Post Office Scheme : आपण सर्वजण आपले भविष्य आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावे यासाठी गुंतवणुकीचा पर्याय स्वीकारतो. आपल्यापैकी अनेक जण पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करत आहेत. तसेच काहीजण भविष्यात पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये पैसा गुंतवण्याचा तयारीत आहेत.
दरम्यान जर तुम्हालाही पोस्टाच्या बचत योजनांमध्ये पैसा गुंतवायचा असेल तर तुमच्यासाठी आजचा हा लेख कामाचा ठरणार आहे. आज आपण पोस्टाच्या एका लोकप्रिय बचत योजनेची माहिती जाणून घेणार आहोत. पोस्ट ऑफिस च्या माध्यमातून पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम सुरू करण्यात आली आहे.
या योजनेत गुंतवणूकदारांना एकदा गुंतवणूक करावी लागते आणि त्यानंतर मग या गुंतवणुकीवर गुंतवणूकदारांना व्याज स्वरूपात रिटन दिले जातात. पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीममध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना पोस्ट ऑफिसकडून चांगले आकर्षक व्याजदर मिळत असून ही योजना पूर्णपणे सुरक्षित आहे.
या योजनेतून गुंतवणूकदारांना दरमहा 9250 रुपये इतके व्याज मिळू शकते. म्हणजे या योजनेतून वार्षिक कमाल एक लाख 11 हजार रुपयांपर्यंतचे व्याज मिळवता येते. अशा परिस्थितीत आज आपण या योजनेचे स्वरूप आणि या योजनेतून कशा पद्धतीने दरवर्षी एक लाख 11 हजार रुपयांचे व्याज मिळेल याबाबत माहिती पाहणार आहोत.
कसे आहे योजनेचे स्वरूप?
पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम मध्ये गुंतवणूकदारांना सिंगल अकाउंट आणि जॉईंट अकाउंट ओपन करता येते. सिंगल अकाउंट ओपन करणाऱ्या गुंतवणूकदारांना कमाल नऊ लाख रुपये आणि जॉइंट अकाउंट करणाऱ्या गुंतवणूकदारांना कमाल 15 लाख रुपये गुंतवता येतात.
ही योजना पाच वर्षांसाठी असते. पण गुंतवणूकदारांना मॅच्युरिटी चा कालावधी पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच पाच वर्षांचा काळ पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा ही योजना एक्सटेंड करता येते. या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 7.4% दराने परतावा मिळतोय.
या योजनेत किमान एक हजार रुपयांपासून गुंतवणूक करता येते आणि नंतर एक हजाराच्या पटीत गुंतवणुकीची रक्कम सिंगल अकाउंट नुसार किंवा जॉइंट अकाउंट नुसार वाढवता येते. म्हणजे सिंगल अकाउंट असल्यास कमाल नऊ लाख आणि जॉईंट अकाउंट असल्यास कमाल 15 लाखा अशी गुंतवणूक करता येते.
या अल्पबचत योजनेवर वार्षिक ७.४ टक्के व्याज मिळते. जमा केलेल्या रकमेवरील वार्षिक व्याज १२ भागांमध्ये विभागले जाते आणि ते दर महिन्याला आपल्या खात्यात जमा केले जाईल. जर तुम्ही मासिक रक्कम काढली नाही तर ती तुमच्या पोस्ट ऑफिस बचत खात्यात राहील आणि तुम्हाला मुद्दलासह या रकमेवर व्याज मिळेल.
कसे मिळणार एक लाख 11 हजार रुपये?
जर एखाद्या गुंतवणूकदाराने या योजनेत जॉइंट अकाउंट ओपन करून 15 लाखाची गुंतवणूक केली तर 7.4% दराने अशा गुंतवणूकदाराला वार्षिक एक लाख 11 हजार रुपयांचे व्याज मिळणार आहे म्हणजेच महिन्याला 9250 रुपये इतके व्याज मिळेल.
तसेच जर एखाद्या गुंतवणूकदाराने या योजनेत सिंगल अकाउंट ओपन करून नऊ लाखाची गुंतवणूक केली तर 7.4% दराने अशा गुंतवणूकदाराला वार्षिक 66,600 व्याज मिळणार आहे म्हणजेच महिन्याला 5 हजार 550 रुपये इतके व्याज मिळणार आहे.