Skip to content
AhmednagarLive24
  • About Us
  • Advertising
  • Disclaimer
  • Contact us
  • Corrections Policy
AhmednagarLive24
  • About Us
  • Advertising
  • Disclaimer
  • Contact us
  • Corrections Policy
  • ब्रेकिंग
  • बिझनेस
  • ऑटोमोबाईल
  • टेक्नॉलॉजी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल

MTNL कंपनीबाबत ती बातमी आली आणि स्टॉक मार्केटमध्ये एमटीएनएलचे शेअर्स वाढलेत ! शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांची गर्दी

महानगर टेलिफोन निगम लिमिटेड कंपनी म्हणजे एमटीएनएल चा स्टॉक आज 5 फेब्रुवारी 2025 रोजी २० टक्क्यांनी वाढला. सध्या हा स्टॉक ५७.१६ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचलाय. या स्टॉकची प्रीवियस क्लोजिंग ही 47.64 एवढी होती. हा स्टॉक अवघ्या दोन दिवसात २७.५८ टक्क्यांनी वाढलाय.

Tejas B Shelar
Published on - Wednesday, February 5, 2025, 5:17 PM

MTNL Share Price : केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सोमवारी शेअर बाजार दबावात होता. मात्र मंगळवारपासून शेअर बाजारात पुन्हा एकदा तेजी दिसून येत आहे. काल मंगळवारी आणि आज बुधवारी शेअर बाजारात मोठी तेजी दिसून आली आहे आणि या तेजीच्या काळात गेल्या सहा महिन्यांपासून आता त्याने जो स्टॉक घसरत होता तो एमटीएनएल चा स्टॉक देखील तेजीत आला आहे.

त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साहाचे वातावरण असून एमटीएनएलच्या शेअर्स संदर्भात आता पुन्हा एकदा नव्याने चर्चा सुरू झाल्या आहेत आणि हा स्टॉक पुन्हा एकदा फोकस मध्ये आला आहे. महानगर टेलिफोन निगम लिमिटेड कंपनी म्हणजे एमटीएनएल चा स्टॉक आज 5 फेब्रुवारी 2025 रोजी २० टक्क्यांनी वाढला. सध्या हा स्टॉक ५७.१६ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचलाय.

MTNL Share Price
MTNL Share Price

या स्टॉकची प्रीवियस क्लोजिंग ही 47.64 एवढी होती. हा स्टॉक अवघ्या दोन दिवसात २७.५८ टक्क्यांनी वाढलाय. पण आता गुंतवणूकदारांच्या मनात गेल्या सहा महिन्यांपासून जो स्टॉक सातत्याने घसरत होता तो अचानक तेजीत का आलाय आणि ही तेजी किती दिवस कायम राहील? तेजी येण्याचे नेमके कारण काय? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

मंडळी कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या या कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या सहा महिन्यांत २० टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. मात्र, आता कंपनीच्या शेअर्समध्ये अचानक मोठी तेजी आली आहे आणि आज आपण ही तेजी येण्याचे नेमके कारण काय याबाबत माहिती पाहणार आहोत.

Related News for You

  • १५० वर्षांनंतर दुर्मिळ शुभ योग! ‘या’ ५ राशींचे नशीब चमकणार; पैसा, करिअर आणि इच्छा पूर्ण होण्याचे संकेत
  • मोठा निर्णय! पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या सर्व बसेस बंद? प्रवाशांमध्ये संभ्रम
  • पुणे-मुंबई एक्सप्रेस-वेवर गॅस टँकर अपघात; २० तासांहून अधिक काळ महामार्ग ठप्प, हजारो प्रवासी अडकले
  • अर्थसंकल्पातून सरकारी कर्मचाऱ्यांना मिळालेत 4 मोठे लाभ ! कर्मचाऱ्यांवर कसे परिणाम होणार ?

स्टॉक तेजीत येण्याचे कारण काय ?

मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने कंपनीच्या 16,000 कोटी रुपयांच्या मालमत्तेच्या मुद्रीकरणाला मंजुरी दिली आहे, ज्यामुळे कर्जाची परतफेड आणि ऑपरेशनल पुनर्रचनेचा मार्ग मोकळा झाला आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 मध्ये सर्व सरकारी माध्यमिक शाळा आणि आरोग्य केंद्रांना ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यासाठी नवीन योजनेची घोषणा केली. त्याचा परिणाम सुद्धा शेअर्सवर झाला आहे अन याच्या स्टॉकच्या किंमती वाढल्यात असं जाणकार लोकांचे म्हणणे आहे.

गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे सचिव अरुणेश चावला यांनी एमटीएनएल आणि बीएसएनएलकडे असलेल्या मालमत्तेचे मुद्रीकरण करण्यासाठी आम्ही मदत करणार आहोत जेणेकरून निष्क्रिय असलेल्या मालमत्तेचा पुनर्वापर केला जाऊ शकेल, दायित्वांचा निपटारा केला जाऊ शकेल आणि आम्ही हे क्षेत्र पुन्हा सक्रिय करू शकू अशी माहिती दिली. बीएसएनएल आणि एमटीएनएलच्या मालमत्ता मुद्रीकरणाबद्दल बोलताना त्यांनी हे भाष्य केले.

सरकारी मालकीच्या, कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या एमटीएनएलला गेल्या ऑक्टोबरमध्ये बहुतांश सरकारी बँकांनी अनुत्पादक मालमत्ता म्हणून घोषित केले होते. एमटीएनएलवर बँकांची 7,925 कोटी रुपयांची थकबाकी असून, एकूण 32,000 कोटी रुपयांची थकबाकी असून त्यात अल्पमुदतीच्या आणि दीर्घकालीन कर्जाचा समावेश आहे.

या स्टॉकची कामगिरी कशी राहिलीय?

हा स्टॉक सध्या 57.16 वर ट्रेड करतोय. या स्टॉक मध्ये सध्या वाढीचे ट्रेंड आहेत. पण आपल्या उच्चांकी पातळीपेक्षा हा स्टॉक अजूनही निम्म्याने खाली आहे. १०१.५ रुपयांच्या मागील उच्चांकी पातळीपेक्षा हा स्टॉक निम्म्याने खाली आला आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना मोठा धक्का दिलाय.

मात्र या वर्षी हा स्टॉक सातत्याने फोकस मध्ये दिसतोय. यंदा आतापर्यंत या स्टॉकने १० टक्के इतका परतावा दिला आहे. मागील बारा महिन्यांचा विचार केला असता या स्टॉकने १५ टक्के इतका जोरदार परतावा दिला आहे. तसेच पाच वर्षांच्या लॉन्ग टर्म मध्ये हा स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांसाठी विशेष फायद्याचा ठरला असून या काळात या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना ४०० टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Follow us on

Latest News

Suzuki Access 125 झाली अधिक सुरक्षित; ABSसह नवे फीचर्स, जाणून घ्या किंमत आणि खास वैशिष्ट्ये

Suzuki Access 125

१५० वर्षांनंतर दुर्मिळ शुभ योग! ‘या’ ५ राशींचे नशीब चमकणार; पैसा, करिअर आणि इच्छा पूर्ण होण्याचे संकेत

Zodiac Astrology

मोठा निर्णय! पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या सर्व बसेस बंद? प्रवाशांमध्ये संभ्रम

Pune News

पुणे-मुंबई एक्सप्रेस-वेवर गॅस टँकर अपघात; २० तासांहून अधिक काळ महामार्ग ठप्प, हजारो प्रवासी अडकले

Pune Mumbai Traffic

सोने-चांदीच्या किमतींमध्ये जोरदार उसळी; देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी कायम

Gold Rate

अर्थसंकल्पातून सरकारी कर्मचाऱ्यांना मिळालेत 4 मोठे लाभ ! कर्मचाऱ्यांवर कसे परिणाम होणार ?

Government Employee News

Recent Stories

फेब्रुवारी 2026 मध्ये कार बाजारात मोठी उलथापालथ; MG मॅजेस्टर, BMW X3, निसान ग्रेव्हिटसह अनेक नवीन गाड्या लाँच होणार

Upcoming SUV

Google Pixel 10 वर मोठी सूट; 79,999 चा फ्लॅगशिप फोन आता स्वस्तात, जाणून घ्या ऑफर आणि फीचर्स

Google Pixel 10

व्हॅलेंटाईन डे निमित्त Apple India ची मोठी भेट; iPhone, MacBook, iPad वर आकर्षक कॅशबॅक ऑफर्स जाहीर

Apple India Offers

Samsung Galaxy S26 सीरिज लवकरच लाँच होणार? AMOLED डिस्प्ले, 50MP कॅमेरा आणि पॉवरफुल प्रोसेसरचे लीक तपशील समोर

Samsung Galaxy S26

माळशेजपेक्षाही सुंदर! ‘महाराष्ट्राचे मिनी स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखले जाणारे तापोळा पर्यटकांचे नवे आकर्षण

Maharashtra Tourism

ट्रम्प यांच्या करकपात घोषणेमुळे भारतीय शेअर बाजारात ऐतिहासिक उसळी; सेन्सेक्स ३,६५६ अंकांनी वधारला

Share Market News

सॉव्हरेन गोल्ड बॉण्डवरील कर नियमांत मोठा बदल; गुंतवणूकदारांनी काय जाणून घ्यावे?

Gold Investment
AhmednagarLive24

Read Latest Marathi News Of Politics, Agriculture, Money, Health, Automobile, Technology, Lifestyle, Jobs, India, Entertainment, And Sports, Watch Live Marathi News From Maharashtra And Ahmednagar All Rights Reserved. This Website Is Part Of TBS Media Group

Follow us

About Us

Contact Us

Advertising

Privacy Policy

Code of Ethics

Disclaimer

Copyright Notice

Corrections Policy

Fact-Checking Policy

© 2026 Ahmednagarlive24

  • About Us
  • Advertising
  • Disclaimer
  • Contact us
  • Corrections Policy