लोणी खुर्द ब्लॅकमेलिंग प्रकरण : पैशांसाठी धमकी देणारी मनीषा साबळे आणि साथीदाराला पोलिस कोठडी !

Published on -

राहाता तालुक्यातील लोणी खुर्द गावातील शरद आहेर यांना बदनामीची धमकी देऊन पैसे घेतल्याबद्दल ‘ मनीषा’ व तिच्या एका साथीदाला दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. लोणी खुर्द येथील प्रतिष्ठित व्यक्ती किरण किसनराव आहेर यांना नाशिक येथील मनीषा विजय साबळे या महिलेने समाज माध्यमावर ओळख करून नंतर त्यांना बदनामी करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून पैशांची मागणी केल्याबद्दल लोणी पोलिसात मनीषा साबळे आणि तिच्या साथीदारांवर गुन्हा दाखल झाला होता.

त्यात आरोपींना तात्पुरता अटकपूर्व जामीन मिळाला असताना लोणी खुर्द येथील शरद बाबासाहेब आहेर यांनी मनीषा विजय साबळे,श्रीकांत तान्हाजी मापारी व रणजित उत्तम आहेर यांच्या विरुद्ध लोणी पोलिसात तक्रार दिल्याने पोलिसांनी दुसरा गुन्हा दाखल केला होता.

यात फिर्यादी शरद आहेर यांनी म्हटले होते की,अनोळखी मोबाईल नंबरवरून मला मेसेज आला होता.मी त्यांना कॉल करण्यास सांगितले.एक महिला माझ्याशी बोलत होती.तिने तुमचा डीपी आवडला म्हणून मेसेज केल्याचे सांगताना तिचे नाव मनीषा विजय साबळे रा.नाशिक असे सांगितले.ती माझ्याशी गोड बोलायची. तिने २९ जून रोजी मला भेटायला बोलावले.लोणी-तळेगाव रस्त्यावर बैलबाजाराजवळ संध्याकाळी मी भेटायला गेलो. तिने माझ्याकडे तुमचे सर्व कॉलचे रेकॉर्डिंग आहे.

मला मदत करा नाही तर मी तुमची बदनामी करीन. तुमच्या विरुद्ध विनयभंग आणि बलात्काराचा प्रयत्न केला म्हणून पोलिसात तक्रार दाखल करीन. ती माझ्याशी लगट करू लागली.कपडे काढू लागली.मी घाबरून गेलो.मी तिला पैसे दिले. तेवढ्यात तिथे अंधारातून रणजित आहेर आणि श्रीकांत मापारी हे लोणी खुर्द गावातील दोघे जण तिथे आले.त्यांनी मला लाथाबुक्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.गावात कुणाला काही सांगू नको नाही तर तुझी बदनामी करू अशी धमकी दिली.

मी घाबरून गेल्याने मी उशिरा फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी मनीषा,रणजित व श्रीकांत यांच्याविरुद्ध गु.र.नं.४७०/२३ भादवि कलम ३८८,३८९,१२०(ब), ५०६ नुसार गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्ह्यांमध्ये आरोपी रंजीत आहेर ,श्रीकांत मापारी सर्व रा.लोणी खु,मनीषा साबळे, रा.नाशिक यांचा अटकपूर्व जामीन सत्र न्यायालय राहाता यांनी फेटाळला . नमूद गुन्ह्यातील आरोपी रंजीत आहेर रा.लोणी खू व मनीषा साबळे रा.नाशिक यांना दिनांक २९ जानेवारी २०२५ रोजी अटक करण्यात आली. राहाता न्यायालयात हजर केले असता दिनांक ३१ जानेवारी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आल्याच माहिती सपोनि कैलास वाघ यांनी दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News