प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ फोटोग्राफी आणि फिल्म मेकिंग स्टुडिओचे लोणी येथे भव्य उद्घाटन सोहळा

Published on -

लोणी येथे कुमार तुषार फुलाटे यांनी सुरू केलेल्या प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ फोटोग्राफी आणि फिल्म मेकिंग या स्टुडिओचा उद्घाटन समारंभ डॉ. सुजय दादा विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.

यानंतर डॉ. विखे पाटील यांनी स्टुडिओची पाहणी केली आणि उपस्थित बांधवांशी मनमोकळा संवाद साधला. या विशेष प्रसंगी फुलाटे परिवाराच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला, ज्याचा स्वीकार करून त्यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

फोटोग्राफी आणि फिल्म मेकिंग या क्षेत्रात नवोदितांना व्यावसायिक प्रशिक्षण मिळावे, तसेच प्रवरेच्या मातीतून घडलेल्या तरुणांना संधी उपलब्ध व्हावी, हा संस्थेचा उद्देश असल्याचे मत डॉ विखे यांनी केले

यावेळी विविध मान्यवरांसह Reels Star देखील उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ फोटोग्राफी आणि फिल्म मेकिंग च्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News