मा.ना.जयकुमार गोरे मंत्री ग्रामविकास व पंचायतराज महाराष्ट्र राज्य यांनी हिवरे बाजारला भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत आमदार राहुल कुल, आमदार काशिनाथ दाते सर, राहुल पाटील शिंदे, प्रशांतकुमार येळाई साहेब कार्यकारी अभियंता प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, दादाभाऊ गुंजाळ उप मु.का.अ.जिल्हा परिषद , शरद मगर गटविकास अधिकारी, बाबुराव जाधव गटशिक्षण अधिकारी तसेच इतर पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
यावेळी त्यांचे हिवरे बाजार येथील अमृतमहोत्सवी प्रवेशद्वारामध्ये स्वागत करून अयोध्या येथील प्रभू श्रीराममूर्तीच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून पद्मश्री पोपटराव पवार यांना मिळालेला शिलांशाचे आज विधिवत पूजन करण्यात आले व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व सरस्वती यांच्या काचप्रतिमेचे अनावरण करण्यात आले
तसेच हिवरे बाजार येथे नव्याने विकसित होत असलेल्या जॉगिंग पार्क येथे एक वृक्ष आईसाठी एक वृक्ष देशासाठी उपक्रमात ग्रामस्थांसमवेत श्रमदान करून सिताअशोक वृक्षाची लागवड त्यांच्या शुभहस्ते करण्यात आली.हिवरे बाजार ग्रामस्थातर्फे त्यांना मानपत्र देण्यात आले व फेटा बांधून स्वागत करण्यात आले.
यावेळी मंत्री पुढे बोलताना म्हणाले, हिवरे बाजार ग्रामस्थांनी पद्मश्री पोपटराव पवार यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक कामात श्रमदानाच्या स्वरुपात किंवा लोकवर्गणीच्या स्वरुपात लोकसहभाग म्हणून आपल्या खिशातून लोकवर्गणी म्हणून दिली आहे.त्यामुळे हिवरे बाजारच्या प्रत्येक नागरिकाला विकासकामाविषयी आत्मीयता वाटते.म्हणून लोकसहभागाशिवाय गावाला गावपण नाही.हिवरे बाजारच्या धर्तीवर पद्मश्री पोपटराव पवारांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यात ग्रामविकासाची कामे करण्याचा मानस त्यांनी हिवरे बाजार भेटीत व्यक्त केला.
ग्रामविकास खात्याची जबाबदारी माझ्यावर असून त्यांची सुरवात हि हिवरे बाजारला भेट देऊन करणार आहोत त्यासाठी पोपटराव पवारांचे वेळोवेळी मार्गदर्शन घेतले जाणार असून नवी संकल्पना घेऊन राज्याचा ग्रामविकासाचा गाडा प्रगतीपथावर नेणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी मान खटाव या माझ्या दुष्काळी मतदारसंघात पोपटराव पवारांच्या हिवरे बाजार येथील जलसंधारणाच्या धोरणाचे प्रभावीपणे काम केलेले आहे.
त्यात पाणी फौंडेशन,जलयुक्तशिवार अभियान यात सहभागी झालो होते.मा.मुख्यमंत्री देवेद्रजी फडणवीस यांचा मानसच आहे ग्रामविकासाची मोठी चळवळ राज्यात आता पुन्हा उभी राहिली पाहिजे त्यादृष्टीनेच आता पूर्णवेळ पोपटराव पवारांचे हिवरे बाजारच्या विकासकामांचे मार्गदर्शन घेऊन काम करणार आहे.