कुटुंबासाठी आहेत बेस्ट सीएनजी कार! किंमत फक्त 5.50 लाख रुपये आणि मायलेज मिळेल जबरदस्त

कुठलीही व्यक्ती जेव्हा कार घ्यायचा विचार करते तेव्हा कमी बजेटमध्ये आपल्याला चांगले मायलेज आणि वैशिष्ट्य असलेली कार मिळेल या दृष्टिकोनातून प्रयत्न करत असते. यामध्ये जितके बजेटला महत्त्व दिले जाते तितकेच आपल्या कुटुंबातील सदस्य संख्या म्हणजेच कुटुंबाचा विचार करून देखील कार निवडीला सध्या प्राधान्य दिले जाते.

Ajay Patil
Published:

Best CNG Car:- कुठलीही व्यक्ती जेव्हा कार घ्यायचा विचार करते तेव्हा कमी बजेटमध्ये आपल्याला चांगले मायलेज आणि वैशिष्ट्य असलेली कार मिळेल या दृष्टिकोनातून प्रयत्न करत असते. यामध्ये जितके बजेटला महत्त्व दिले जाते तितकेच आपल्या कुटुंबातील सदस्य संख्या म्हणजेच कुटुंबाचा विचार करून देखील कार निवडीला सध्या प्राधान्य दिले जाते.

गेल्या काही वर्षापासून जर बघितले तर पेट्रोल आणि डिझेल गाड्यांच्या तुलनेमध्ये सीएनजी कार खरेदी करण्याला प्राधान्य दिले जात आहे व त्यासोबतच आता इलेक्ट्रिक कार देखील मोठ्या प्रमाणावर खरेदी केल्या जात आहेत. यामध्ये जर सीएनजी कारचा विचार केला तर आता त्यांची मागणी वाढताना दिसून येते व दररोजच्या कामानिमित्त लांबचा प्रवास असेल तर सीएनजी कार या फायद्याच्या ठरतात.

पेट्रोल आणि सीएनजीचे दर जर पाहिले तर जवळपास 25 ते 30 रुपयाची तफावत आपल्याला दिसून येते. त्यामुळे पेट्रोल कारच्या तुलनेत सीएनजी कार परवडतात व मायलेजच्या बाबतीत देखील पेट्रोल कारपेक्षा सीएनजी कार सरस असल्याचे दिसून येते.

या दृष्टिकोनातून तुम्हाला देखील सीएनजी कार घ्यायची असेल तर तुमच्या कुटुंबातील सदस्य संख्या पाहून त्या स्पेसनुसार जर सीएनजी कार खरेदी करायची असेल तर बाजारामध्ये चांगल्या कंपन्यांच्या सीएनजी कार सध्या उपलब्ध आहेत. त्यामुळे या लेखात आपण साडेपाच लाख रुपये बजेट मधील काही सीएनजी कारची माहिती थोडक्यात घेणार आहोत.

हे आहे कुटुंबासाठी बेस्ट सीएनजी कार

1- S-presso सीएनजी- ही एक आरामदायी कार असून ती पेट्रोल आणि सीएनजी अशा दोन्ही वेरियंटमध्ये उपलब्ध आहे. या कारच्या पेट्रोल व्हेरियंटमध्ये 1.0- लिटर पेट्रोल इंजिन दिले आहे. तसेच सीएनजी वर्जन जर बघितले तर ते मायलेज च्या बाबतीत अतिशय उत्तम असून ही कार एक किलो सीएनजीमध्ये साधारणपणे 32.73 किलोमीटरचे मायलेज देते.

या कार मधील सिटिंग व्यवस्था जर बघितली तर ती एसयूव्ही सारखी दिसते. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या कारमध्ये अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम व त्यासोबतच ईबीडी व एअरबॅग्स देखील दिले आहेत. या कारची प्रारंभिक किंमत पाच लाख 91 हजार रुपयांपासून सुरू होते.

2- मारुती अल्टो के 10- मारुती सुझुकीची ही कार देखील फॅमिली साठी एक बेस्ट ऑप्शन असून ही कार देखील पेट्रोल आणि सीएनजी अशा दोन्ही व्हेरिएंट मध्ये उपलब्ध आहे. पेट्रोल व्हेरियंटमध्ये पावर करिता या कारमध्ये 1.0- लिटरचे पेट्रोल इंजिन दिले आहे.

मायलेजच्या बाबतीत सीएनजी व्हेरियंट प्रति किलो ते 33.85 किलोमीटरचे मायलेज देऊ शकते. या कारमध्ये पाच व्यक्ती आरामात बसू शकतात व सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम व त्यासोबत ईबीडी आणि एअरबॅग दिलेले आहेत. दिल्लीमध्ये या कारची एक्स शोरूम किंमत पाच लाख 70 हजार रुपयांपासून सुरू होते.

3- मारुती वॅगनार सीएनजी- ही कार देखील एक उत्तम असा पर्याय आहे व कुटुंबासाठी बेस्ट कार आहे. उत्तम स्पेस असलेली कार खरेदी करायची असेल तर मारुती वॅगनार सीएनजी हा बेस्ट ऑप्शन आहे.

ही कार सीएनजी मोडवर प्रति किलो 34.43 किलोमीटरचे मायलेज देते. या कारमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टमसह ईबीडी आणि एअरबॅग देखील देण्यात आलेले आहेत. या कारची सुरवातीची किंमत सहा लाख 44 हजारापासून सुरू होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe