- गुंतवणूकदार गुंतवणूक करताना जोखीम नसलेल्या किंवा कमीत कमी जोखीम असलेल्या गुंतवणूक पर्यायांमध्ये गुंतवणूक करतात. तसेच ज्या गुंतवणूक पर्यायामधून चांगला परतावा मिळतो अशा पर्यायांना गुंतवणुकीसाठी पसंती दिली जाते.

यामध्ये पोस्ट ऑफिसच्या योजना आणि विविध बँकांच्या मुदत ठेव योजना या प्रामुख्याने गुंतवणूकदारांमध्ये गुंतवणुकीसाठी विशेष प्रसिद्ध व लोकप्रिय असल्याचे आपल्याला दिसून येते.

परंतु गेल्या काही वर्षांचा विचार केला तर म्युच्युअल फंड योजनांमधील गुंतवणूक देखील वाढताना दिसून येत आहे व या माध्यमातून चांगला परतावा गुंतवणूकदारांना मिळत असल्यामुळे आता यामधील गुंतवणूक वाढताना दिसत आहे.

म्युच्युअल फंड एसआयपी हा एक पसंतीचा गुंतवणूक प्रकार असून यामध्ये सरासरी 12 टक्क्यांचा वार्षिक परतावा मिळण्याचा एक निश्चित अंदाज असल्यामुळे चांगला परतावा मिळण्याच्या दृष्टिकोनातून देखील या ठिकाणची गुंतवणूक फायद्याची ठरते.

म्युच्युअल फंड योजनाच्या दृष्टिकोनातून बघितले तर एसबीआय म्युच्युअल फंडाची टॉप रिटर्निंग स्कीम असलेल्या एसबीआय स्मॉल कॅप फंड गुंतवणुकीसाठी खूप फायद्याचा असून या फंडाचा ट्रॅक रेकॉर्ड तीन, पाच तसेच दहा व पंधरा वर्षे असा असून या फंडाने प्रत्येक टप्प्यांमध्ये वर्षाला 20% पेक्षा जास्त असल्याचे दिसून आले आहे.

9 सप्टेंबर 2009 रोजी एसबीआय स्मॉल कॅप फंड सुरू करण्यात आला व आता साधारणपणे पंधरा वर्षे या फंडने पूर्ण केली आहेत. एसबीआय स्मॉल कॅप फंडाने एकरकमी गुंतवणूकदारांना 18 पट परतावा दिला आहे.

तर दरमहा दहा हजार रुपयांची एसआयपी करणाऱ्या गुंतवणूकदारांना सव्वा कोटी रुपयांचा परतावा मिळाला आहे.सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान अर्थात एसआयपी सुरू झाल्यापासून एसबीआय स्मॉल कॅप फंडाने 22.8 टक्के वार्षिक परतावा दिला आहे तर एकरकमी गुंतवणूकदारांना सुरुवातीपासूनच 20.65% वार्षिक परतावा मिळाला आहे.

एसआयपी गुंतवणुकीवरील परतावा

1- पंधरा वर्षात एसआयपी परतावा 22.84% वार्षिक

2- पंधरा वर्षासाठी जर महिन्याला दहा हजार रुपयांची एसआयपी केली असेल तर पंधरा वर्षातील एकूण गुंतवणूक 18 लाख रुपये व पंधरा वर्षानंतर या एसआयपीचे व्हॅल्यू एक कोटी 22 लाख 39 हजार 296 रुपये इतके झाले.

कालावधीनुसार एसआयपीवर मिळालेला उच्च परतावा
तीन वर्ष एसआयपी वर वार्षिक 22.23% परतावा, पाच वर्षात वार्षिक एसआयपी परतावा 25.86%, दहा वर्षात वार्षिक एसआयपी परतावा २१.४३ टक्के आणि पंधरा वर्षात एसआयपी परतावा वार्षिक 22.84% इतका मिळाला.

एक लाख रुपये गुंतवणुकीचे मूल्य आता 17 लाख

9 सप्टेंबर 2009 रोजी हा फंड लॉन्च करण्यात आला होता व तेव्हापासून जर एक लाख रुपये गुंतवणूक केली असती तर त्यावर 20.65% वार्षिक परतावा मिळून एक लाख रुपये गुंतवणुकीचे मूल्य आता 17 लाख 73 हजार 640 रुपये इतके झाले.

एकरकमी गुंतवणुकीवरील जर कालावधीनुसार परतावा बघितला तर एक वर्षाचा एकरकमी परतावा 23.92%, तीन वर्षाचा एकरकमी परतावा 18.91% आणि पाच वर्षाचा एकरकमी परतावा 27.07% इतका मिळाला.

एसबीआय स्मॉल कॅप म्युच्युअल फंडामध्ये किमान किती रकमेपासून गुंतवणूक करता येते?

एसबीआय स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजनेमध्ये एकरकमी गुंतवणुकीसाठी किमान 5000 रुपयांची गुंतवणूक करणे गरजेचे असते व त्यानंतर तुम्ही एक रुपयाच्या पटीत कितीही रक्कम गुंतवू शकतात. तसेच यामध्ये एसआयपी करिता किमान पाचशे रुपयांची गुंतवणूक आवश्यक आहे.

( टीप- वरील माहिती वाचकांसाठी माहितीस्तव सादर केली आहे. आम्ही या माध्यमातून कुणालाही गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन देत नाहीत.कोणत्याही ठिकाणी जर गुंतवणूक करायची असेल तर गुंतवणूक तज्ञांचा किंवा तुमच्या आर्थिक सल्लागारांचा सल्ला अवश्य घ्या.)

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe