टाटा टियागो खरेदी करणे परवडेल की मारुती सेलेरिओ? जाणून घ्या कोणती कार राहील बेस्ट?

जेव्हा कुठलाही व्यक्ती नवीन कार खरेदी करण्याचा विचार करतो तेव्हा सगळ्यात आधी आपला बजेट व त्या बजेटमध्ये मिळणारी उत्कृष्ट फीचर्स व मायलेज असलेली कार शोधत असतो. जर आपण भारतीय कार बाजारपेठ बघितली तर आपल्याला पाच ते दहा लाख बजेट मधील अनेक उत्तम अशा फीचर्स असलेल्या आणि उत्तम मायलेज असणाऱ्या कार्स पाहायला मिळतात.

Ajay Patil
Published:
tata tiago vs maruti celerio

Tata Tiago VS Maruti Celerio:- जेव्हा कुठलाही व्यक्ती नवीन कार खरेदी करण्याचा विचार करतो तेव्हा सगळ्यात आधी आपला बजेट व त्या बजेटमध्ये मिळणारी उत्कृष्ट फीचर्स व मायलेज असलेली कार शोधत असतो. जर आपण भारतीय कार बाजारपेठ बघितली तर आपल्याला पाच ते दहा लाख बजेट मधील अनेक उत्तम अशा फीचर्स असलेल्या आणि उत्तम मायलेज असणाऱ्या कार्स पाहायला मिळतात.

परंतु बऱ्याचदा कार घेताना मात्र बऱ्याच जणांचा गोंधळ उडतो. यामध्ये टाटा मोटर्सच्या कार देखील आपल्याला उपलब्ध असल्याचे दिसून येतात व मारुतीच्या देखील अनेक कार्स उपलब्ध असल्याचे दिसते. या दोन्ही कंपन्यांच्या कार ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय असल्यामुळे व अनेक परवडणारे किमतीतल्या कार दोन्ही कंपन्यांनी सादर केल्यामुळे ग्राहकांना बऱ्याचदा कळत नाही की कोणत्या कंपनीची आणि कोणती कार घ्यावी?

या अनुषंगाने या लेखात आपण चांगल्या मायलेज देणाऱ्या व हॅचबॅक सेगमेंटमध्ये येणाऱ्या अशा दोन कारची माहिती घेणार आहोत ज्या ग्राहकांमध्ये देखील लोकप्रिय आहेत व त्यातील एक म्हणजे मारुतीची सेलेरिओ व दुसरी म्हणजे टाटा मोटरची टाटा टियागो या होय. या दोन्ही कार पेट्रोल आणि सीएनजीमध्ये देखील उपलब्ध आहेत. त्यामुळे या दोन्ही कारची तुलनात्मकदृष्ट्या माहिती या लेखात थोडक्यात बघू.

मारुती सेलेरिओ आणि टाटा टियागो यापैकी कोणती कार राहील बेस्ट?

1- मारुती सेलेरिओचे वैशिष्ट्ये आणि मायलेज- ही कॉम्पॅक्ट हॅचबॅक सेगमेंट मधील कार असून या कारमध्ये 1- लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे व ते 67 पीएस पावर आणि 89 एनएमचा टॉर्क जनरेट करते. तसेच या कारमध्ये पाच स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि पाच स्पीड एएमटी ट्रान्समिशन देण्यात आले आहे.

तसेच या कारच्या सीएनजी व्हर्जनमध्ये हे इंजिन फक्त पाच स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह उपलब्ध आहे व जे 56.7ps पावर आणि ८२ एनएम टॉर्क जनरेट करण्यासाठी सक्षम असून त्यामध्ये 60 लिटरची सीएनजी टॅंक देण्यात आली आहे.

मारुती सेलेरिओचे पेट्रोल व्हेरियंट 26 किलोमीटर प्रति लिटरचे मायलेज देते तर सीएनजी व्हेरियंट प्रति किलो 34 किलोमीटरचे मायलेज देते

या कारमध्ये एप्पल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटो सह सात इंचाचा टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, एसी व्हेंट आणि म्युझिक कंट्रोल सारखी वैशिष्ट्ये देखील देण्यात आले आहेत.

2- टाटा टियागोची वैशिष्ट्ये- टाटा टियागो ही हॅचबॅक सेगमेंट मधील कार असून या कारमध्ये 1.2- लिटर पेट्रोल इंजिनसह सीएनजी पर्याय देखील देण्यात आले आहे. या कारचे पेट्रोल व्हेरियंट प्रतिलिटर 20 किलोमीटरचे मायलेज देते

तर सीएनजी व्हेरियंट प्रति किलो 28 किलोमीटरचे मायलेज देते. या कारमध्ये पाच जण आरामात प्रवास करू शकतात व या कारमध्ये 1.2- लिटर इंजिन आहे जे सीएनजी मोडवर 73 एचपी पावर आणि 95 एनएम टॉर्क जनरेट करते.

तसेच या इंजिनमध्ये पाच स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन गिअरबॉक्स देण्यात आला आहे. तसेच टियागोमध्ये सात इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, अँड्रॉइड ऑटो, एप्पल कार प्ले, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले तसेच आठ स्पीकर साऊंड सिस्टम व ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल इत्यादी वैशिष्ट्ये देण्यात आले आहेत.

तसेच 242 लिटरची बूट स्पेस या कारमध्ये उपलब्ध आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून वैशिष्ट्ये बघितली तर या कारमध्ये डुएल एअर बॅग, EBD सह एबीएस, रियर पार्किंग सेन्सर इत्यादी वैशिष्ट्य देखील देण्यात आले आहे.

किती आहेत या कारच्या किमती?
भारतीय बाजारपेठेमध्ये मारुती सेलेरिओ ची किंमत पाच लाख 36 हजार रुपयांपासून सुरू होते आणि 7.4 लाख रुपये पर्यंत जाते. त्यासोबतच टाटा टियागो ची एक्स शोरूम किंमत पाच लाख ते सात लाख रुपये पर्यंत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe