लखनौ : उत्तर प्रदेशात ५० मायक्रॉनपेक्षा पातळ असलेल्या प्लास्टिक पिशव्यांवर रविवार (१ सप्टेंबर)पासून बंदी लागू झाली आहे.
राज्याच्या या आदेशानुसार बंदी असलेल्या पिशव्या खरेदी किंवा विक्री केल्याचे आढळून आल्यास १ लाख रुपयांपर्यंतचा दंड आणि सहा महिन्यांचा कारावास होऊ शकतो, असे राज्य सरकारने जाहीर केलेले आहे.

याबाबतच्या माहितीनुसार, राज्याचे मुख्य सचिव अवनिश अवस्थी यांनी २६ ऑगस्ट रोजी सरकारच्या वतीने परिपत्रक काढून १ सप्टेंबरपासून उत्तर प्रदेशात ५० मायक्रॉनपेक्षा पातळ असलेल्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी लागू झाली आहे.
याचे उल्लंघन करणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई केली जाईल, अशी घोषणा केली होती. तसेच ज्या भागात अशा प्लास्टिक पिशव्या सापडतील अशा पोलीस ठाण्याचे प्रमुख, नागरी अधिकारी, व्यवसाय कर अधिकारी, दंडाधिकारी आणि विभागीय अधिकारी यांच्या विरोधात कडक कारवाई केली जाईल, असेही म्हटलेले होते.
यानंतर रविवार (१ सप्टेंबर)पासून ही बंदी लागू करण्यात आलेली असून, बंदी असतानाही कुणी वापर करत असल्यास याची माहिती देण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. आपली नावे गुपीत ठेवली जातील. यासाठी लखनौ पोलिसांनी हेल्पलाइन नंबर जाहीर केला आहे.
- बँक ऑफ बडोदाची 3 वर्षांची एफडी योजना बनवणार मालामाल ! 100000 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळणार ‘इतके’ रिटर्न
- महाराष्ट्राला मिळणार 100 किलोमीटर लांबीचा नवा रेल्वे मार्ग ! केंद्राच्या मंजुरीनंतर रेल्वे प्रशासनाने सुरू केले काम, कसा असणार रूट?
- Hyundai चा नादखुळा ! 6 लाखाच्या कारवर 60 हजार रुपयांचा डिस्काउंट, सप्टेंबरसाठी कंपनीची खास ऑफर
- जीएसटी कपातीच्या निर्णयानंतर ‘या’ 4 कंपन्यांचे शेअर्स गुंतवणूकदारांना बनवणार मालामाल !
- ‘या’ बँकेच्या शेअर्समध्ये 19.5% ची घसरण होणार ! ब्रोकरेज म्हणतात शेअर्स विकून टाका, नाहीतर….