Free Railway Facility:- लांबचा प्रवास करायचा असेल तर जास्त करून रेल्वेला पसंती दिली जाते. आपल्याला माहित आहे की भारताच्या प्रत्येक राज्यामध्ये म्हणजेच भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये रेल्वेचे नेटवर्क असल्याने तुम्हाला कोणत्याही ठिकाणी जायचे असेल तरी तुम्हाला ट्रेनने जाता येणे शक्य आहे.
त्यामुळे ट्रेनने आरामदायी प्रवास करता यावा व सीट मिळावे म्हणून प्रत्येक जण एक ते दीड महिने आधीच रेल्वेचे तिकीट बुक करून ठेवतात. या माध्यमातून प्रवास करताना आरामदायी सीट मिळतेच. परंतु आपल्याला माहित आहे की जेव्हा आपण रेल्वेचे तिकीट काढतो तेव्हा त्या तिकिटासोबत प्रवाशांना रेल्वेच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जातात
व त्याही पूर्णपणे मोफत महत्वाचे म्हणजे या सुविधा मिळवणे हा प्रवाशांचा अधिकारच असतो. त्यामुळे रेल्वे तिकिटावर कुठल्या सुविधा रेल्वेकडून मोफत दिल्या जातात किंवा प्रवासी मिळवू शकतात? याबद्दलची माहिती थोडक्यात बघू.
रेल्वे तिकिटावर मिळतात या मोफत सुविधा
1- मोफत प्राथमिक उपचार- समजा तुम्ही रेल्वेने प्रवास करत आहात व प्रवासाच्या दरम्यान अचानक तुमची तब्येत बिघडली व तुम्ही आजारी पडला तर रेल्वेच्या माध्यमातून मोफत प्राथमिक उपचाराची व्यवस्था केली जाते. काही कारणास्तव जर तुम्हाला प्रवासामध्ये मिळेल प्रकृतीमध्ये काहीतरी गंभीर समस्या वाटत असेल
तर तुमच्या पुढील उपचाराची व्यवस्था देखील रेल्वे करते. याकरिता तुम्ही तिकीट कलेक्टर किंवा ट्रेन अधीक्षक किंवा फ्रंट लाईन कर्मचाऱ्यांशी संपर्क साधू शकतात. गरज असेल तर भारतीय रेल्वेच्या माध्यमातून ट्रेनच्या थांब्यावर कमीत कमी शुल्कामध्ये वैद्यकीय उपचारांची व्यवस्था देखील केली जाते.
2- जेवणाची मोफत सुविधा- दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे रेल्वेच्या माध्यमातून मिळणारे मोफत जेवण हे होय. समजा तुम्ही शताब्दी किंवा राजधानी तसेच दुरांतो सारख्या प्रीमियम ट्रेनने प्रवास करत असाल आणि तुमची ट्रेन जर दोन तासापेक्षा जास्त उशिराने असेल तर रेल्वे तुम्हाला फ्री मध्ये जेवण पुरवते.
अशाप्रसंगी तुमची ट्रेन लेट झाली आणि तुम्हाला काहीतरी चांगले खायची इच्छा झाली तर तुम्ही आरई ई- केटरिंग सर्विसच्या माध्यमातून जेवणाची ऑर्डर देखील करू शकतात.
3- स्टेशनवर तुम्हाला एक महिन्यापर्यंत तुमचे लगेज म्हणजे सामान होण्यासाठी लॉकर- समजा तुम्ही प्रवास करत आहात व काही कारणामुळे तुमचे सामान तुम्हाला प्रवासादरम्यान घेऊन जाणे शक्य नसेल तर देशातील सर्व प्रमुख रेल्वे स्थानकांवर क्लॉक रूम आणि लॉकर रूम उपलब्ध आहेत व या ठिकाणी तुम्ही तुमच्या सामान जास्तीत जास्त एक महिन्यापर्यंत ठेवू शकतात. परंतु यासाठी तुम्हाला काही प्रमाणात शुल्क भरावे लागते.
4- वेटिंग हॉल- ट्रेन यायला अजून उशीर असेल किंवा एखाद्या स्टेशनवर तुम्ही उतरला व पुढची ट्रेन पकडण्यासाठी तुम्हाला स्टेशनवर थांबावं लागत असेल तर अशा प्रसंगी तुम्ही नॉन एसी किंवा एसी वेटिंग हॉलमध्ये आरामात थांबू शकता व याकरिता तुम्हाला कोणत्याही प्रकारचे पैसे द्यावे लागत नाहीत. फक्त तुम्हाला ट्रेनचे तिकीट यामध्ये दाखवावे लागते.
5- याप्रसंगी तुम्ही रिफंड मागू शकतात- भारतीय रेल्वेच्या AC1,AC2 आणि AC3 अशा सर्व प्रकारच्या कोचमध्ये प्रवाशांना एक उशी तसेच दोन बेडशीट, एक ब्लॅंकेट आणि एक हॅन्ड टॉवेल दिला जातो. तसेच काही ट्रेनमध्ये प्रवाशांना स्लीपर क्लासमध्ये बेडरोल देखील मिळू शकतात.
परंतु तुम्हाला जर प्रवासादरम्यान अशा पद्धतीने बेडरोल मिळाला नाही तर तुम्ही याबाबत तक्रार करू शकतात व रिफंडचा दावा देखील करू शकतात. परंतु गरीब रथ सारख्या एक्सप्रेसमध्ये या सुविधांकरिता मात्र पंचवीस रुपये शुल्क लागते.