Cidco Home Registration:- स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याच्या बाबतीत सिडको आणि म्हाडा या सरकारच्या गृहनिर्माण संस्थांची भूमिका खूप महत्त्वाची आहे व या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून सोडतीद्वारे नागरिकांना परवडणाऱ्या दरांमध्ये घरे उपलब्ध करून दिले जातात हे आपल्याला माहित आहे.
म्हाडाप्रमाणेच सिडकोच्या माध्यमातून देखील राज्यातील विविध शहरांमध्ये सोडत जाहीर केली जाते व या माध्यमातून परवडणाऱ्या दरांमध्ये अनेकांचे घराचे स्वप्न पूर्ण होते. सिडकोच्या अनुषंगाने बघितले तर सिडकोने माझे पसंतीचे सिडकोचे घर ही योजना आणली असून या माध्यमातून 26000 घरांची विक्री करण्यात येणार आहे.
यासंबंधीच्या नोंदणी प्रक्रियेला तब्बल तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील काही ठिकाणांवरील घरांच्या किमती सिडकोच्या माध्यमातून जाहीर करण्यात आल्या. त्यामुळे नवी मुंबईतील कोणत्या भागातील घरांच्या किमती किती आहेत याबद्दलची माहिती या लेखात बघू.
कोणत्या ठिकाणी किती आहे घराची किंमत?
सिडकोच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या माझे पसंतीचे सिडकोचे घर या योजनेद्वारे 26000 घरांची विक्री करण्यात येणार आहे व त्यासाठीची नोंदणी सुरू असून तिसऱ्यांदा आहे या नोंदणी प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे.
नवी मुंबई परिसरामध्ये विविध ठिकाणी ही घरे आहेत व त्यांच्या जर किमती बघितल्या तर त्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या आहेत.
1-तळोजा सेक्टर 37 येथे 816 घरे आहेत व त्यांची किंमत 34 लाख 20 हजार रुपये आहे. तसेच तळोजा सेक्टर 28 येथे 2185 घरे असून एका घराची किंमत जवळपास 25 लाख दहा हजार रुपयांच्या दरम्यान असून तळोजा सेक्टर 39 मध्ये वन बीएचके फ्लॅटची किंमत 26 लाख दहा हजार रुपये असून तिथे 759 घरे आहेत.
2- वाशी ट्रक टर्मिनल सेक्टर 19 येते 3131 घरे आहेत व एका घराची किंमत 74 लाख दहा हजार रुपये आहे.
3- पनवेल बस टर्मिनल सेक्टर 8 मध्ये एकूण 172 घरे आहेत व एका घराची किंमत 45 लाख दहा हजार रुपये आहे.
4- खारघर रेल्वे स्टेशन सेक्टर एक अ येथे टू बीएचके अर्थात 540 चौरस फूट क्षेत्रफळाची 1803 घरे आहेत व एका घराची किंमत 97 लाख 20 हजार रुपये आहे.
5- खारघर बस डेपो सेक्टर 14 मध्ये वन बीएचकेची सतराशे घरे असून त्यांची किंमत 48.30 लाख रुपये आहे.
6- कळंबोली बस डेपो सेक्टर 17 मध्ये वन बीएचकेची साधारणपणे एक हजार तीनशे साठ घरे उपलब्ध आहेत व एका घराची किंमत 41 लाख 90 हजार रुपये आहे.
7- उलवे येथे खारकोपर दोन ए सेक्टर 16 मध्ये एक बीएचके घराची किंमत 38 लाख 60 हजार रुपये तर खारकोपर दोन बी सेक्टर 6 येथे 288 घरे असून एका घराची किंमत 38 लाख 60 हजार रुपये आहे.
8- उलवे बामन डोंगरी सेक्टर सहामध्ये एकूण 1700 घरे आहेत व एका घराची किंमत 31 लाख 90 हजार रुपये आहे व त्यासोबतच उलवे खारकोपर सेक्टर 16 ए या ठिकाणी एकूण 2113 घरे असून एका घराची किंमत 40 लाख तीस हजार रुपये आहे.
9- कामोठे परिसरातील खांदेश्वर रेल्वे स्टेशन सेक्टर 28 या ठिकाणी वन बीएचके म्हणजेच 322 चौरस फूट घराची किंमत 46 लाख 70 हजार रुपये आहेत व या ठिकाणी 1470 घरे आहेत. तसेच मानसरोवर रेल्वे स्टेशन सेक्टर 39 येथील एक बीएचके म्हणजेच 322 चौरस फूट घराची किंमत 41 लाख 90 हजार रुपये आहे.
घरांच्या नोंदणीची शेवटची तारीख काय आहे?
सिडकोच्या माझे पसंतीचे सिडकोचे घर योजनेचे 26000 घरांसाठी नोंदणीची शेवटची तारीख 10 जानेवारी 2025 इतकी आहे.