Cheapest electric car : १ लाखांत इलेक्ट्रिक कार ! सिंगल चार्जवर किती चालणार ?

Sushant Kulkarni
Published:

Cheapest electric car : भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहनांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे, आणि अनेक कंपन्या स्वस्त आणि पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक कार लाँच करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अशाच एक नवीन स्वस्त इलेक्ट्रिक कारबद्दल मोठी माहिती समोर येत आहे. Ligier Mini EV नावाची ही इलेक्ट्रिक कार लवकरच भारतात लाँच होऊ शकते. खरेतर, या कारची किंमत सुमारे १ लाख रुपये असू शकते, ज्यामुळे ती एक आकर्षक पर्याय ठरू शकते.

Ligier Mini EV एक स्वस्त आणि मस्त आणि आकर्षक इलेक्ट्रिक कार ठरू शकते, जी १ लाख रुपयांत उपलब्ध होईल. सिंगल चार्जवर १९२ किमीपर्यंत रेंज आणि स्पोर्टी डिझाइन हे त्याचे मुख्य आकर्षण असू शकते. जर तुम्ही स्वस्त इलेक्ट्रिक कारच्या शोधात असाल, तर Ligier Mini EV तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो.

तब्बल १९२ किमीची रेंज
Ligier Mini EV च्या फीचर्सबद्दल समोर आलेल्या माहितीनुसार, या इलेक्ट्रिक कारची सिंगल चार्जवर रेंज ६३ किलोमीटरपासून १९२ किलोमीटरपर्यंत असू शकते. बॅटरी क्षमता आणि व्हेरिएंटच्या आधारावर ही रेंज बदलू शकते. यामुळे, स्वस्त इलेक्ट्रिक कार शोधणाऱ्यांसाठी ही कार एक उत्तम पर्याय ठरू शकते.

असे असतील व्हेरिएंट्स
Ligier Mini EV चार प्रकारांमध्ये लॉन्च केली जाऊ शकते, ज्यामध्ये G.OOD, I.DEAL, E.PIC आणि R.EBEL समाविष्ट आहेत. या व्हेरिएंट्सनुसार, कारमध्ये तीन बॅटरी पॅक पर्याय उपलब्ध असू शकतात: 4.14 kWh, 8.2 kWh आणि 12.42 kWh. प्रत्येक बॅटरी पॅकच्या सहाय्याने कारचे रेंज बदलू शकते.

डिझाइन आणि इंटेरियर
Ligier Mini EV चा डिझाइन खूपच आकर्षक आणि कॉम्पॅक्ट आहे. या कारचा आकार छोटा असला तरी, त्यात एक स्पोर्टी लूक आहे. तिचे डिमेन्शन्स २९५८ मिमी लांबी, १४९९ मिमी रुंदी आणि १५४१ मिमी उंचीच्या आसपास असू शकतात.

फक्त दोन दरवाजे
युरोपीय मॉडेलवर आधारित या इलेक्ट्रिक कारमध्ये दोन दरवाजे आणि १२-१३ इंचाची चाके असू शकतात.कारच्या फ्रंटला एलईडी डीआरएल, गोल हेडलाइट्स आणि स्लिम ग्रिल दिसेल. याव्यतिरिक्त, गोल एलईडी टेललाइट्स आणि स्पोर्टी साईड लूक कारला आकर्षक बनवेल.

१० इंचाची टचस्क्रीन
Ligier Mini EV च्या इंटेरियर्समध्ये १० इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम असणार आहे, ज्यामध्ये अ‍ॅपल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटो सपोर्ट मिळेल. तसेच, पॉवर स्टीयरिंग, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, हीटेड ड्रायव्हर सीट आणि कॉर्नर एसी वेंट्स यांसारखे आरामदायक फिचर्स देखील असणार आहेत.

ग्राहकांना वाट पाहावी लागणार…
ही कार ऑटो एक्सपोमध्ये प्रदर्शित केली जाऊ शकते, असा अंदाज आहे. त्यामुळे, ग्राहकांना त्याची वाट पाहावी लागणार आहे, परंतु या कारच्या लाँचनंतर अधिक माहिती मिळू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe