अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- नुकसान भरपाई देण्यासाठी घरात बसून चालत नाही, त्यासाठी बांधावर जावे लागते, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी अतिवृष्टीचा फटका बसलेल्या सोलापूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. या पार्श्वभूमीवर सांगलीत प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
आम्ही मागे लागून गोळ्या झाडल्यानंतर मुख्यमंत्री अखेर घरातून बाहेर पडणार आहेत. त्याचबरोबर सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा असे देखील चंद्रकांत पाटील म्हणाले.
तसेच राज्यपालांनी जे पत्र दिले आहे, ते अगदी बरोबर आहे. मुख्यमंत्री या पदावर असताना योग्य पद्धतीने बोलणे गरजेचे आहे. शेवटी ते राज्यपाल आहेत.
अरे तुझ्या वयात अंतर किती? तुझी पोजिशन किती? अशी खोचक टीका चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. ते सांगलीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved