Meme Coin म्हणजे काय ? ज्याने डोनाल्ड आणि मेलानिया ट्रम्प एकाच वेळी झाले श्रीमंत !

Ajay Patil
Published:

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प यांनी त्यांच्या स्वतःच्या मेम कॉइन लाँच करून क्रिप्टो जगतात खळबळ उडवून दिली आहे. ट्रम्प यांनी $TRUMP नावाचा मेम कॉइन लाँच केला होता,

तर मेलानिया यांनी त्याच्या धर्तीवर $MELANIA नावाचे मेम कॉइन लाँच केले आहे. या दोन्ही कॉइनने केवळ क्रिप्टो मार्केटमध्ये लोकप्रियता मिळवली नाही, तर त्याच्या मूल्यवाढीमुळे दोघेही एकाच वेळी श्रीमंत झाले आहेत.

ट्रम्प आणि मेलानिया कॉइनची लोकप्रियता
या दोन्ही नाण्यांचा बाजारातील मार्केट कॅप 24,000% ने वाढला आहे, ज्यामुळे त्यांचे एकत्रित मूल्य $60 अब्ज पर्यंत पोहोचले आहे. यामुळे डोनाल्ड ट्रम्प हे जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींच्या यादीत सामील झाले आहेत. CoinGecko च्या अहवालानुसार, $TRUMP हे क्रिप्टो मार्केटमधील 22वे सर्वाधिक महागडे क्रिप्टो चलन आहे, तर $MELANIA हे 94व्या क्रमांकावर आहे. ट्रम्प यांच्या लोकप्रियतेमुळे या कॉइनने अल्पावधीतच क्रिप्टो जगतात महत्त्वाचे स्थान मिळवले आहे.

मेम कॉइन म्हणजे काय?
मेम कॉइन हे इंटरनेट मीम्स किंवा ट्रेंडमधून प्रेरित क्रिप्टोकरन्सी आहेत. जसे की, डॉजकॉइन (Dogecoin) किंवा शीबा इनु (Shiba Inu) हे प्रसिद्ध मेम कॉइन आहेत, तसेच $TRUMP आणि $MELANIA हेही मीमवर आधारित आहेत. हे कॉइन सामान्य क्रिप्टोकरन्सीप्रमाणेच ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित असतात. मात्र, ते खूप अस्थिर असतात आणि त्यांचे मूल्य प्रामुख्याने सोशल मीडिया, ट्रेंड्स, आणि समुदायाच्या उत्साहावर अवलंबून असते.

कॉइनची मागणी झपाट्याने
मेम कॉइनची तुलना सट्ट्याशी केली जाते कारण त्याचे मूल्य कधीही अचानक वाढू शकते किंवा घसरू शकते. इंटरनेटवरील मीम्स किंवा लोकप्रिय व्यक्तींच्या नावाशी जोडले गेले की, या कॉइनची मागणी झपाट्याने वाढते. त्यामुळे हे कॉइन अल्पावधीत मोठा परतावा देण्याची क्षमता ठेवतात, पण त्यामध्ये जोखीमही खूप असते.

ट्रम्प आणि क्रिप्टो मार्केटमधील वर्चस्व
डोनाल्ड ट्रम्प यांनी क्रिप्टोकरन्सीला अनुकूल धोरण आणण्याचे वचन दिले आहे. त्यांचे प्रशासन क्रिप्टो उद्योगाशी संबंधित विविध भूमिकांमध्ये महत्त्वाच्या व्यक्तींना स्थान देत आहे. यामुळे क्रिप्टोकरन्सी क्षेत्रात ट्रम्प कुटुंबाचे वर्चस्व निर्माण झाले आहे.

क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये स्पर्धेला सुरुवात
$TRUMP आणि $MELANIA हे केवळ क्रिप्टोकरन्सी नाहीत तर ट्रेंड आणि लोकप्रियतेचे प्रतीक बनले आहेत. या मेम कॉइनने अल्पावधीत मोठी प्रसिद्धी मिळवली असून, यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी जोखीम आणि संधी यांचे मिश्रण आहे. ट्रम्प कुटुंबाच्या या क्रिप्टो उपक्रमांमुळे, क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये नवीन स्पर्धेला सुरुवात झाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe