पगार कितीही असू द्या,फक्त असा बजेट बनवा! कधीही संपणार नाहीत पैसे

Ajay Patil
Published:
financial management

Financial Management Tips:- तुम्ही व्यवसाय किंवा एखाद्या ठिकाणी नोकरी करत असाल आणि तुम्हाला प्रत्येक महिन्याच्या एका तारखेला निश्चित असे उत्पन्न हातात येत असेल तर यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टींचे नियोजन अगदी उत्तम पद्धतीने करणे गरजेचे असते. तरच तुमच्या हातामध्ये पैसा टिकू शकतो किंवा तुम्ही पैशांची जास्तीत जास्त बचत करू शकता.

तुम्ही जर आलेल्या पगाराचे नियोजन व्यवस्थित केले नाही तर मात्र महिना संपण्याच्या आधी तुमच्या खात्यातील पैसे संपतात व बचत सोडाच परंतु साध्या खर्चायला तुमच्याकडे पैसे राहत नाही. त्यामुळे आर्थिक नियोजनासोबतच तुमचे बजेट आणि आर्थिक शिस्त यामध्ये खूप गरजेचे असते.

या अनुषंगाने या लेखात आपण माहिती घेणार आहोत की तुमचा पगार किती असला तरी तुम्ही जर एका सूत्राचा वापर केला तर तुम्ही तुमच्या पगारामध्ये आरामात बचत देखील करू शकतात व तुमच्या हातात पैसा देखील वाचू शकतो.

50-30-20 चा फार्मूला येईल कामाला
हा फॉर्म्युला खूप महत्त्वाचा असून या फॉर्मुल्याच्यानुसार जर पगाराचे तुम्ही तीन भागात विभागणी केली तर नक्कीच पैशांची बचत करता येते. या फार्मूलानुसार जर बघितले तर यामध्ये पन्नास टक्के खर्च,

30 टक्के गरज आणि 20% बचत अशा पद्धतीने तुम्हाला नियोजन करावे लागेल. हा फॉर्म्युला तुम्हाला बचत करण्यासोबतच तुमच्या खर्चाचे मॅनेजमेंट करण्यामध्ये देखील उत्तम प्रकारे मदत करतो व तुम्हाला तुमचे आर्थिक उद्दिष्ट साध्य करता येतात.

एका उदाहरणाने हा फॉर्म्युला समजून घेऊ
समजा राहुल नावाचा एक मुलगा आहे व तो पुणे येथे पीजी मध्ये राहतो व महिन्याला त्याला पन्नास हजार रुपये पगार आहे. या पन्नास हजार पगारांमधून राहुल प्रत्येक महिन्याला घरी पालकांना दहा हजार रुपये पाठवतो.

आता प्रश्न येतो की या फार्मूलाच्या मदतीने राहुल त्याचा खर्च आणि गरजा कशा पूर्ण करणार? जेव्हा राहुल त्याच्या पन्नास हजार पगारांमध्ये दहा हजार रुपये त्याच्या पालकांना देतो तेव्हा त्याच्याकडे 40 हजार रुपये पगार शिल्लक राहतो.

या चाळीस हजाराचे जर या फार्मूल्यानुसार विभागणी बघितली तर राहुल त्याच्या पगाराच्या 50% म्हणजेच वीस हजार रुपये आवश्यक खर्चासाठी वापरेल व या खर्चामध्ये तो त्याचे पीजीचे भाडे किंवा मेस विज बिल इत्यादीवर खर्च करेल व उरलेल्या 50 टक्के पगाराचे दोन भाग यामध्ये करेल.

उरलेल्या 50% मध्ये 30% म्हणजेच 12,000 तो इतर आवश्यक गरजांसाठी वापरेल.यामध्ये तो जिम किंवा कोणत्याही महत्त्वाच्या कामांवर खर्च करेल. परंतु यामध्ये अशा प्रकारच्या खर्चामध्ये तुम्ही बचत करणे देखील गरजेचे आहे व तसा प्रयत्न आवश्यक करावा.

आता 20 टक्के म्हणजेच आठ हजार रुपये तुमच्याकडे वाचतील व हे 8000 रुपये तुम्ही वाचवणे खूप गरजेचे आहे.तुमच्या बचत आणि गुंतवणुकी सोबत तुम्ही प्रत्येक महिन्याला काही रक्कम आपत्कालीन निधीमध्ये जमा करू शकतात.

हा निधी तुम्हाला तुमच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये आर्थिक मदत करेल.तसेच काही थोडीशी रक्कम तुम्ही गुंतवणे गरजेचे आहे व जेणेकरून तुम्हाला चांगला परतावा या माध्यमातून मिळेल. तसेच बचत खात्यात नेहमी शिल्लक असणे देखील तितकेच गरजेचे आहे. बचत खात्यातील रक्कम देखील तुम्हाला अनेक आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदत करते.अशाप्रकारे या फॉर्मुल्यानुसार तुम्ही अगदी सहजपणे पैशांची बचत करू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe