OnePlus लवकरच लॉन्च करणार सर्वाधिक स्लीम फोल्डेबल स्मार्टफोन ! कसा असणार वनपल्सचा Open 2 स्मार्टफोन ?

Tejas B Shelar
Published:
Oneplus New Smartphone

Oneplus New Smartphone : नवा स्मार्टफोन खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक महत्त्वाचे आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. वन प्लस लवकरच आपला एक नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. OnePlus Open 2 असे या नव्या स्मार्टफोनचे नाव आहे. हा 2025 चा सर्वात आतुरतेने प्रतीक्षेत असलेला फोन आहे आणि तो लवकरच लॉन्च होण्याची अपेक्षा वर्तवली जात आहे.

OnePlus Open 2 हा रिलीज झाल्यावर भारतात लॉन्च झालेल्या सर्वात पातळ फोल्डेबल फोनपैकी एक असू शकतो आणि आता याच्या अधिकृत टीझरने या मुख्य तपशीलाची पुष्टी केली असल्याचे दिसत आहे. दरम्यान आता आपण या स्मार्टफोनची तपशीलवार माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात.

दुसरीकडे प्रमुख स्मार्टफोन उत्पादक कंपनी OPPO आपला नेक्स्ट जेनरेशन फोल्डेबल फोन, Find N5 सुद्धा येत्या काही दिवसांनी लॉन्च करणार अशी अपेक्षा आहे. नुकत्याच काही महिन्यांपूर्वी OnePlus Open आणि OPPO Find N3 हे कंपनीचे वेगवेगळ्या सॉफ्टवेअरसह लाँच करण्यात आलेले मूलत: सारखेच डिव्हाइस होते.

आता त्याप्रमाणेच OnePlus Open 2 चे डिझाइन आणि हार्डवेअर Find N5 सारखेचं राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. OnePlus चे CEO Pete Lau यांनी OPPO Find N5 चा चिनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Weibo वर पोस्ट केला आहे, यात त्यांनी अप्रत्यक्षपणे सुचवले आहे की OnePlus Open 2 मध्ये अल्ट्रा-स्लिम डिझाइन असेल.

Lau ने तीक्ष्ण पेन्सिलच्या शेजारी OnePlus Open 2/Oppo Find N5 चे साइड प्रोफाईल कसे दिसते हे दर्शवणारी प्रतिमा शेअर केली, तसेच ती आणखी पातळ होईल अस सूचित केलं आहे. Lau ने असे लिहिलय की, “फेब्रुवारीमध्ये भेटू,” यावरून हा फोन लॉन्च होण्यास फक्त काही दिवसांचा काळ बाकी आहे असे म्हटले जाऊ लागले आहे.

हा टीझर अलीकडील रिपोर्टची पुष्टी करतो की OnePlus Open 2 लॉन्च करताना सर्वात पातळ फोल्डेबल असू शकतो. सध्या, Honor Magic V3 जो की 4.35mm चा आहे तो उघडल्यावर सर्वात पातळ फोल्डेबल फोन ठरतोय. यूएस मध्ये, Google Pixel 9 Pro Fold हा सर्वात पातळ फोन आहे परंतु हा फोन उलगडल्यावर 5mm पेक्षा जास्त भरतो.

सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड 6 उघडल्यावर 5.6 मिमी इतकां जाड आहे. OnePlus Open 2 एक रोमांचक फोल्डेबल स्मार्टफोन ठरू शकतो असे म्हटले जात आहे. IPX8 डस्ट आणि वॉटर रेझिस्टन्स रेटिंग असे अनेक फीचर्स या स्मार्टफोन मध्ये पाहायला मिळतील. हा स्मार्टफोन नेमका कधी लॉन्च होणार ? याबाबत कोणतेच अधिकृत माहिती समोर आलेली नाही पण लवकरच हा स्मार्टफोन बाजारात येऊ शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe