Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात 6वा हफ्ता दिला. लाडक्या बहिणींना सहाव्या हफ्त्यापोटी पंधराशे रुपयांचा लाभ देण्यात आला. खरे तर महायुतीने निवडणुकीच्या काळात राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले तर आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असे आश्वासन दिले होते.
प्रत्यक्षात मात्र डिसेंबर चा हप्ता 1500 रुपयांप्रमाणेच मिळाला. पण, मंत्री आदिती तटकरे यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता दिला जाईल असे स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील असेच संकेत दिले आहेत.
अर्थातच मार्च महिन्यापासून लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे. पण आगामी दोन हप्ते म्हणजेच जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे हफ्ते पंधराशे रुपयांप्रमाणेच मिळणार आहेत. असे असतानाच आता शासनाच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या अर्जांची पडताळणी सुरू करण्यात आली आहे.
फडणवीस सरकारने लाडक्या बहिणीच्या अर्जांची छाननी करण्याचा निर्णय घेतला असून यामध्ये जे अर्ज अपात्र ठरतील त्यांना 2100 रुपये सोडा 1500 रुपये सुद्धा मिळणार आहेत. अशा परिस्थितीत आता आपण लाडकी बहीण योजनेसाठी कोणत्या महिला अपात्र ठरतील यासंदर्भात अगदी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
लाडकी बहीण योजना जुलै 2024 मध्ये सुरू झाली. या योजनेच्या माध्यमातून आत्तापर्यंत जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर या सहा महिन्यांचा लाभ देण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता मकर संक्रांतीच्या आधीच अर्थात 14 जानेवारीच्या आधीच दिला जाणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार मकर संक्रांतीचे औचित्य साधून फडणवीस सरकार 14 जानेवारीच्या आधी लाडक्या बहिणीच्या खात्यात या योजनेचा सातवा हप्ता जमा करू शकते. पण या योजनेचा लाभ खाली दिलेल्या सहा अटी पूर्ण करणाऱ्या महिलांनाच मिळणार आहे.
या अटी पूर्ण करणाऱ्या महिलांनाच मिळणार पैसे
लाडकी बहीण योजनेचा लाभ 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांनाच मिळणार आहे. कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असावे.
घरात कोणाच्याही नावावर चारचाकी वाहन नसावे. ट्रॅक्टर नावावर असल्यास लाभ मिळू शकतो पण इतर चार चाकी वाहन नावावर असेल तर लाभ मिळणार नाही.
एका कुटुंबातील फक्त दोन महिलांना याचा लाभ मिळेल असे म्हटले जात आहे. कुटुंबातील एक अविवाहित महिला सुद्धा यासाठी पात्र राहील, पण तिचे वय 21 वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
अर्जदार महिला किंवा महिलांच्या कुटुंबातील कोणी सदस्य शासकीय नोकरीला असेल तर या योजनेचा लाभ मिळणार नाही.
संजय गांधी निराधार योजनेसारख्या इतर वैयक्तिक लाभाच्या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना याचा लाभ मिळणार नाही.
ज्या महिला महाराष्ट्रातून लग्न करुन दुसऱ्या राज्यात किंवा देशाबाहेर गेल्या आहेत त्यांना लाभ मिळणार नाही.
ज्यांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही अर्ज भरले त्यांचे अर्ज बाद केले जाणार आहेत.