अहिल्यानगर प्रतिनिधी: डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या विळद घाट येथील आयटीआयमध्ये क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, दिनांक 21 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता या क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले.
विद्यार्थी जीवनातील खेळाचे महत्त्व अधोरेखित करताना उद्घाटन समारंभात “आरोग्यम् धनसंपदा” या म्हणीचे महत्त्व सांगितले गेले. खेळामुळे शिस्त, परिश्रम, संघभावना आणि नेतृत्व गुणांचा विकास होतो, असे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.
क्रीडा सप्ताहामध्ये क्रिकेट, व्हॉलीबॉल, खो-खो, कबड्डी यांसारख्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य ए. व्ही. सूर्यवंशी, सर्व शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली आहे.
विखे पाटील आयटीआयचे ठिकाण औद्योगिक वसाहतीत असल्यामुळे विद्यार्थ्यांना औद्योगिक वातावरणाचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो. संस्थेत उत्कृष्ट शिक्षण, उच्च दर्जाचे प्रशिक्षण, यंत्रसामग्री, अनुभवी शिक्षकवर्ग, मोठे क्रीडांगण आणि निसर्गरम्य परिसर उपलब्ध असल्यामुळे हे महाविद्यालय जिल्ह्यात लोकप्रिय आहे.
या क्रीडा सप्ताहाला राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुजय विखे पाटील, डायरेक्टर पी. एम. गायकवाड, डॉ. अभिजीत दिवटे, आणि डेप्युटी डायरेक्टर सुनील कलापुरे यांनी प्रोत्साहन दिले. त्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.