Mpkv Recruitment : कृषी क्षेत्रात करिअर सुरू करण्याची उत्तम संधी ! 787 नवीन नोकऱ्या – लवकर अर्ज करा!

Published on -

Mpkv Recruitment : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, अहमदनगर यांनी विविध पदांच्या भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीत गट क आणि गट ड अंतर्गत वरिष्ठ लिपीक, लघुटंकलेखक, लिपीक-नि-टंकलेखक, प्रमुख तालिकाकार (ग्रंथालय), कृषि सहायक, पशुधन पर्यवेक्षक, कनिष्ठ संशोधन सहायक, मजुर आणि इतर विविध पदांच्या एकूण ७८७ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. अर्जाची प्रक्रिया पूर्णपणे ऑफलाईन आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जानेवारी २०२५ आहे.

विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादेची विस्तृत माहिती देण्यात आली आहे. उदाहरणार्थ, वरिष्ठ लिपीकांसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची किमान पदवी आवश्यक आहे तर लघुटंकलेखक पदासाठी एस.एस.सी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण आणि शासकीय मान्यताप्राप्त इंग्रजी लघुलेखक परीक्षा ८० श.प्र.मि. वेग मर्यादा आणि ४० श.प्र.मि. वेग मर्यादेचे टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे.

अर्ज करण्यासाठी अराखीव प्रवर्गातील उमेदवारांकडून १०००/- रुपये तर मागास प्रवर्ग / आर्थिक दुर्बल घटक / अनाथ यांच्यासाठी ९००/- रुपये शुल्क आकारले जाईल. उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडून महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील पत्त्यावर पाठवावे.

या भरतीसाठी वेतनश्रेणी सुद्धा विविध पदांनुसार भिन्न आहे, जसे की वरिष्ठ लिपीक आणि लघुटंकलेखकांसाठी २५५००-८११००/- रुपये आहे. या सर्व माहितीची पुष्टी करण्यासाठी आणि अधिकृत वेबसाईटवरील तपशीलवार जाहिरात पाहण्यासाठी https://mpkv.ac.in/ ही संकेतस्थळ पाहा .

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe