Skoda Kylaq 2025 ची डिलिव्हरी सुरू ! 8 लाखांपेक्षा कमी किंमतीत मिळणार…

Skoda Kylaq News : स्कोडा इंडियाने आपल्या मॉडेल कायलाक SUV ची डिलिव्हरी सुरू केली असून ही SUV भारतीय बाजारात प्रचंड चर्चेत आहे. सब-फोर मीटर SUV सेगमेंटमधील ही नवी कार, टाटा नेक्सॉन, मारुती ब्रेझा आणि ह्युंदाई वेन्यू सारख्या लोकप्रिय मॉडेल्सना टक्कर देण्यासाठी आली आहे. स्कोडा कायलाक ने ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन परवडणाऱ्या किमतीत उत्कृष्ट फीचर्स उपलब्ध करून दिले आहेत.

Skoda Kylaq किंमत

स्कोडा कायलाक SUV चार मॉडेल्स मध्ये सादर केली गेली आहे – क्लासिक, सिग्नेचर, सिग्नेचर प्लस आणि प्रेस्टीज. SUV ची सुरुवातीची किंमत 7.89 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. कमी किमतीमुळे ही SUV बजेट फ्रेंडली खरेदीदारांसाठी एक उत्कृष्ट पर्याय ठरणार आहे.

Skoda Kylaq डिझाईन

कायलाकमध्ये प्रीमियम लुक देणारे आधुनिक डिझाईन आहे. SUV मध्ये मोठ्या टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम साठी सपोर्ट आहे, जो वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले ला सपोर्ट करतो. इतर वैशिष्ट्यांमध्ये ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, वायरलेस चार्जर, TPMS (टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम), सनरूफ, आणि सहा एअरबॅग्स स्टँडर्ड म्हणून समाविष्ट आहेत.

Skoda Kylaq इंजिन

स्कोडा कायलाकमध्ये 1.0-लिटर TSI पेट्रोल इंजिन दिले गेले आहे, जे 114bhp पॉवर आणि 178Nm टॉर्क जनरेट करते. SUV दोन ट्रान्समिशन पर्यायांसह येते – सहा-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्स. या परफॉर्मन्समुळे ही SUV शहर आणि महामार्गावर दोन्ही ठिकाणी सहज चालवता येईल.

Skoda Kylaq स्पर्धा

स्कोडा कायलाकची किंमत आणि फीचर्स लक्षात घेता, ती Tata Nexon, Maruti Brezza, Kia Sonet, Hyundai Venue, Citroën Basault, Nissan Magnite, Renault Kiger, आणि Mahindra XUV 3OO सारख्या गाड्यांसोबत स्पर्धा करणार आहे. भारतीय बाजारात आधीच खडतर स्पर्धा असतानाही, स्कोडा आपल्या शक्तिशाली वैशिष्ट्ये आणि आकर्षक किंमती यांच्या जोरावर ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहे.

ग्राहकांसाठी आकर्षण

स्कोडा कायलाकने आपल्या परवडणाऱ्या किमती, आधुनिक फीचर्स, आणि उच्च-गुणवत्तेच्या परफॉर्मन्स मुळे खरेदीदारांना आकर्षित केले आहे. SUV मध्ये देण्यात आलेल्या प्रीमियम वैशिष्ट्यांमुळे ती या श्रेणीतील इतर गाड्यांच्या तुलनेत अधिक मूल्यवान ठरण्याची शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe