Pension Calculation:- ज्याप्रमाणे सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतनाचा लाभ दिला जातो. अगदी त्याचप्रमाणे निवृत्ती वेतनाचा लाभ हा खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना देखील मिळतो. आपल्याला माहित आहे की काही खाजगी क्षेत्रामध्ये काम करणारे कर्मचारी देखील ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे सदस्य असतात
व या संघटनेच्या माध्यमातून ईपीएस योजना राबवली जाते व याच योजनेच्या माध्यमातून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना संबंधित कर्मचाऱ्यांना त्यांचा सेवा कालावधी आणि त्या कालावधीत मिळणारे वेतन या आधारावर महिन्याला पेन्शन देत असते. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या माध्यमातून राबविण्यात येणारी ईपीएस म्हणजेच कर्मचारी पेन्शन योजना ही साधारणपणे 16 नोव्हेंबर 1995 रोजी सुरू करण्यात आली.
फॅमिली पेन्शन योजनेमध्ये निवृत्तीवेतनधारकाचा जर मृत्यू झाला तर त्याच्या पश्चात त्याच्या कुटुंबाला पेन्शनचा लाभ दिला जात होता व अगदी त्याचप्रमाणे ईपीएस योजनेच्या माध्यमातून देखील निवृत्तीवेतनधारकाच्या मृत्यूनंतर त्याचे कुटुंब आणि वारशाला ही पेन्शन देण्याची तरतूद आहे. या योजनेचा मूळ उद्देश जर बघितला तर संघटित क्षेत्रातील कामगारांना निवृत्तीनंतरचे नियमित उत्पन्न देणे हा आहे.
ईपीएस योजनेतून पेन्शनचा लाभ मिळण्यासाठी पूर्ण कराव्या लागतात अटी
कर्मचारी पेन्शन योजना अर्थात ईपीएसच्या माध्यमातून जर पेन्शन मिळवायचे असेल तर कर्मचाऱ्यांना काही अटींची पूर्तता करणे गरजेचे असते.यामधील महत्त्वाची अट जर बघितली तर कर्मचाऱ्याला कमीत कमी दहा वर्ष सेवा पूर्ण करावी लागते व वयाची 58 वर्ष पूर्ण होतात तेव्हा त्याला पेन्शन मिळत असते.
तसेच संबंधित कर्मचारी हा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचा नोंदणीकृत सदस्य असणे गरजेचे आहे सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तो जितक्या कालावधीसाठी सेवा देईल त्या कालावधी दरम्यान त्यांनी ईपीएस अर्थात कर्मचारी पेन्शन योजनेमध्ये नियमितपणे योगदान देणे गरजेचे आहे.
आपल्याला माहित आहे की जेव्हा एखादी कंपनी किंवा एखादी संघटीत क्षेत्रातील संस्थेमध्ये काम करायला सुरुवात केली जाते तेव्हा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे सदस्य होता येते व याप्रकारे सदस्य झाल्यानंतर दर महिन्याला पगाराचा काही भाग ईपीएफ आणि ईपीएस अशा दोन्ही ठिकाणी जमा होत असतो.
महिन्याच्या पगारातून जी काही ठराविक रक्कम या दोन्ही ठिकाणी जमा होते ती कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे सदस्य म्हणजेच कर्मचाऱ्यांच्या भविष्यकालीन आर्थिक गरजांसाठी वापरता येते. उदाहरणच घ्यायचे झाले तर त्याला निवृत्तीनंतर पेन्शन मिळणेसाठी किंवा आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर त्याला आर्थिक मदत मिळवणे या माध्यमातून सोपे होते.
कर्मचाऱ्याला पगारातून किती द्यावे लागते योगदान?
जेव्हा कर्मचारी नोकरी करत असतो. तेव्हा त्याच्या नोकरीच्या कालावधीमध्ये त्याच्या मूळ वेतनाच्या 12% रक्कम ईपीएफ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा होते आणि कर्मचारी ज्या कंपनीत काम करतो ती कंपनी देखील तेवढ्याच रकमेचे योगदान संबंधित कर्मचाऱ्यांच्या ईपीएफ खात्यात जमा करते.
परंतु यामध्ये फरक असा आहे की कंपनी जे काही योगदान जमा करते ते दोन भागांमध्ये विभागले जाते व त्यातील 8.33% हिस्सा ईपीएस आणि 3.67% रक्कम ईपीएफ योजनेमध्ये जमा होतो.
ईपीएफओ सदस्य म्हणजेच कर्मचारी पेन्शनसाठी कधी होतात पात्र?
एखादा कर्मचारी पेन्शन मिळण्यासाठी पात्र होण्याकरिता काही पात्रतेच्या अटी देखील आहेत. जर यामध्ये ईपीएस अर्थात कर्मचारी पेन्शन योजनेतील तरतुदी बघितल्या तर संबंधित कर्मचाऱ्याने या पेन्शन योजनेचा सदस्यत्वाची दहा वर्षे पूर्ण झाल्यावर तो पेन्शनसाठी पात्र ठरत असतो व त्यानंतर वयाच्या 58 व्या वर्षी त्याला पेन्शनचा लाभ मिळतो.
वयाच्या 58 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तो निवृत्त झालेला असेल किंवा नसेल तरी देखील वयाची 58 वर्षे पूर्ण झाल्यानंतर आणि अंशदायी सदस्यत्वाचे दहा वर्षे पूर्ण झाल्यानंतर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी सदस्याला काम करताना देखील पेन्शन मिळू शकते
समजा एखादा कर्मचाऱ्याने वयाच्या पन्नासाव्या वर्षीच नोकरी सोडली तरी देखील तो पेन्शन मिळण्यास पात्र ठरतो. परंतु तेव्हा मात्र कमी दराने पेन्शन मिळत असते.
कर्मचारी पेन्शन योजना अर्थात ईपीएस योजनेचे प्रमुख वैशिष्ट्ये
पेन्शन मिळवण्यासाठी पात्र होण्याकरिता दहा वर्ष किमान सेवेचा कालावधी पूर्ण केलेला असणे गरजेचे आहे. वयाच्या 58 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पेन्शनचा लाभ मिळतो व किमान मासिक पेन्शन 1000 रुपये तर कमाल साडेसात हजार रुपये पेन्शन या माध्यमातून मिळते.
केंद्र सरकारने ईपीएस 1995 च्या माध्यमातून 2014 पासून 1000 रुपये किमान पेन्शन प्रत्येक महिन्याला अशा स्वरूपात निश्चिती केलेली आहे. परंतु यामध्ये वाढ करून ही साडेसात हजार रुपये करण्यात यावी अशा पद्धतीची मागणी सध्या होताना दिसून येत आहे.
पेन्शनचे कॅल्क्युलेशन कसे केले जाते?
त्यामध्ये बघितले तर त्याची जी काही पेन्शन पात्र सेवा असेल म्हणजेच त्यांनी पेन्शन फंडामध्ये किती वर्ष पैसे जमा केले आहेत किंवा योगदान दिले आहे आणि त्याचे निवृत्ती पूर्वीचे सरासरी 60 महिन्याचे वेतन यावर पेन्शन कॅल्क्युलेट केली जाते. यामध्ये मासिक पेन्शनची गणना करण्यासाठी तुम्ही एका सूत्राचा देखील वापर करू शकतात हे सूत्र म्हणजे…
मासिक पेन्शन=( पेन्शन योग्य वेतन× पेन्शन पात्र सेवा)/( पेन्शन योग्य वेतन)70
यामध्ये पेन्शन योग्य वेतन म्हणजे गेल्या साठ महिन्याचे सरासरी वेतन( जे कमाल पंधरा हजार रुपये) तसेच पेन्शन पात्र सेवा म्हणजे इपीएस योजनेत किती वर्षे योगदान दिले ते सेवा वर्ष असा त्याचा अर्थ होतो.
हे उदाहरणाने समजून घेऊ
समजा एखाद्या कर्मचाऱ्यांचे पेन्शन योग्य वेतन 15000 रुपये आहे व त्यांनी दहा वर्षे सेवा दिली तर त्याला महिन्याला येणारी पेन्शन जर बघितली तर
मासिक पेन्शन=(15000×10)/70 रुपये= 2143 रुपये
अशा पद्धतीने तुम्ही दहा वर्षे सेवा दिल्यानंतर कर्मचाऱ्याला किती पेन्शन मिळू शकते याचे कॅल्क्युलेशन करता येते. यामध्ये तुमचा सेवा कालावधी जर जास्त असेल तर तुम्हाला मिळणारी मासिक पेन्शन देखील जास्त मिळते.