Mushroom Farming:- एखाद्या कामाच्या बाबतीत जर आपलं पूर्ण समर्पण आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर त्या कामापासून आपल्याला यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. एखादी गोष्ट मनामध्ये पक्की केली आणि ती गोष्ट मिळवण्यासाठी जर आपण प्रयत्न मध्ये सातत्य ठेवले व प्रामाणिकपणे मेहनत घेत राहिलो तर यशाचे दरवाजे उघडायला वेळ लागत नाही.
याचप्रमाणे जर आपण बिहार राज्यातील दरभंगा येथील रहिवासी असलेल्या प्रतिभा झा यांची यशोगाथा बघितली तर ती नक्कीच इतर शेतकऱ्यांना व महिलांना देखील तितकीच प्रेरणादायी आहे. अवघ्या एक हजार रुपयांपासून त्यांचा व्यवसायाचा प्रवास सुरू झाला व आज महिन्याला दीड ते दोन लाख रुपयांपर्यंत हा व्यवसाय पोहोचला आहे.
1000 रुपये पासून मशरूम लागवडीचा व्यवसाय त्यांनी सुरू केला व आज व्यवसायातून स्वतः तर लाखो रुपये कमवतात परंतु इतर दहा हजार शेतकऱ्यांना त्यांनी या व्यवसायाचे प्रशिक्षण दिले असून त्यांना देखील यशाच्या मार्गावर चालण्यास उद्युक्त केले आहे. त्यामुळे या लेखात आपण प्रतिभा झा यांची प्रेरणादायी कथा समजून घेणार आहोत.
प्रतिभा झा यांची यशोगाथा
प्रतिभाताई या मुळच्या बिहारमधील दरभंगा येथील रहिवासी आहेत. जेव्हा त्या पंधरा वर्षाच्या होत्या तेव्हा त्यांच्या वडिलांचे कॅन्सरमुळे निधन झाले. त्यानंतर वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांचे लग्न दरभंगा येथील एका इंजिनिअर सोबत झाले व लग्नानंतर त्या मिर्झापूर हांसी या गावांमध्ये आल्या.
जेव्हा त्यांचे लग्न झाले तेव्हा त्यात दहावीत शिकत होत्या व लग्न झाल्यामुळे त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले. मुजफ्फरपुर सारख्या ठिकाणी लहानाच्या मोठ्या झालेल्या प्रतिभा यांनी अनेकदा अनेक शेतकऱ्यांना मशरूमची लागवड करताना पाहिले होते व त्यामुळे मशरूम लागवडीविषयी कुतूहल त्यांच्या मनात निर्माण झालेले होते व आपण देखील मशरूम लागवड करावी असा निर्णय त्यांच्या मनामध्ये होता.
परंतु मध्यंतरीच्या कालावधी त्यांचे लग्न झाले व त्यामुळे शेतीची आवड मात्र तरी देखील कमी झाली नाही. त्यांनी त्यांच्या सासरच्या मंडळींना मशरूम शेतीची कल्पना न देता फक्त त्यांच्या पतीशी याबाबत चर्चा केली व मशरूम लागवडीबद्दल त्यांना त्यांच्या पतीचा पूर्ण पाठिंबा मिळाला.
पतीकडून मशरूम लागवडीसाठी परवानगी मिळाल्यानंतर त्यांनी 2015 मध्ये दरभंगा कृषी विभागात जाऊन त्यासंबंधीची संपूर्ण माहिती घेतली. त्यानंतर त्यांना भागलपूर येथील बिहार कृषी विद्यापीठात पाठवण्यात आले व 2016 मध्ये मशरूम लागवडी संबंधीच्या अभ्यासक्रमामध्ये त्यांना प्रवेश मिळाला व त्यांचे ट्रेनिंग सुरू झाले.
एक हजार रुपयांपासून सुरू केला व्यवसाय
प्रतिभा झा यांनी अवघ्या एक हजार रुपयांमध्ये ऑईस्टर मशरूमची लागवड सुरू केली व याकरता त्यांच्या जुन्या घरातील एक खोलीचा वापर त्यांनी केला. सुरुवातीला त्यांनी मशरूम स्पॉन, पॉलिथिनच्या पिशव्या तसेच फॉर्मुलीन आणि कच्चामाल खरेदी केला व दिवसाला सुरुवात केली व पहिल्याच प्रयत्नामध्ये त्यांना चांगले यश आले.
प्रतिभा झा यांनी दुधी मशरूम म्हणजेच मिल्की मशरूम आणि बटन मशरूमची लागवड सुरू केली. यावरच न थांबता त्यांनी मशरूम लागवडीचे प्रशिक्षण द्यायला देखील सुरुवात केली व सुरुवातीला या प्रशिक्षणातून त्यांना दररोज पाचशे रुपये मिळत होते व नंतर ते बाराशे रुपये पर्यंत पैसे मिळायला लागले आतापर्यंत त्यांनी दहा हजार शेतकऱ्यांना याबाबत प्रशिक्षण दिले आहे.
किती आहे प्रतिभा झा यांची कमाई?
प्रतिभाताईंना प्रशिक्षण सत्रातून प्रत्येक महिन्याला 40000 ते 50 हजार रुपये कमाई होते व याशिवाय मशरूम स्पॉनच्या विक्रीतून सुमारे एक लाख रुपयांचे उत्पन्न ते मिळवतात. इतकेच नाही तर प्रत्येक दिवसाला 15 ते 20 किलो मशरूमची विक्री ते करतात.या पद्धतीने देखील त्यांना दरमहा 15000 ते 20 हजार रुपयांचे उत्पन्न मिळते.
इतर शेतकऱ्यांकडून देखील ते मशरूम खरेदी करतात व त्याचे देखील विक्रीतून उत्पन्न मिळवतात. इतकेच नाही तर मशरूम पासून ते मशरूमचे लोणचे, पापड आणि स्नॅक्स देखील विकतात व या माध्यमातून देखील त्यांना चांगली कमाई होते.