मालकाला देण्याऐवजी तब्बल १९ लाखांचे टायर परस्पर विकले : पोलिसांनी आठ जणांसोबत केले असे काही…

Ahmednagarlive24
Published:

Ahilyanagar news : टायर कंपनीने सांगितलेल्या पत्यावर टायर देण्याऐवजी कंटेनर चालकाने तब्बल १९लाखांचे टायर परस्पर विकले होते. मात्र हे टायर विकत घेण्याऱ्यासह त्याचा साथीदार बेल्हे गावात तांबेवाडी परिसरात टायर विक्री करण्याकरीता आला असता पोलिसांच्या सापळ्यात अडकले.

एका कंटेनरच्या ड्रायव्हरने टायरची परस्पर विक्री केली होती. या प्रकरणी सुपा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत इरशाद निशार अहमद (वय ५५, रा. उत्तर प्रदेश) व अब्दुल कय्युम अब्दुल वहाब शाह (रा. चाळीसगाव, धुळे) यांना अटक करण्यात आली होती.

त्यांच्याकडून २ लाख ५२ हजार रुपये किंमतीचे १२ टायर जप्त करण्यात आले होते. याच गुन्ह्यात आणखी ५ आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून १९ लाख ९४ हजार ६५० रुपये किंमतीचे ९७ टायर्स हस्तगत करण्यात आले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही धडाकेबाज कारवाई करुन आरोपींचा मुसक्या आवळल्या आहेत.

अन्सार अहमद नायब अली (रा. उत्तर प्रदेश), जैद खान अजिम खान मोहंमद (रा. मुंबई), शिवलाल हसमुखलाल शहा (रा. गुजरात), योगेश अरुण गुंजाळ (रा. बेल्हे, जुन्नर, जि. पुणे) व वैभव भगवंता चौधरी (रा. जामगाव, ता. पारनेर) असे अटक करण्यात आलेल्या ५ आरोपींची नावे आहेत. या आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणांहून पोलिसांनी ताब्यात घेतले.

त्यांच्याकडून १९ लाख ९४ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. २७ डिसेंबर २०२४ रोजी कंटेनर (क्र.पीबी १३, एडब्ल्यू ५०६४) चालकाने सीएट कंपनीच्या टायरची परस्पर विक्री केली होती. या प्रकरणी सुपा पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

या गुन्ह्याचा तपास एलसीबीच्या पथकाने वेगाने फिरवला. १९ जानेवारी २०२५ रोजी दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून २ लाख ५२ हजाराचा ऐवज जप्त केला होता. त्याच गुन्ह्यातील आता ५ आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून,

त्यांच्याकडून १९ लाख ९४ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्यात जावेद खान (रा. प्रतापगड, उत्तर प्रदेश), शरीफ खान (रा. राणी गंज, उत्तर प्रदेश), जोसेफ अली (रा. पीरथीगंज, उत्तर प्रदेश) हे तिघे आरोपी पसार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe