RBI News | सोमवारी बँका बंद राहणार, RBI ची माहिती; फेब्रुवारीत किती दिवस बँकांना सुट्ट्या राहणार ? पहा….

आरबीआयकडून बँकांच्या सुट्ट्यासंदर्भात महत्त्वाची बातमी समोर येत आहे. RBI ने दिलेल्या माहितीनुसार उद्या सोमवार, 3 फेब्रुवारी 2025 रोजी बँका बंद राहतील. सोमवारी सरस्वती पूजनामुळे बँका बंद राहणार का, असा प्रश्न बहुतांश बँक ग्राहकांच्या मनात होता.

Tejas B Shelar
Published:

RBI News : जानेवारी महिन्यानंतर आता फेब्रुवारी महिन्याला सुरुवात झालीये. काल, एक फेब्रुवारी 2025 ला केंद्रातील सरकारने संसदेत अर्थसंकल्प मांडला. तिसऱ्यांदा सत्ता स्थापित केल्यानंतर केंद्रातील सरकारने पहिल्यांदाच पूर्ण अर्थसंकल्प मांडला आहे. अशातच आता आरबीआयकडून बँकांच्या सुट्ट्यासंदर्भात महत्त्वाची बातमी समोर येत आहे.

RBI ने दिलेल्या माहितीनुसार उद्या सोमवार, 3 फेब्रुवारी 2025 रोजी बँका बंद राहतील. सोमवारी सरस्वती पूजनामुळे बँका बंद राहणार का, असा प्रश्न बहुतांश बँक ग्राहकांच्या मनात होता.

तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की बसंत पंचमी आणि सरस्वती पूजेमुळे या दिवशी बँका बंद राहणार आहेत. पण, उद्या सर्वचं राज्यांऐवजी काही राज्यांमध्येच बँका बंद राहणार आहेत. दरम्यान आता आपण RBI ने दिलेली फेब्रुवारी महिन्यातील सुट्ट्यांची यादी जाणून घेणार आहोत.

3 फेब्रुवारी 2025 रोजी देशातील या राज्यांमध्ये बँकांना सुट्टी राहणार!

आगरतळा येथे सोमवार ३ फेब्रुवारी रोजी सरस्वती पूजनाच्या निमित्ताने सर्व बँका बंद राहतील. हा सण विद्येची आणि ज्ञानाची देवी माता सरस्वतीच्या उपासनेला समर्पित आहे, जो त्रिपुरासह देशभरात मोठ्या भक्तिभावाने आणि आनंदाने साजरा केला जातो.

त्रिपुरामध्ये बँका बंद राहतील. बाकी, सर्व राज्यांमध्ये बँका सुरू राहतील. बँका बंद असताना सुट्ट्यांच्या दिवशीही ग्राहक एटीएम, कॅश डिपॉझिट, ऑनलाइन बँकिंग आणि मोबाईल बँकिंग वापरू शकतात.

या दिवशी बँका बंद राहणार

3 फेब्रुवारी 2025 : वसंत पंचमी आणि सरस्वती पूजन यामुळे या दिवशी त्रिपुरा, आगरतळा येथे बँका बंद राहणार आहेत.
मंगळवार, 11 फेब्रुवारी: थायपुसम निमित्त चेन्नईमध्ये बँका बंद राहतील.
बुधवार, 12 फेब्रुवारी: संत रविदास जयंतीनिमित्त शिमल्यात बँका बंद राहणार आहेत.
शनिवार, 15 फेब्रुवारी: लोई-न्गाई-नी निमित्त इंफाळमध्ये बँका बंद राहतील.
बुधवार, 19 फेब्रुवारी : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त बेलापूर, मुंबई आणि नागपूरमध्ये बँका बंद राहणार आहेत.
गुरुवार, 20 फेब्रुवारी: राज्य स्थापना दिनानिमित्त आयझॉल आणि इटानगरमध्ये बँका बंद राहतील.
बुधवार, 26 फेब्रुवारी: अहमदाबाद, आयझॉल, बेंगळुरू, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, डेहराडून, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोची, लखनौ, मुंबई, नागपूर, रायपूर, रांची, शिमला, श्रीनगर येथे महाशिवरात्रीनिमित्त आणि तिरुअनंतपुरम बँका बंद राहतील.

किती दिवस आठवडी सुट्टी ?

2 फेब्रुवारी : रविवार असल्याने बँका बंद राहणार आहेत.
आठ फेब्रुवारी : महिन्याचा दुसरा शनिवार असल्याने बँका बंद राहतील.
9 फेब्रुवारी : रविवार असल्याने बँका बंद राहणार आहेत.
16 फेब्रुवारी : रविवार असल्याने बँका बंद राहतील.
22 फेब्रुवारी : महिन्याचा चौथा शनिवार असल्याने बँका बंद राहतील.
23 फेब्रुवारी : रविवार असल्याने बँका बंद राहणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe