मार्केट गाजवायला लवकरच येत आहेत ‘या’ इलेक्ट्रिक कार! जाणून घ्या फीचर्स

सध्या मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढताना दिसून येत आहे व त्यामध्ये इलेक्ट्रिक स्कूटर ते इलेक्ट्रिक कार या वाहनांचा आपल्याला समावेश करता येईल. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी सबसिडी स्वरूपात योजना राबविण्यात येत आहेत

Ajay Patil
Published:
electric car

Upcoming Electric Car:- सध्या मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढताना दिसून येत आहे व त्यामध्ये इलेक्ट्रिक स्कूटर ते इलेक्ट्रिक कार या वाहनांचा आपल्याला समावेश करता येईल. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी सबसिडी स्वरूपात योजना राबविण्यात येत आहेत

व त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक वाहने आपल्याला रस्त्यावर धावताना दिसून येतील. त्यामुळे अनेक कार उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून देखील उत्तम अशा इलेक्ट्रिक कार बाजारामध्ये लॉन्च करण्याची सध्या तयारी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

नवीन वर्ष 2025 मध्ये देशातील काही महत्त्वाच्या कार उत्पादक कंपन्या इलेक्ट्रिक कार लाँच करण्याच्या तयारीत आहेत व त्यासंबंधीचीच माहिती आपण या लेखात बघणार आहोत.

लवकरच लाँच केल्या जातील या इलेक्ट्रिक कार

1- ह्युंदाई क्रेटा (इलेक्ट्रिक)- ह्युंदाई कंपनीची एसयूव्ही क्रेटा ग्राहकांमध्ये प्रचंड प्रमाणात लोकप्रिय आहे आणि आता या कारचे इलेक्ट्रिक व्हेरियंट लॉन्च केले जाणार आहे. ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिक ही कार 51.4 kWh आणि 42 kWh च्या दोन बॅटरी पॅकला सपोर्ट करेल आणि 473 किलोमीटर पर्यंतची रेंज देईल.

ही इलेक्ट्रिक कार अनेक प्रगत तंत्रज्ञान आणि सुरक्षा वैशिष्ट्यांसह लॉन्च केली जाणार आहे. परंतु या कारची किंमत अद्याप पर्यंत जाहीर करण्यात आलेली नसून तिची किंमत 17 जानेवारीला कळेल एक शक्यता आहे.

2- मारुती विटारा( इलेक्ट्रिक)– मारुती सुझुकी कंपनीची पहिली इलेक्ट्रिक कार मारुती e Vitara देखील भारत मोबिलिटी ग्लोबल ऑटो एक्सपोमध्ये लॉन्च केली जाणार आहे.

इतकेच नाहीतर मारुती सुझुकी कंपनी इलेक्ट्रिक मोबिलिटीसाठी आपली भविष्यातील काही प्लॅनिंग देखील सादर करणार आहे व या अनुषंगाने कंपनीची लोकप्रिय एसयुव्ही ग्रँड विटाराचे इलेक्ट्रिक व्हेरियंट येऊ घातलेल्या भारत मोबिलिटी ग्लोबल ऑटो एक्सपोमध्ये सादर केले जाणार आहे.

3- टाटा हॅरिअर ईव्ही- देशातील प्रसिद्ध कार उत्पादक कंपनी टाटा मोटर्स कडून इलेक्ट्रिक कार सादर केली जाणार असून ही कार टाटा हॅरियर ईव्ही असणार आहे.

या कारचे स्पेसिफिकेशन मात्र अद्याप समोर आलेले नसून कंपनीने गेल्या वर्षी झालेल्या ऑटो एक्सपोमध्ये ही कार शोकेस केली होती व असे सांगितले जात आहे की ही कार एका चार्जवर 500 किमी पर्यंतची रेंज देऊ शकते.

4- टाटा सिएरा ईव्ही- या कारचे कॉन्सेप्ट मॉडेल मागच्या वर्षी सादर करण्यात आलेल्या ऑटो एक्सपोमध्ये डिस्प्ले करण्यात आले होते. ही कार नव्वदच्या दशकामध्ये खूप लोकप्रिय होती व आता इलेक्ट्रिक व्हेरियंटमध्ये ती सादर केली जाणार आहे. यावर्षीच्या ऑटो एक्सपो मध्ये ही कार सादर केली जाण्याची शक्यता आहे.

5- इव्हा(Eva) सोलर इलेक्ट्रिक कार- पुण्यातील ईव्ही स्टार्टअप आपली पहिली कार भारत मोबिलिटी ऑटो एक्सपोमध्ये प्रदर्शित करणार आहे. यामध्ये कंपनीने दावा केला आहे की ही कार सौर उर्जेवर चालणारी इलेक्ट्रिक कार असेल व जी पहिल्यांदाच आणली जात आहे. विशेष म्हणजे कंपनीने या कारचे प्री बुकिंग देखील सुरू केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe