अहमदनगर Live24 टीम,17 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात परतीच्या पावसाने हौदास माजवला आहे. मुसळधार कोसळणाऱ्या या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास हिरावून घेतला आहे.
अशा संकटमय काळात कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार तात्काळ शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावले आहे. कर्जत तालुक्यातील अनेक भागात अतिवृष्टीमुळे शेतीपिकांसह रस्ते, शेत, घरे आदींचे नुकसान झाले.
काही ओढे क्षमतेपेक्षा जास्त वाहिल्याने अनेक रस्ते वाहून गेले आहेत. काही ठिकाणचे पूलही यामध्ये वाहून गेल्यामुळे गावांचा संपर्क तुटला. तीन दिवसांपूर्वी भरपावसात शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी आमदार रोहित पवार यांनी केली होती.
आज त्यांनी तालुक्यातील अनेक ठिकाणी भेटी देत नुकसानीची पाहणी केली. या वेळी आ. पवारांनी ठेकेदाराला संपर्क साधत रस्ता दुरुस्तीच्या सूचना दिल्या.
याच ठिकाणी असलेल्या स्मशानभूमीच्या पडलेल्या भिंतीची व निकृष्ट कामाची पाहणी करीत या कामाची चौकशीच्या सूचना देण्यात आल्या. परीटवाडी येथील ओढ्यावरील पूल पुरात वाहून गेल्याने पुलावरील वाहतूक बंद झाली होती.
या पुलावर आ. पवारांच्या माध्यमातून भराव करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचा तात्काळ पंचनामा करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
ऊसतोडणीसाठी दाखल झालेल्या ऊसतोड मजुरांसाठी गावातील शाळा, मंदिरे राहण्याची सोय करण्याचे आदेश पवार यांनी दिले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved