अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- अकोले तालुक्यामध्ये बऱ्यापैकी विकासकामे झाली आहेत. तर विविध कामे सुरु आहेत. परंतु बरीचशी कामे अनेक कारणामुळे बंदही होत असतात. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व अगस्ती सह.
साखर कारखान्याचे संचालक मिनानाथ पांडे यांनी अकोले तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेली प्रलंबीत कामे पूर्ण व्हावीत, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहे.
संगमनेर येथे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने मंत्री चव्हाण आले असता मिनानाथ पांडे यांनी त्यांना प्रत्यक्ष निवेदन देऊन या प्रश्नाबाबत चर्चा केली. त्यात असे म्हटले की, अकोले येथे 2006 मध्ये राज्य शासनाच्या धोरणानुसार महसूल, वन, कृषी, दुय्यम निबंधक व इतर शासकीय कार्यालये एकाच इमारतीमध्ये करावयाचे.
त्यानुसार त्या इमारतीला प्रशासकीय मंजुरी मिळालेली आहे. या इमारतीचे काम 14 वर्षांपासून चालू असून इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून या इमारतीमध्ये फर्निचर, कलर, लाईट फिटिंग व सुशोभीकरण करण्याचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे बांधकाम पूर्ण झालेली इतकी मोठी इमारत बांधून धूळखात पडली आहे.
याबाबतचा सुधारित प्रशासकीय मंजुरीचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून आपल्या खात्याकडे पडून आहे, त्यास सुधारीत प्रशासकीय मंजुरी देऊन ही प्रशासकीय इमारत पूर्ण करण्यात यावी. अकोले देवठाण रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव मंजूर आहे.
परंतु निधी अभावी हे काम बंद आहे. तरी या रस्त्यासाठी निधी मंजूर करून ह्या रस्त्याचे काम सुरू करण्याचे आदेश संबंधितांना द्यावेत, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved